Long Ukhane in Marathi जानपद उखाणे । लांबलचक उखाणे

नमस्कार, KnowinMarathi या वेबसाइट वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच वेळा कुठल्याही सण, समारंभ, कार्यक्रम, पूजा मग ती आपल्या घरातली असो कि कुण्या आपसातल्या उखाणे Ukhane घ्यावे लागतात. मग अश्या प्रसंगात सगळ्यात वेगळी हटके अशी उखाणे घेतली कि सगळ्यांचंच लक्ष कसं वेधलं जाते. आज आपण अशीच उखाणे बघणार आहोत जी सगळ्यांनाच अगदी कान लावून ऐकायला भाग पडतील. Long Ukhane in Marathi लांबलचक उखाण्यांना जानपद उखाणे असेही म्हणतात.

Long Ukhane in Marathi – 1

लोणावळच्या घाटात गार गार पाण्याचा झरा,
तेथे नेहमी शिवाचा पहारा,
कर्जत पासून कोकण पट्टी ला भार लागला सारा,
कल्याण कॅम्पात निर्वासी भरला सारा,
घाटकोपरला बिजली च्या तारा,
दादरला नेहमी पोलिसांचा पहारा,
कॉफर्ड मार्केट ला ट्राम धरा,
राणीच्या बागेत विश्रांती करा,
भायखल्याला जाताना चढ लागला सारा,
मार्कटच्या घड्याळात वाजले बारा,
चांभारगोदीत बोटी आल्या तेरा,
बोरी बंदरला गादीचा आगार झाला,
चौपाटीला सुटला मंजूल वारा,
साहेबाच्या बंगल्याची निरनिराळी त-हा
………………  चे नाव घ्यायला रुपये लागतात एकेशे तेरा.

Long Ukhane in Marathi – 2

नांव घ्या म्हणता, जीव माझा नेणतां,
नेणत्याची कोवळी बुध्दि, ताक म्हणून वाढलं दूध,
दुधावरली साय, तूप लावूनी केली चपाती मऊ,
चपाती वरला भजा.
आनंदान जेवला राजा,
निरीचा बघा थाट,
ब्रह्मदेवाची गांठगांठ सोडावी राहनी उभा,
कपाळी शोभा कुंकवाची बघा,
बघा लल्लाटी खाली हळदीची दाटी.
हळदीचा पिवळा रंग.
कंबरपट्ट्याची कडी,
गरसुळी गाती,
आयना डाव्या हाती,
मुख न्याहाळीत होती,
हातांत सुवर्णाचा चुरा ……………… रावांच्या मंदीलाला सोन्याचा तुरा.

Long Ukhane in Marathi – 3

बाबुळगांव शहर, तिथ भरती बाजार,
वाघाची पिल्ली खरेदी केली,
हाजाराचा खिरज कमरेच्या शिरी,
स्वामी उतरले परवरी,
घेतला व-हाडाचा छंद,
तिथ घेतल्या पंचरंगी गाद्या.
गाद्या लावल्या घरां,
आपण मोठ्या शहरां.
कळवातिणी घालतात वारा,
सराफाच्या माड्या उघड्या,
तिथ घेतल्या बुगड्या,
बगड्या टाकल्या खिशांत.
आपण करांडे देशांत.
तिथं बोलविली ऊदी रंगाची पैठणी पैठणीचा रंग फिक्का,
फिक्क्या रंगाची घेऊ नका तिथ बोलविली वाकडी नथ,
वाकडया नथीचा दुहेरी फासा,
हाजाराचे मोती दोन आशी लेणार कोण ……………… ची सून

Long Ukhane in Marathi – 4

“चांदीचं घंगाळ आंगुळीला ,
जरिकांठी धोतर नेसायला,
चंदनासा पात बसायला केसरी गंध लाअवायला,
भागवत वाचायला,
दिल्लीचा आरसा पहायला,
समय मोराची,
चांदीचे गडवेपेले,
आंत गंगाभागीरथींच पाणी,
राजगिरी अत्तर,
सुगंधी वासांच तेल,
उदबत्यांची झांड रांगोळी पढं पांची पक्वानचं भोजन जेवायला.
वर तरेतरेच्या कोशिंबिरी.
सतरण्जीचीए शोभा.
पान पिकलं पन्याचं चना लोणावळ्याचा,
कातगोळ्या धारच्या,
वेलदोडे इंदुरचे,
जायफळ नगरचं,
जायपत्री मद्रासची.
चिकन्न सुपारी सोलापूरची,
एवढं सामान विड्याचं ताट बिल्वराचं,
घुगराचा आडकित्ता बागचीना,
गाद्या गिझनीच्या,
उषा किंकापाच्या,
हंड्या-झुंबरांचा लकलकाट,
समया लावल्या तीनशें साठ आणि……………… रावांच्या जिवासाठीं भी हो केला थाट.”

Long Ukhane in Marathi – 5

कैलास माडी काचेच्या पायऱ्या,
आर लावा त्याला.
हाजाराची पैठणी मला,
पाचशाचा मंदील त्याला.
जरीच्या चोळीला इस्तर दिला.
नक्षीच्या धोतराला चाटी गेला अमरावतीला.
अमरावतीहन आणल्या पाटल्या.
त्या माझ्या मनगटी दाटल्या.
आरल कारल, सोन्याच सरल.
सर वजरटीक सोनारान गाठवली,
माझ्या गळ्याला दाटली,
अशी नार कशी सभेशी उभी?
छत्तीसगावच्या कारभारी त्याची केली माती,
मातीच केल कस,
मला आल हास.
हसली गालातल्या गालात,
मला पुसती रंगमहालात,
रंगमहालातून चालल्या नावा तर ……………… राव सवर्वी काम सोडून मला आधी आळंदी दावा.

Long Ukhane in Marathi – 6

मोहोळ गाव खेड,
कळवातीनीचा महाल वेशीपुढे,
स्वामी झाले वेडे,
स्वामींना लागले छंद,
छंदाला बाजूबंद,
स्वामी गेले बार्शी,
बार्शी घेतली गादी,
आणली सतरंजी,
पराज्याचा सुतार,
मोठा कारागिर,
जागा लागते सव्वा वीत,
आणला पलंग,
ठेवला घरी,
स्वामी गेले शहराला,
शहारापाठी घेतला चंद्रहार,
चंद्रहाराच सोन मोठ नाजुकदार घडणीस लागले तीन वार,
तिथ घेतली बोरमाळ,
बिरुदी मासूळ्याची घडण काय,
जोडव्याची घडण बरोबर नाय,
वाकडी नथ,
दुहेरी फासा,
स्वामी गेले मुंबई देशा,
तिथ घेतल्या साडया पैठण्या,
साडयापैठण्यांचा रंग उदी माश्या नावाचा रंग घेऊ नका,
फिक्कमलमली कुडत, जरतारी फेटा,
सान्या सिणगाराला शोभा आली,
तेथून स्वामी परत आले पहिला मुक्काम कुठे ?
सांगलीच्या पेठ,
तिथ घेतला मोत्याचा पदर,
तेथून स्वामी परत आले.
दुसरा मुक्काम कुठे?
कराड पेठ,
तिथ मोटार चाले हवापरी,
स्वामी आले आपले नगरी,
पाटपाणी करुन मंदिरी,
पाची पक्कवानांची केली तैयारी,
एवढयात आली, ……………… रावांची स्वारी.

Long Ukhane in Marathi – 6

चांदीच तपेल आंघोळीला,
चंदनाचा पाट बसायला,
जरीकाठी धोतर नेसायाला,
सान येवल्याच,
खोड बडोद्याच,
केशरीगंध लियाला,
सोन्याच पात्र.
तन्हेतहेच्या कोशिंबिया.
पक्कवान्नाची ताट,
रांगोळ्यावरी पाट,
उदबत्त्याच्या समया मोराच्या.
ताट बिंदल्याच,
डबा गझनीचा.
अडकित्ता धारवाडचा,
चूना भोकरनचा,
जायपत्री विजापुरची.
चिकनी सपारी कोकणची.
पान मालगावच.
उभी राहिली मळ्यात,
सवासुनींच्या मेळ्यात,
नवरलांचा हार सासुबाईंच्या गळ्यात,
पाचशेचा तुरा मामासाहेबांच्या मंदिलात.
डाव्या डोळ्याचा रोख,
पायावर धोतराचा झोक.
कमरी करयाचा गोप,
अत्तरदानीचा ताल,
गुलाबदाणीचा भार,
पलंग सातवाडचा,
तक्या साटनीचा,
गादी। खतनीची.
वर जरीकाठी लोड,
बोलण तर अस काही अमतावानी गोड,
त्या बोलण्याच मला आल हस, विसरले आईबाप.
बहिण भावंडांची नाही झाली आठवण,
अशी तर कल्पना किती,
एका खेडयाचे मालक आहे म्हणत्याती,
ह्या हौसेला पडले तरी पैसे किती?
ह्या हौसेला बारा हजार पडला पैका.
……………… पाटलांचे नाव घेते सर्व मंडळी लक्ष देऊन ऐका.

Long Ukhane in Marathi – 7

बाग लावला परोपरी,
आत झाडे तरोतरी,
आंब्याला लागल्या कैऱ्या,
उंबर लागले पिकायला,
कडवट आंबट,
संत्री मुळमट,
काशीमागून फणस,
लिंब, डाळिंब आले रसा,
चला जाऊ ऊसा,
कुठेतरी नौकरी करा,
साडी माझी पैदा करा,
बसेन तोवर बसेन,
नाहीतर जाईन माझ्या माहेरा,
माझं माहेर बेगमपुरी,
मला दिले मोठ्या घरी,
गळ्यात काय मोहनमाळ,
गळ्यात चंद्रहार,
अंगात चोळी लाल,
त्याची हरभऱ्याची गाठ,
काय सांगू संपत्तीचा थाट,
वाड्यात वाडे सात वाडे,
बोलवायला गेला मोहन माळी,
आधी वाढते मैसूर पाक,
पुन्हा वाढते केशरी भात,
पुन्हा वाढते तिखट भात.
बारा प्रकारच्या बारा भाज्या,
आवटीची शेंग,
कवटीची शेंग मुळा,
कांदा, टाकून, बनवत रहा,
अळूची पाने तळून,
स्टीलच्या ताटात चौपदरी चपातीची घड़ी निरशा दुधातली बासुंदी घ्यावी थोडी,
अमेरीकी खीर,
गोड सुधारस केला बाई,
लिंबू पिळायची आठवण नाही ……… नाव ऐकतात दिशा दाही.

Long Ukhane in Marathi – 8

अंगणात अवतरले आकाशातले सारे तारे
नाव घेते …….. लक्ष द्या सारे
मैत्रिणी म्हणाल्या चलतेस का शॉप्पिंगला
मी म्हणाली नको ग बाई शॉपिंगची मुळीच आवड नाही मला
बळजबरी म्हणाल्या चल चल जबरदस्ती चढवली पायात मी चप्पल
उगाच खर्च नको म्हणुन पाकीट मी रिकामंच घेतलं
पण हळूच पर्स मध्ये क्रेडिट कार्ड मी टाकलं
आता शॉपिंग म्हटलं कि लक्ष्मी रोड
लक्ष्मी रोड म्हटलं कि गाडगीळ सराफ
गाडगीळ सराफात मंगळसूत्र घेतलं मी ४ टोळ्याच
आणि हळूच दुकान गाठलं चितळ्याचं
चितळ्यांकडे घेतली मी बाकरवडी आणि स्वामिनीच्या दिशेने वळवली गाडी
स्वामिनीत घेतली मी पैठणी आणि तुळशीबागेत घ्यायला गेले मी फणी
तुळशीबागेत घेतली मी फणी, टिकल्या, कानातले आणि वेल
तितक्यात आठवला लुंकड चा सेल
लुंकड मध्ये मुळीच नाही केली मी खरेदी फार
२ टॉप, २ जीन्स कुर्ते घेतले फक्त ४
आता मात्र पोटात व्हायला लागली काव काव
बेडेकरच्या मिसळीवर मारला मी चांगलाच ताव
क्रेडिट कार्ड च लिमिट संपलं, क्रेडिट कार्ड च लिमिट संपलं
आणि घर मला गाठावं लागलं
………….. राव म्हणाले झाली का राणी मनाजोक्ती शॉपिंग
………….. राव म्हणाले झाली का राणी मनाजोक्ती शॉपिंग
मी म्हटलं कुठलं हो तनिश मधून घ्यायची राहिली कि डायमंड रिंग

Long Ukhane in Marathi – 9

सारवलेल्या अंगणात,
सुंदर रेखाटली रांगोळी,
नाव घेते ऐका,
आता माझी पाळी,
सुन कुणाची ………ची,
लेक कुणाची ……….ची,
राणी कुणाची भ्रताराची,
भरतार म्हणे का ग रुसली,
मणी, जोडवे, बिछवे, पैंजण घाला हिला कुणी,
कडे, तोडे, पाटल्या, गोठ माझे भारी,
पैठणची पैठणी मागवा, जरतारी वजरटीक ठुशी,
मोहनमाठ गळा, जमलाय माझ्या सख्याचा मेळा,
सुवासिनीचं लेणं मंगळसूत्र काळी पोत,
सासर माहेरचं जमलं गणगोत,
कुडकं, बुगडी, वेल, कुडी,
स्वारीच्या जीवावर नेसते रेशमी साड्या,
भांगात बिंदी, खोप्यावर गुलाबाचं फूल,
कानात माझ्या मोतीपावळ्याचं डूल,
वजरटीक, गळ्यात घातली ठुशी,
ह्यांच्या खुशीतच माझी खुशी,
पोहे हार, कोल्हापुरी साज,जळगावची वाकी
……… च्या संसारात कुठली हौस राहिली नाही बाकी.

Long Ukhane in Marathi – 10

ऐंशी द्रोण नउशे झारी,
वाजत-गाजत रुकवत गेला पाटलाच्या आळी,
पाटील म्हणतात नाव घ्या,
नाव कुठ फुकट,
हळदीच्या वाट्या,
कुंकाच्या चिट्या,
पानाचं पुंड,
दाळीचं वड,
भात भाताची,
कढी ताकाची,
वडी लाखाची,
लेक कुणाची आई बापाची,
सुन कुणाची सासू सासऱ्याची,
राणी कुणाची भ्रताराची,
नाजूक पोळ्या साजूक तेलच्या,
ऐंशी सांडगा,
नपुसगिरी पापड,
जिन्या साळीचे तांदळ दोन्ही आणे बरोबरी,
बर्फी, बुंदी, जिलभी न्यारी, साखर, सुजी तिनशे पुरी,
चांदीची घंगाळी आंघोळीला,
नकीचं धोतर नेसायला,
चंदनाचा पाट बसायला,
सान निवळीची,
खोड बडोद्याचं,
वरती गंध कोशिंबिरी,
पाची पकानानं भरलं ताट,
समया जळत्यात तीनशे साठ,
पान नालगावचं,
सुपारी कोकणाची,
कात लोकरचा,
चुना भोकरचा,
लवंग काशीची,
विलायची बीड,
मी हसले घरात
मला पुसलं रंग महालात
केजच्या कचेरी खांदला आड,
त्याला बाजूबंदी छंद
……….. चं नाव घेते गलका करा बंद.

1 thought on “Long Ukhane in Marathi जानपद उखाणे । लांबलचक उखाणे”

  1. हे उखाणे खूप आहेत. हे सगळे उखाणे आहेत. यामधले बरेच उखाणे मी आजपर्यंत कधी वाचले नवते. धन्यवाद एवढ्या सगळ्या उखाण्यासाठी

    Reply

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti