IPO म्हणजे काय ? आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ?

IPO : शेअर बाजारात काहीही निश्चित नसते इथे एका दिवसात माणुस करोडपती होतो तर अंदाज आणि अभ्यास चुकला तर रोडपती देखील होतो. त्यामुळे शेअर बाजार म्हटले तर कुणीही विचारपूर्वक पैसे गुंतवा असाच सल्ला देतो.

प्रत्येक महिन्यात कितीतरी कंपनी आयपीओ लाँच करतात त्यातील काही आयपीओ मध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर असते. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगल्या प्रमाणात रिटर्न्स प्राप्त होतात.

स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवण्याचा एक मार्ग म्हणजे आयपीओ त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत.

आयपीओ म्हणजे काय ? IPO Means What in Marathi ?

IPO or Initial Public Offer आयपीओ किंवा इनिशियल पब्लिक ऑफर हा एक मार्ग आहे कंपनी साठी भांडवलदारांकडून पैसे उभा करून आपल्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करायला आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचिबद्ध व्हायला.

कंपनी आयपीओ  का काढते ? Why Company Launch IPO in Marathi

  • एखाद्या खाजगी कंपनीची शेअर मार्केट मध्ये नोंदणी होण्यासाठी ती कंपनी आपले काही शेअर्स विकायला काढते त्या सुरवातीच्या विकायला काढलेल्या शेअर्स ला आयपीओ असे म्हणतात. खाजगी कंपनी चा आयपीओ काढल्याशिवाय ती कंपनी शेअर मार्केट मध्ये लिस्ट होत नाही. आयपीओ आयपीओ द्वारे शेअर्स काढून खाजगी कंपनी पब्लिक कंपनी मध्ये रूपांतरित होते. सार्वजनिकरित्या शेअर्स जारी करून कंपनी ला अधिक भांडवल मिळण्यास तर सामान्य जनतेला त्यावर गुंतवणूक करून अधिक रिटर्न्स मिळण्यास संधी प्राप्त होते.
  • कंपनी च्या आगामी प्रोजेक्ट्स साठी किंवा चालू प्रोजेक्ट्स साठी फंड उभा करण्यासाठी कंपनी पब्लिक होते.
  • कंपनी वर काही कर्ज असेल तर ते कमी किंवा कर्ज  पूर्ण फेडण्यासाठी देखील आयपीओ काढते.
  • सुरवातीच्या इन्वेस्टर्सला Exit करण्यासाठी जसे कि angel investors, venture capitalists ज्यांनी सुरवातीला कंपनी ला फंडस् पुरवले आहेत.
  • आणि, मार्केट मध्ये आपल्या कंपनी ची visibility वाढवण्यासाठी.



ओला आईपीओ आणण्याच्या तयारीत। OLA IPO Release Date https://knowinmarathi.com/ola-ipo-ola-ipo-release-date-ola-company-ipo/

आयपीओ चे प्रकार Types of IPO in Marathi

आयपीओ च्या किंमती निश्चित करण्यासाठी आयपीओ चे दोन भागात विभाजन होत. ते दोन प्रकार आहेत

  • Fix Price IPO or Fix Price Issue फिक्स प्राइस आयपीओ किंवा फिक्स प्राइस इश्यु
  • Book Building IPO or Book Building Issue  बुक बिल्डिंग आयपीओ किंवा बुक बिल्डिंग इश्यु

फिक्स प्राइस आयपीओ (Fix Price IPO in Marathi)

ज्या कंपनी ला मार्केट मध्ये आयपीओ लाँच करायचा असतो ती कंपनी इन्व्हेस्टमेंट बँक (Investment Bank) सोबत आयपीओ च्या किंमतीबद्दल (IPO Price) चर्चा करते. इन्व्हेस्टमेंट बँक सोबतच्या चर्चेमध्ये आयपीओ किंमत ठरते, त्या ठरवलेल्या किमतीती कोणताही गुंतवणूकदार आयपीओ खरेदी करू शकतो यालाच फिक्स प्राइस आयपीओ (Fix Price IPO) असे म्हणतात.

उदा. अबक मार्केट मध्ये आयपीओ लाँच करणारी कंपनी आहे आणि तिने आपल्या इन्व्हेस्टमेंट बँक (Investment Bank) आयपीओची किंमत १०० रुपये ठरवली तर गुंतवणूकदार १०० रुपयालाच आयपीओ खरेदी करू शकतो.

 बुक बिल्डिंग आयपीओ (Book Building IPO in Marathi)

ज्या कंपनी ला मार्केटमध्ये आयपीओ लाँच करायचा असतो ती कंपनी इन्व्हेस्टमेंट बँक (Investment Bank) सोबत आयपीओ चा प्राइस बॅण्ड (IPO Price Band) ठरवते आणि तो (IPO Price Band) जारी करते. त्यानंतर ज्यांना त्या कंपनीच्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची आहे ते गुंतवणूकदार त्या प्राइस बॅण्ड (IPO Price Band) मधुन सदस्यता स्वीकारतात.

प्रॉस्पेकट्स म्हणजे काय ? What is Prospectus in Marathi ?

जेव्हा एखादी कंपनी आयपीओ लाँच करते तेव्हा ती सर्वात आधी पब्लिक इश्यु (Public Issue) चा प्रॉस्पेकट्स जारी करते. Prospectus प्रॉस्पेकट्स हे कुठल्याही कंपनी च्या  आयपीओ संबंधित चे एक महत्वाचे पत्रक (Document) असते ज्यात महत्वपूर्ण माहिती नमूद असते.

Prospectus प्रॉस्पेकट्स हे एक प्रकारचे लीगल डॉक्युमेन्ट (Leagal Document) आहे ज्यात कंपनी बद्दल, आयपीओ, पब्लिक इश्यु (Public Issue) या बद्दल संपुर्ण माहिती असते. या Prospectus प्रॉस्पेकट्स मध्ये खालील गोष्टी नमूद असतात:

  • शेअर ची किंमत काय असेल ?
  • कंपनी चा प्रॉफिट
  • किती शेअर जारी होतील ?
  • रिस्क फॅक्टर, आर्थिक बाबी, चांगल्या संधी
  • कंपनीचे भांडवलीकरण
  • कायदेशीर बाबी
  • अंडररायटिंग

आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आवश्यक गोष्टी

  • डीमॅट खाते
  • ट्रेडिंग खाते
  • बँक खाते (मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला)
  • UPIआयडी UPI ID



आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ? How to invest in IPO in Marathi?

IPO आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची? , याबद्दल सविस्तर माहिती आपण आता जाणुन घेवूयात

कुठल्या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ? याचा निर्णय

IPO आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गुंतवणूकदाराची पहिली पायरी म्हणजे त्याला कुठल्या आयपीओ साठी गुंतवणूक करायची आहे हे ठरवणे. सध्याचा गुंतवणूकदार कितीही अपडेटेड असला हुशार असला तरी त्याने आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्या आधी काही गोष्टींची शहानिशा करणे जरुरी आहे. कारण जेव्हा एखादी कंपनी मार्केट मध्ये आयपीओ लौंच करते तेव्हा त्या कंपनी बद्दल अनेक विचारात पडणाऱ्या बातम्या येतात जेणेकरून गुंतवणूकदार होतील. आयपीओ काढणाऱ्या कंपनी च्या जारी केलेल्या Prospectus  मधली माहिती काळजीपूर्वक वाचुन गुंतवणूकदार स्मार्टली ठरवू शकता त्या आयपीओ मध्ये पैसे गुंतवावे कि नाही. प्रॉस्पेकट्स गुंतवणूकदारांना कंपनी च्या आगामी प्रोजेक्ट्स, योजनेबद्दल, बाजारात स्टॉक वाढवण्याच्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देते. त्यामुळे आयपीओ काढणाऱ्या कंपनीच्या Prospectus चे लक्षपूर्वक वाचन करणे हे गुंतवणूकदारांना त्यांच्या आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट  करण्याच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेकरता फार महत्वाचे आहे.

आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी निधी गोळा करणे

एकदाका गुंतवणूकदाराने कुठल्या आयपीओ मध्ये पैसे गुंतवायचे हे ठरवले कि पुढची पायरी येते ती किती पैसे गुंतवायचे? तितके पैसे जमवायची तयारी. यासाठी गुंतवणूकदार पर्सनल लोन सुद्धा घेऊ शकतो किंवा त्याची सेविंग  आयपीओ मध्ये गुंतवू शकतो.

आयपीओ साठी अर्ज करण्यासाठी डीमॅट-कम-ट्रेडिंग खाते उघडणे

डीमॅट खात्या शिवाय गुंतवणूकदाराला आयपीओला अप्ल्याय करता येत नाही. शेअर्स आणि इतर आर्थिक सिक्युरिटी इलेक्ट्रोनिक पद्धतीने साठवण्याची तरतूद डीमॅट खात्याला प्रदान असते. आपले आधार कार्ड, पॅन कार्ड,  ओळख प्रमाणपत्र आणि घराचा पत्ता हि कागदपत्र देऊन कधीही डीमॅट खाते सुरु करू शकतो.

डीमॅट अकाउंट सुरु करण्यासाठी क्लिक करा

आयपीओ साठी अर्ज प्रक्रिया

गुंतवणूकदार बँक अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट द्वारे आयपीओ ला अर्ज करू शकतात. काही फायनांशिअल संस्था गुंतवणूकदारांना बँक अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट एकत्र करून देतात जेणेकरून सर्व वित्तीय सिक्युरिटीज सोबतच हाताळता येतात.

गुंतवणूकदाराने डीमॅट-कम-ट्रेडिंग उघडल्यानंतर, प्रत्येक  गुंतवणुकदाराला Application Supported by Blocked Account (ASBA) Facility ची माहिती असणे गरजेचे आणि अनिवार्य आहे. प्रत्येक आयपीओ मध्ये गुंतवणूक करणाऱ्याला हे अनिवार्य आहे. ASBA हे एक अँप्लिकेशन आहे जो बँकेला अर्जदारांची बँक खात्यातील रक्कम अटकवून ठेवण्याची क्षमता प्रदान करतो. ASBA  अर्ज अर्जदारांना हार्डकॉपि स्वरूपात तसेच डिमॅट स्वरूपात उपलब्ध करून दिला जातो. अर्जदाराला अर्जात डिमॅट खाते क्रमांक, बोलीचा तपशील , पॅन कार्ड नंबर हे सर्व नमुद करावे लागते.

बोली लावणे Bidding

आयपीओ मधील शेअर्स ला अर्ज करताना गुंतवणूकदारांना बोली लावावी लागते. हे कंपनी च्या प्रॉस्पेक्ट्स मध्ये नमूद केलेल्या लॉट साइज वर अवलंबुनं असते. लॉट साइझ Lot Size म्हणजे गुंतवणुकदाराने अर्ज केलेल्या शेअर्स ची किमान संख्या असे म्हणता येईल.

प्राइस रेंज Price Range ठरवली जाते आणि मग गुंतवणूकदारांना त्या प्राइस रेंज Price Range मध्ये बोली लावावी लागते. जरी गुंतवणूकदार बिडिंग केलेली बोली बदलू शकतो तरी त्याला बोली लावताना आवश्यक निधी ब्लॉक करणे गरजेचे असते. allotment initiate होईपर्यंत बँकमध्ये असलेल्या रक्कमेवर व्याज मिळते.

आयपीओ वाटप

एखाद्याला अश्याही परिस्थीचा सामना करावा लागतो कि त्याने मागणी/अर्ज  केलेल्या शेअर्स पेक्षा कमी शेअर्स मिळता. अश्या परिस्थितीत बँक अटकवून ठेवलेली रक्कम अनलॉक करते. कधी कधी एखाद्या भाग्यवान गुंतवणूकदाराला संपूर्ण allotment मिळते अश्यावेळेस ६ वर्किंग दिवसात गुंतवणुकदाराला CAN (कन्फर्मेटरी अ‍ॅलॉटमेंट नोट) मिळते आणि शेअर्स चे वाटप झाल्यावर ते गुंतवणुकदाराच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा होते. हे सर्व झाल्यावर गुंतवणुकदाराला शेअर मार्केट्स च्या स्टॉक लिस्टिंग ची प्रतीक्षा करावी लागते.

निष्कर्ष

जेव्हा जेव्हा एखादी कंपनी मार्केट मध्ये आयपीओ लाँच करायची न्यूज पसरवते तेव्हा सर्व लोकांमध्ये त्याची चर्चा हि होत असते परंतु त्या कंपनी ची स्वतः सखोल माहिती घेणे आणि संबंधित कंपनी ची संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः घेऊन त्या आयपीओ मध्ये गुंतवणूक करायला हवी. तसे केले नाही तर काही वेळेस पैसे गमवायची वेळ देखील येऊ शकते.

आज आपण IPO म्हणजे काय ? आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ? याची माहिती घेतली तुम्हाला काही शंका, असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्यवाद !!!

2 thoughts on “IPO म्हणजे काय ? आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ?”

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti