Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

Katbol । Ways To Increase Breast Milk Supply In Marathi

Katbol-।-Ways-To-Increase-Breast-Milk-Supply-In-Marathi

Katbol : Increase Breast Milk Supply  : बाळ जन्माला आल्यानंतर पहिले ६ महिने पुर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असते. परंतु जर हेच दूध बाळाला पुरेस नसेल तर बाळ रडते, कुरकुर करते. अश्यावेळी आपण पटकन डॉक्टर्स चा सल्ला घेतो आणि फॉर्मुला मिल्क चा आधार घेतो आणि जे आईचे दूध बाळासाठी अमृत मानले जाते त्यापासून बाळ वंचित राहते. दूध पाजताना आई आणि बाळाची जी प्रेम, आपुलकीची देवाणघेवाण असते ती देखील कमी होते.

सिझेरिअन डिलिव्हरी नंतर अजिबात दुध येत नसेल तर आईचे दूध वाढवण्याचे उपाय, ३ दिवसात बाळाचे पोट भरून दुध येईल

आई जेव्हा बाळाला आपल्या अंगावरच दूध पाजते त्यावेळेस ती फक्त बाळाचं पोटच भरत नसते तर बाळावर वात्सल्याचे संस्कार पण घालत असते. त्यामुळे कर्तव्य वजा आई ची ड्युटी आहे आपल्या बाळाला दूध पाजणे. जर काही कारणांमुळे आई ला दुध कमी येत असेल किंवा येतच नसेल तर काही आयुर्वेदिक उपाय आई ने करणे आवश्यक आहे.

सर्वात आधी नवीन आई झालेल्या स्त्री ने हा विषय डोक्यातून काढून टाकावा कि मला दुध कमी येत आहे किंवा येत नाही त्याशिवाय नवीन आई ला दुध मुबलक प्रमाणात येणे सुरु होत नाही. एक लक्षात ठेवा आईच दुध बनण्याची सर्व प्रक्रिया हि आईच्या डोक्यात असते ती जसा विचार करिन तस होणार. तसेच आई ने सर्व विचार, चिंता करणे बंद करणे दुध येण्यासाठी बंद केले पाहिजे. ह्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणे जरुरी आहे.

आता आपण अश्या औषधाची माहिती घेणार आहोत कि ज्याने काही महिलांना १ दिवसात तर काही महिलांना ३ दिवसात अंगावर दूध येणे सुरु होते.

आईचे दूध वाढवण्याचे उपाय : कातबोळ Katbol

खाली दाखवल्याप्रमाणे हे Katbol कातबोळ दिसतो

कातबोळ Katbol हे हा एक डिंकाचा प्रकार आहे. खर झाडाच्या सालीपासून याचा जो डिंक बनतो तो हा आहे. हा दिसायला काळाशार असतो. चुकीच्या पद्धतीने सेवन केल्याने याचे काही दुष्परिणाम पण आहे जे मी खाली सांगितले आहे.

हेही वाचा

कातबोळ कश्या पद्धतीने सेवन करायचा How to consume Katbol in Marathi?

आपल्याला कातबोळाच्या गोळ्या बनवायच्या आहेत यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल.
१) कातबोळ Katbol (वर फोटो मध्ये दाखवलाय तेवढाच जवळपास १ मोठ्या लिंबू च्या आकाराचा आहे)
२) १ वाटी गूळ

१ वाटी गुळात कातबोळ Katbol कुस्करून घ्यावा.

वाटाण्याच्या आकाराच्या गोळ्या बनवूंन घ्यावयात.

कातबोळ गोळी सेवन करायची पद्धत How to take Katbol Tablet in Marathi?

टीप : हि गोळी घश्यात हाताने टाकून पाण्यासोबत घ्यावी या गोळीचा स्पर्श दाताला लागला नाही पाहिजे. नाहीतर दात काळे होतात.

(आम्ही आमचा अनुभव मांडला आहे आणि तुमच्या सेवेसाठी कातबोळ उपलब्ध करून देऊ शकतो परंतु तुमच्या जोखमीवर कातबोळ खरेदी करावा लागेल.)

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.

तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Exit mobile version