Share Market in Marathi – आजच्या पोस्ट मध्ये आपण शेअर मार्केट्सची सर्व माहिती मराठी मध्ये घेणार आहोत. या पोस्ट मध्ये Share Market Basics सोप्प्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.
१) परिचय
आजकाल प्रत्येक माणुस आपल्याला शेअर मार्केट बद्दल बोलताना दिसतो. त्याचप्रमाणे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याबद्दल बोलताना दिसतो किंवा शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवतात. पण सर्व लोकांना शेअर मार्केट बद्दल अगदी पूर्णपणे माहिती असते असं नाही काही लोक आपापसात चर्चा करून प्रभावित होतात तर काही युट्युब वरील विडिओ बघून पण या सर्वांत पाया पक्का करायचा राहूनच जातो. शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणे म्हणजे ऑनलाईन पैसे कमवायचा दुसरा ऑपशन आहे जसे तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेतात तसेच शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला देखील पूर्ण शिक्षण अगदी अ,ब,क,ड पासुन शिकणे महत्वाचे आहे तेव्हा कुठे पैसे कमवणे सोप्पे होते नाहीतर निम्म्या पेक्षा जास्त लोक जितक्या उत्स्फूर्त पणे पैसे गुंतवतात तितक्या कमी वेळात गमावुन बसतात.
आज आपण शेअर मार्केटच्या मूलभूत गोष्टीची माहिती घेणार आहोत.
२) आर्थिक बाजार (Financial Market)
आर्थिक बाजार लोकांना शेअर्स, बॉण्ड्स इत्यादी मध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. आर्थिक बाजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
अ) रोकड मार्केट Money Market
मनी मार्केट मुख्यत्वे डेब्ट, सिक्युरिटी जसे कि ट्रेजरी बिल इत्यादी सोबत संबंधित असते यांच्यात कमी कालावधीच्या डेब्टइंस्ट्रुमेंट्स चे ट्रेडिंग होते.
ब) शेअर मार्केट Share Market / कॅपिटल मार्केट Capital Market
कॅपिटल मार्केट मध्ये शेअर्स तसेच दीर्घ कालावधीच्या डेब्ट ईन्स्ट्रुमेन्टचे ट्रेडिंग होते. ज्यामध्ये डेब्ट आणि शेअर्स या दोघांचे ट्रेडिंग होते.
३) शेअर म्हणजे काय ? What are Shares ?
शेअर हा कंपनीचा एक भाग आपल्या मालकीचा कराचा मार्ग आहे. तुम्ही गुंतवलेल्या किमतीच्या प्रमाणात तुम्हाला कंपनीचा काही टक्के भाग मिळु शकतो. कंपनीच्या भागाचा काही टक्के भाग हा तुमच्या मालकीचा आहे असे देखील म्हणता येईल. कंपनी आणि आर्थिक मालमत्तेच्या मालकीची एकके म्हणजेच शेअर्स होय.
४) कंपन्यांना शेअर्स ची आवश्यकता का आहे ? Why Do Company Needs Shares?
कंपनी च्या विस्तारासाठी, आगामी प्रकल्पांवर काम करण्यासाठी ज्या ज्यादाच्या भांडवलाची गरज असते ती शेअर्स मार्फत मिळून जाते. शेअर्स जारी झाल्यावर गुंतवणूकदार बाजार मूल्यात शेअर्स खरेदी करता आणि कंपनीच्या छोट्याश्या हिस्साचे मालक होतात.
५) कंपनी तिच्या शेअर्सची यादी कशी जारी करते ? How does a company list its shares?
जेव्हा कंपनी पहिल्यांदा लोकांसाठी शेअर्स ची ऑफर करते तेव्हा त्याला IPO असे म्हणतात. IPO जारी करून कंपनी तिच्या शेअर्स ची यादी करते.
६) शेअर मार्केट म्हणजे काय ? What is Share Market in Marathi ?
ज्या मार्केट मध्ये शेअर्स चा व्यवहार केला जातो किंवा जारी केले जातात त्याला शेअर मार्केट असे म्हणतात. शेअर मार्केट फक्त शेअर्स ट्रेडिंग करायला परवानगी देते.
Share – हिस्सा, आपला भाग
Market – बाजार
शब्दशः अर्थ घेतला तर शेअर बाजार म्हणजे अशी जागा जिथे आपण सूचिबद्ध कंपनीतील भाग खरेदी किंवा विक्रीकरता येते.
७) शेअर मार्केटचे प्रकार Types of Share Market
अ) प्रायमरी मार्केट Primary Market
प्रायमरी मार्केट मध्ये कंपनी स्वतःचे शेअर्स लोकांना गुंतवणूक करण्यासाठी पहिल्यांदा ऑफर करते.
ब) सेकंडरी मार्केट Secondary Market
सेकंडरी मार्केट मध्ये लिस्ट झालेल्या शेअर्सचे ट्रेडिंग केले जाते. याद्वारे लोकांना एक असा प्लॅटफॉर्म मिळतो जेथे ते शेअर्स, डेब्ट, डेबेन्चर इत्यादीच्या खरेदी-विक्री साठी ट्रेडिंग करू शकतात. भारतात सर्वच प्रादेशिक शेअर बाजाराचे एक्सचेंजेस उपलब्ध आहेत ज्यामध्ये कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग केले जाते. पण यामध्ये मुख्यत्वे दोनच एक्सचेंजेस आहेत ज्यामध्ये जादातर शेअर्सचे चांगल्या वोल्युमने ट्रेडिंग होते.
८) बॉंम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange)
- बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारत तसेच आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे.
- बीएसई स्टॉक एक्सचेंजची स्थापना प्रेमचंद रॉयचंद यांनी १८७५ मध्ये केली होती आणि सध्या सेतूर्थनाथ रवी हे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत.
- भारतातील वित्तीय बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
- बीएसई मध्ये ऑनलाईन व्यवहार टी +२ रोलिंग सेटलमेंटद्वारे केले जातात, ज्यामध्ये दोन दिवसांत सर्व व्यवहारांवर प्रक्रिया केली जाते.
- या स्टॉक एक्स्चेंजच्या नियमनासाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) जबाबदार आहे, जे त्याच्या सुरळीत कारभारासाठी नियम नियमितपणे अद्यतनित करते.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग झालेल्या कंपना काय फायदा असतो ?
- त्रास-मुक्त भांडवल निर्मिती
- कायदेशीर पर्यवेक्षण
- वेळेवर माहिती प्रदर्शन
- पुरेसे किंमतीचे नियम
- संपार्श्विक हमी
९) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange)
- नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) ही भारताची सर्वात मोठी आर्थिक बाजारपेठ आहे आणि व्यापाराच्या दुनियेत चौथ्या क्रमांकाची बाजार आहे.
- भारतीय शेअर बाजारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी १९९२ साली नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) खालील विभागांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक देते. NSE Products
अ) इक्विटी
- इक्विटी Equity Market
- एक्सचेंज-ट्रेड फंड Exchange Traded Funds
- इंडाइसेस Indices
- म्युच्युअल फंड Mutual Funds
- सुरक्षा कर्ज आणि कर्ज इ Security Lending & Borrowing Scheme
- सार्वभौम गोल्ड बाँड Sovereign Gold Bond
- इनिशिअल पब्लिक ऑफरींग Initial Public Offering (IPO)
- संस्थात्मक प्लेसमेंट कार्यक्रम Institutional Placement Program (IPP)
- विक्रीसाठी ऑफर Offer for Sale
ब) डेरीवेटीव्हस
- इक्विटी डेरीवेटीव्हस Equity Derivatives
- करन्सी डेरीवेटीव्हस Commodity Derivatives
- कमोडिटी डेरीवेटीव्हस Currency Derivatives
- इंटरेस्ट रेट फ्युचर Interest Rate Derivatives
क) डेब्ट
- कॉर्पोरेट बॉण्ड्स Corporate Bonds
- इलेक्ट्रॉनिक डेब्ट बिडिंग प्लॅटफॉर्म Electronic Debt Bidding platform (EBP)
- निगोशिएटेड ट्रेड रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म Negotiated Trade Reporting Platform
- Non Competitive Bidding in Government Securities
- Tri-party Repo
गुंतवणूकदारांना मार्केट मध्ये ट्रेडींग करता यावे, यासाठी ब्रोकरांना एक्सचेंजचे सभासद व्हावे लागते. दोन्ही मार्केट ची वेळ सकाळी ९:०० ते दुपारी ३:३० या दरम्यानची आहे.
१०) इंडेक्स (Index)
एन.एस.इ.(NSE) आणि बी. एस. इ. (BSE) मध्ये लिस्ट झालेल्या कंपनीच्या आधारे इंडेक्सची रचना केली जाते. मुख्यत्वे दोन इंडेक्स आहेत
- सेन्सेक्स
- निफ्टी
अ) सेन्सेक्स (Sensex)
- बी. एस. इ. (BSE) वर आधारित इंडेक्सला “सेन्सेक्स” असे म्हणतात.
- सेन्सेक्स ची रचना सर्वप्रथम १९८६ मध्ये झाली होती आणि त्याची गणती मार्केट कॅपिटलाजेशन वेटेड पद्धतीने झालेली.
- सेन्सेक्स मध्ये विविध क्षेत्रात अव्वल असलेल्या ३० कंपन्यांचा समावेश असतो.
- सेन्सेक्स हा भारतीय शेअर मार्केट Share Market मधील सर्वात जुना स्टॉक इंडेक्स आहे आणि तो S&P द्वारे संचालित केला जातो.
- भारताची अर्थव्यवस्था आणि उद्योगांचा विस्तार, विकास, घसरण यावर लक्ष ठेवण्यासाठी ॲनालिस्ट आणि गुंतवणूकदार सेन्सेक्स चा वापर करतात.
ब) निफ्टी (Nifty)
- एन.एस.इ.(NSE) वर आधारित इंडेक्स म्हणजेच निफ्टी होय.
- निफ्टी मध्ये २२ वेगवेगळ्या क्षेत्रात प्रभुत्व असलेल्या ५० कंपन्यांचा समावेश केला गेला आहे.
- निफ्टी ची रचना सेन्सेक्स पेक्षा काहीशी निराळी आहे. सेन्सेक्स मध्ये फ्लोटिंग कॅपिटलायजेशनच्या आधारे इंडेक्स ची गणना केली जाते तर निफ्टीची गणना त्याच्या मधील ५० शेअर्सच्या संपूर्ण कॅपिटलायजेशनने केली जाते.
- निफ्टी चा बेझ स्तर १००० चा मोजला जातो.
- निफ्टी ची रचना १९९५ मध्ये झाली होती.
- फंड पोर्टफोलिओ, इंडेक्सवर आधारित डेरीव्हेटीव्ह्ज आणि इंडेक्स फंड च्या बेंच मार्किंग साठी निफ्टी चा उपयोग केला जातो.
- निफ्टी मध्ये फ्युचर्स आणि ऑपशन्स समाविष्ट आहे.
११) स्टॉक मार्केट मध्ये पैसे कमवण्याचे पर्याय Options to Make Money in Stock Market
- गुंतवणूक Investment
- स्पेक्युलेशन Speculation
- हेजिंग आणि आर्बिट्रेज Hedging and Arbitrage
- मर्जींग फंडिंग आणि डिव्हिडंट Margin Funding and Dividend
१२) शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक कशी करायची ? How to Invest in Share Market?
जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक कशी करायची याबद्दल विचार करत असाल तर आता आपण टप्प्या टप्प्यात माहिती घेऊयात.
१) Open Demat Account
सर्वात आधी डिमॅट अकाउंट ओपन करा. आणि ते अश्या बँक अकाउंट सोबत लिंक करा ज्या बँक अकाउंट मध्ये तुमचे नेहमीकरता Bank Translations होत असतील.
डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा Open Demat Account (फ्री डिमॅट अकाउंट आणि झिरो मेंटेनन्स चार्जेस). हे Groww चे डिमॅट अकाउंट आहे ज्यात तुम्ही अगदी सोप्प्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करू शकता, समजायला पण सोपे आहे.
२) त्यानंतर डिमॅट अकाउंट मोबाइल बेस्ड आप्लिकेशन मध्ये किंवा वेब प्लॅटफॉर्म वर ओपन करा.
३) जो स्टॉक ॲनालिसिस करताय त्यामध्ये ट्रेडिंग करारीला सुरवात करा.
१३) डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारे कागदपत्रे Documents Require to Open Demat Account
१) बँक अकाउंट
२) कॅन्सल चेक
३) पॅन कार्ड
४) ऍड्रेस प्रूफ
५) ओळखपत्र
१४) स्टॉक मार्केट एनालिसिसचे प्रकार Types of Stock Market Analysis in Marathi
- Technical Analysis टेक्निकल एनालिसिस
- Fundamental Analysis फंडामेंटल एनालिसिस
१५) शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करण्या आधी कुठल्या घटकांचा विचार केला पाहिजे ? Factors Need to Understand before Investing in Share Market
अ) गुंतवणुक करण्यामागचे उद्दिष्ट
शेअर मार्केट मध्ये किंवा कुठल्याही गुंतवणुकीच्या माध्यमात पैसे गुंतवतांना सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे ते तर तुमचे Financial Goals आर्थिक ध्येय काय आहेत ? गुंतवणुकीचे उद्दिष्ट हे कधीही सर्वांचे सारखे नसते ते प्रत्येक माणसानुसार त्याच्या महिन्याच्या, वर्षाच्या कमाईनुसार बदलते.
ब) जोखीम सहन करायची क्षमता
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना सर्वसामान्य लोक ज्या घटकांचा विचार करता तो महत्वाचा घटक म्हणजे जोखीम. तुमची किती जोखीम सहन करायची क्षमता आहे. ज्या इन्वेस्टर्स ची कमी रिस्क सहन करायची क्षमता असते ते stable returns देणाऱ्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात जेणेकरून मार्केट अस्थिर (volatility) झाले कि त्याना कमी पैसे गमवावे लागता.
क) विविधता
तुमचा पोर्टफोलिओ विविधता पुर्ण ठेवा जेणेकरून तुम्ही कमी जोखीमांचा सामना कराल. तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्राच्या स्टॉक मध्ये करा जितकी जास्त गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रात तितकी कमी आर्थिक जोखीम.
निष्कर्ष
In Conclusion, आम्ही आशा करतो आजच्या पोस्ट मध्ये तुम्हला मनासारखी, सोप्प्या भाषेत, समजेल अशी शेअर मार्केट बद्दल माहिती मिळाली असेल. आम्ही या पोस्ट मध्ये शेअर मार्केट च्या सर्व मूलभूत गोष्टी मराठीत सांगितल्या आहेत. या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करायला प्रेरणा मिळेल. याच्यासारख्या अजुन माहितीपूर्ण पोस्ट् साठी आमचा ब्लॉग वाचत रहा.