Homemade Immunity Power Protein Powder in Marathi रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी साधी सोपी प्रोटीन पावडर

Immunity Power Protein Powder in Marathi : सध्याच्या कोरोना रोग परिस्थितीच्या काळात सगळ्यांना आरोग्य हीच खरी संपत्ती आहे या उक्तीचा अर्थ समजला आहे. कोरोना परिस्थितीच्या काळातच काय तर हा वाईट काळ सरल्यानंतर सुद्धा आपण सर्वांनी आपला आहार योजना (Diet Plan) आरोग्यदायी ठेवला पाहिजे. आहारात अश्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे ज्याने शरीराला फायदा होईल. कारण आरोग्यदायी आहाराने रोग आपल्यापासून कोसो दूर लांब राहतील. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अश्याच गोष्टींचं सेवन केलं पाहिजे.

सकाळची सुरवात ही Immunity Power रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अश्या आहारानेच झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढक एनर्जी ड्रिंक घेतलं पाहिजे. चहा कॉफी सारखे पेय न पिणेच योग्य त्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक काढा किंवा  रोगप्रतिकारक शक्ती वाढक एनर्जी ड्रिंक घेऊ शकता. त्याचसोबत तुम्ही प्रोटीन पावडर टाकून मिल्कशेक देखील पिऊ शकतात. बाजारात अनेक प्रोटीन पावडर उपलब्ध आहेत परंतु जर घरच्या घरी उत्तम प्रोटीन पावडर जर तुम्ही बनवु शकाल तर ते जास्त योग्य.

आज आपण अश्याच Immunity Power Protein Powder in Marathi  रोगप्रतिकारक शक्ती वाढणाऱ्या प्रोटीन पावडर कशी बनवायची याची माहिती आणि त्याच महत्त्व बघणार आहोत.

रोगप्रतिकारक शक्ती Immunity Power वाढवण्यासाठी साधी सोपी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी आपल्याला खालील साहित्य लागणार आहे.

साहित्य :

१) मखाने २ वाट्या
२)  बदाम १/२ वाट्या
३) खसखस २ चमचे
४) अक्रोड १/२ वाट्या
५) बडीशोप २ चमचे
६) वेलदोडे ७-८

कृती :

हे सर्व साहित्य कोरड्या मिक्सर मध्ये बारीक दळून घ्या. लक्षात ठेवा अजिबात पाण्याचा अंश लागू देऊ नका नाहीतर खराब होईल प्रोटीन पावडर.

हि पावडर घ्यायची कशी ?

  • सकाळी १ ग्लास दुधात २ चमचे पावडर टाकून पिऊ शकतात.
  • कोमट पाण्यात २ चमचे घेऊ शकता.
  • सलाड वर ड्रेसिंग म्हणून टाकु शकतात.

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.

तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti