घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग Earn Money Online without Investment in Marathi

Earn Money Online : आज संपुर्ण जग आर्थिक मंदीच्या विळख्यात आहे या आर्थिक मंदीमुळे खुप लोकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या तर काही लोक कॉस्ट कटिंग च्या नावाखाली नोकरीवरून कमी करण्यात आले. नोकरी हा कायमचा सोर्स ऑफ इनकम समजणाऱ्यांचा खुप मोठ नुकसान झालं आहे. त्यासाठी नोकरी करताना सुद्धा किंवा नोकरीविना एक तरी पैसे कमवायचे साधन असले पाहिजे ज्याने तुमची आर्थिक उणीव भागली जाईल. यालाच आपण एक्सट्रा इनकम पण म्हणु शकतो किंवा नोकरी नसल्यास तुम्ही फुलटाइम सुद्धा घरबसल्या ऑनलाईन पैसे कमाऊ शकता. जे लोक ९ – ६ ची डयुटी करून फावल्या वेळात अजून ५,००० – ३०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमऊ इच्छिता त्यांनी नक्की हा लेख शेवटपर्यंत वाचावा. काही लोक या घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायच्या मार्गांमध्ये इतके यशस्वी झाले आहेत कि त्यांनी त्याची नोकरी सोडुन फुटाइम हेच करायचे ठरवले आहे.

आज आम्ही तुम्हाला एकही रुपया खर्च न करता घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे Earn Money Online मार्ग सांगणार आहोत. विद्याथी पासून रिटायर्ड माणसापर्यंत सर्व लोक या पद्धतीने पैसे कमाऊ शकतील. अगदी घरातील स्त्रिया ज्या नोकरी नाही करत पण घरासाठी पैसे कमवायच्या इच्छा ठेवणाऱ्या सुद्धा गुंतवणुकीशिवाय घरबसल्या ऑनलाईन पैसे कमाऊ Earn Money Online शकतात.

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे फायदे  Benefits of Earn Money Online

 • जास्त गुंतवणुकीची गरज नाही
 • कुठुनही, कधीही, केव्हाही, कितीही वेळ काम करायची मुभा
 • नियमित उत्पन्न उपलब्ध
 • जास्त कौशल्यांची, कुठल्या गोष्टीत पात्रता असायची गरज नाही
 • पटकन शिकता येते
 • कुणाचाच कामाच्या बाबतीत दबाब नाही

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायच्या मार्गांची यादी  List of Ways  To  Earn Money Online

१) युट्युबर (Youtuber)

Earn Money Online : युट्युबर होणे म्हटलं तर खुप कठीण म्हटलं तर खुपच सोप्पे. पण अर्निंग सुरु झाली कि कधीच उत्पन्न येणं थांबणार नाही महिन्याअखेरीस ५,००० पासुन जसे तुमचे चॅनेल प्रचलित होईल तसे तसे अगदी १ लाखा पर्यंत उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. पण यात जितकी सत्यता आहे तितकच परिश्रम देखील आहे. युट्युब चॅनेल सुरु करताना आधी एका कागदावर तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये प्राविण्य आहे किंवा कुठल्या गोष्टीत कौशल्य आहे ते लिहून काढा. आणि त्यातले टॉप चे काही कौशल्य लिस्ट करा आणि त्यावर चॅनेल सुरु करा.

एक लक्षात ठेवा यशस्वी युट्युबर बनतांना तुम्हाची नियमितता  (Consistency) असणे फार आवश्यक आहे. जोमाने सुरवात केली आणि सुरवातीला व्हिव्ज आणि सबस्क्राइबर नाही आले कि हताश होऊन सोडुन देतात पण तसे न करता “कर्म करत रहा फळाची अपेक्षा नको ठेऊस” या उक्तीने काम करावे लागते. एकदा का १००० सबस्क्राइबर आणि ४००० वॉच हवर्स पूर्ण झाले कि चॅनेल मॉनिटाइज होते आणि अर्निंग सुरु होते. आणि एकदा का अर्निंग सुरु झाली कि तुम्हाला कामाचा हुरूप येतो आणि तुम्ही अजून जोमाने काम करायला सुरवात करता.

२) कोरा पार्टनर प्रोग्रॅम (Quora Partner Program)

Earn Money Online : Quora हि एक प्रश्न उत्तरांची (Q&A) सोशल मीडिया वेबसाइट आहे. कोरा हा प्लॅटफॉर्म आपण हव्या त्या भाषांमध्ये वापरू शकतो. आपल्याला जमेल  त्या भाषेत लिखाण करून पैसे कमउ शकतो. कोरा चा कोरा पार्टनर प्रोग्रॅम (Quora Partner Program) म्हणून एक प्रोग्रॅम आहेत यात आपण एलिजिबल झालो को अर्निंग व्हायला सुरवात होते. यासाठी तुम्हाला कोरा वर प्रोफाइल बनवुन प्रश्न विचारायचे आहेत सोबत उपलब्ध असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे ज्याने तुमची प्रोफाइल स्ट्रॉंग बनेल. कोरा पार्टनर प्रोग्रॅम (Quora Partner Program) मध्ये तुम्ही एलिजिबल झालात कि तुमच्या प्रश्नावर कोरा ॲड्स दाखवायला सुरवात करते त्यानुसार पैसे कमवायला सुरवात होते.

३) ऑनलाईन ट्युटोरिंग (Online Tutoring)

तुम्ही जर अभ्यासात हुशार असाल किंवा तुम्ही एखाद्या विषयात उत्तम शिक्षण घेतलेले असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊन कमाऊ शकता.

ऑनलाईन ट्युटोरिंग जॉब्स (Online Tutoring Jobs) साठी खाली दिलेल्या वेबसाइट्स ला भेट द्या.

 • https://www.learntobe.org/
 • https://www.tutor.com/
 • https://www.teacheron.com/
 • https://www.urbanpro.com/
 • https://www.universitytutor.com/
 • https://www.learnpick.in/
 • https://www.superprof.co.in/
 • https://www.tutorme.com/

तुमची प्रोफाइल बनवुन तुम्ही तुमच्या अर्निंग ला सुरवात करू शकता. सुरवातीला बाकीच्या लोकांपेक्षा थोडी कमी फी घ्या कारण या वेबसाइट्स मध्ये ज्या व्यक्तीने जास्त क्लासेस  घेतले त्या शिक्षकांची नवे वर दिसतात.

४) कॅपशनर (Captioner)

आपण जेव्हा ऑनलाईन एखादा चित्रपट, वेब सिरीज, शो बघतो तेव्हा खाली आपल्या भाषेत लिहून येते ज्याला आपण कॅप्शनस असे म्हणतो. यालाच अनुवाद असे पण म्हणतात. हे कोण करते ? तुम्हाला आश्चर्य वाटेल हा पण एक प्रकारचा घरबसल्या ऑनलाईन जॉब आहे. यात तुम्हाला विडिओ ऐकून त्यातील प्रत्येक वाक्याचा अनुवाद किंवा दिलेल्या भाषेत भाषांतर  करायच आहे. ऑडिओ चे भाषांतर वेगवेगळ्या भाषेत करायला सध्या खुप मागणी आहे.

ऑनलाईन कॅपशनर जॉब्स (Online Captioner Jobs) साठी खालील वेबसाइट्स वर भेट द्या  :

 • https://www.rev.com/freelancers/captions
 • https://www.upwork.com/freelance-jobs/captions/
 • https://www.speechpad.com/worker/jobs/captioners
 • https://www.indeed.com/q-Captioning-jobs.html
 • https://www.flexjobs.com/search?search=caption&old=1&jobtype=&schedule=&category=&state=&flex=&sub=1029

अजून काही कंपनी आहेत ज्या ऑनलाईन कॅपशनर जॉब्स देतात ते बघण्यासाठी साठी खालील वेबसाइट्स वर भेट द्या  :

Aberdeen  >>> https://aberdeen.io/careers/
Caption Max >>> https://captionmax.com/about-us/careers/
Caption Media Group >>> http://cmgusa.net/
ASC Services >>> https://viqsolutions.com/careers/
Vitac >>> https://vitac.com/careers/
National Captioning Institute >>> https://www.ncicap.org/
Rev >>> https://www.rev.com/freelancers/captions
CaptioningStar >>> https://www.captioningstar.com/careers/#form-id

५) फ्री ब्लॉगिंग (Free Blogging)

तुम्ही ज्या विषयात पारंगत असाल किंवा ज्या विषयाची माहिती तुम्हाला आहे तुम्ही त्या विषयावर ब्लॉग सुरु करू शकता. जसे कि पाककृती, वास्तुशास्त्र, मातृत्व अनुभव, टेकनिकल माहिती, प्रॉडक्ट्स रेव्हिव, लाइफस्टाईल, हेल्थ, देवधर्म आणि भरपूर काही विषय हि यादी संपणार नाही. तुमचा ब्लॉग हा कुठलही कन्टेन्ट कॉपी केलेलं नको तुम्ही स्वतः लिहिलेला हवा नाहीतर गूगल ऐडसेंस ला अँप्रूवल मिळणार नाही. तुमच्या ब्लॉग वर ३० पेक्षा जास्त पोस्ट्स झाल्या कि गूगल ऐडसेंस (Google Adsense) ला अप्ल्याय करा आणि त्याद्वारे अर्निंग घेणे सुरु करा.

तुम्ही खाली दिलेल्या ब्लॉगिंग साइट्स मध्ये फ्री ब्लॉगिंग सुरु करू शकता.

 • WordPress (www.wordpress.org)
 • Blogger (www.blogger.com)

How To Start Blogging in Marathi ब्लॉगिंग कसे सुरु करावे ?

६) ॲफिलेट मार्केटिंग (Affiliate Marketing)

दुसऱ्या प्रॉडक्ट्स ची जाहिरात करून विकल्या जाणाऱ्या मालावर कमिशन मिळवणे या प्रक्रियेला ॲफिलेट मार्केटिंग असे म्हणतात. तुम्ही ते प्रॉडक्ट्स विकता जे तुम्हाला पसंद पडतात आणि त्याच्यावरील विक्री आणि नफ्यावर आधारित तुमची अर्निंग ठरते. गुंतवणुकीशिवाय घरबसल्या ऑनलाईन ॲफिलेट मार्केटिंग द्वारे पैसे कमवायचे फायदे खालील प्रमाणे आहे :
पार्टनर तुमच्या मनाप्रमाणे निवडु शकतात
खुपच कमी जोखीम
जितके जास्त लोक तुमच्या वेबसाइट ला भेट देतील तितके जास्त लोक तुमच्या ॲफिलेट मार्केटिंग चे प्रॉडक्ट्स बघतील आणि विकत घेतल्यावर तुमचा प्रॉफिट होईल.

७) कंटेन्ट रायटिंग (Content Writing)

फ्रीलान्स कंटेन्ट रायटिंग हा सर्वांत सोप्पा घरबसल्या काम करायचा मार्ग आहे. कंटेन्ट रायटिंग तुम्ही कुठूनही करू शकता तुम्हाला बस तुमचा लॅपटॉप सुरु करायचा आहे वर्ड मध्ये काम करायचं आहे. थोडा अनुभव आल्यावर तुम्ही एक मजबुत कमावणारे कंटेन्ट रायटर बनू शकता.
खाली दिलेल्या साईट्स वर तुम्ही कुठलीही गुंतवणुकी न करता फ्रीलान्स कंटेन्ट रायटिंग काम शोधुन पैसे कमवायला सुरवात करू शकता.

 • https://www.freelancer.com/jobs/?keyword=content%20writing
 • https://www.truelancer.com/freelance-jobs?page=1&category=3

८) रीसेलिंग प्रॉडक्ट्स (Reselling Products)

रिसेलिंग हा एक सामान्य उद्योग झाला आहे आजकाल. घरी असणाऱ्या स्त्रियांसकट नोकरी करणाऱ्या स्त्रिया सुद्धा एक्सट्रा इनकम मिळवण्यासाठी  रिसेलिंग करू शकता. आजकाल खुप छान आणि वेल मॅनेज्ड अँप्स उपलब्ध आहेत रिसेलिंग चा बिझनेस करण्यासाठी. रिसेलिंग म्हणजे खऱ्या अर्थाने १हि रुपया खर्च न करता केलेला बिझनेस. यामध्ये तुम्हाला तुमच्या समूहातील लोकांना प्रॉडक्ट्स मोबाईल वर शेअर करून विकायच्या आहेत. खाली मी काही रिसेलिंग अँप्स ची नावे देत आहे.

 • मिशो (MEESHO)
 • ग्लोरोड (GlowRoad)
 • शॉप १०१ (Shop 101)
 • वी मोर (WeMore)
 • रिसेल मी (ResellMe)

९) ट्रान्सलेशन (Translation)

ट्रान्सलेशन हे एक प्रकारे कंटेन्ट रायटिंगचे काम आहे यात तुम्हाला ज्या भाषेचे कंटेन्ट मिळेल ते दिलेल्या भाषेत ट्रान्सलेट करून द्यावं लागेल. आता ह्या कामाला वेगळ्या अश्या स्किल ची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या मातृभाषेत देखील तुम्ही काम करू शकता. खाली काही वेबसाइट्स देत आहे ट्रान्सलेशन काम मिळ्वण्यासाठीच्या तिथे भेट देऊन तुम्ही काम मिळवु शकता.

 • https://www.flexjobs.com/remote-jobs/translation-travel
 • https://www.linkedin.com/jobs/freelance-translator-jobs/
 • https://www.upwork.com/freelance-jobs/translation-english-hindi/

१०) डेटा एन्ट्री किंवा टायपिंग जॉब्स (Online Data Entry or Typing Jobs)

Earn Money Online : डेटा एन्ट्री हे एक आदर्श काम आहे घरून, पार्टटाइम, किंवा इंटर्नशिप करणाऱ्या लोकांसाठी ज्यांना कामाच्या लवचिकते बरोबर आरामात जीवन हवे आहे.
तुम्ही जवळपास १०० रु. – ५००० रु. दर तास पैसे कमाऊ शकता.

डेटा एन्ट्रीचे काम करण्यासाठी खालील कौशल्ये असणे जरूरी आहे :

 • कामाची नियमितता पाळणे
 • उत्तम टायपिंग स्पीड किंवा कीबोर्ड हाताळणी
 • अचुकता

तुम्ही डेटा एन्ट्रीचे खालील वेबसाइट्स वरून कामं मिळवु शकता.

 • https://internshala.com/internships/work-from-home-data%20entry-jobs
 • https://www.truelancer.com/freelance-data-entry-jobs
 • https://www.upwork.com/freelance-jobs/data-entry/
 • https://www.freelancer.in/jobs/data-entry/
 • https://www.peopleperhour.com/freelance-data-entry-jobs
 • https://www.guru.com/d/freelancers/skill/data-entry/

११) ऑनलाईन ट्रांसक्रिप्शन (Online Transcription)

ऑनलाईन ट्रांसक्रिप्शन मध्ये तुम्हाला ऑडिओ फाईल टेक्स्ट मध्ये कन्व्हर्ट करायची आहे. तुम्हाला ऑडिओ मिळेल जो तुम्हाला ऐकुन त्यातील माहिती टाइप करायचीय.

यासाठी तुम्हाला बस्स एक लॅपटॉप आणि हेडफोन्स आणि चांगले इंटरनेट कनेक्शन हवे आहे. खाली काही वेबसाइट्स देत आहे त्यावर तुम्हाला हे काम मिळेल.

 • https://www.upwork.com/freelance-jobs/transcription/
 • https://www.rev.com/transcription
 • https://scribie.com/jobs
 • https://appen.com/jobs/
 • https://www.nettranscripts.com/careers.html
 • https://www.transcribeme.com/jobs/

१२) प्रश्न आणि उत्तर (Q & A)

आपण गूगल वर सर्वच प्रश्नांची उत्तरे बघतो पण काही प्रश्नांच्या  उत्तरांसोबत  आपण पूर्णपणीं गुगल वर समाधानी नाही होत यासाठी काही संकेतस्थळ आहेत जिथे आपल्याला अगदी योग्य उत्तरे मिळतात. याला Q & A साइट्स म्हणतात. या साईट्स वर त्या त्या विषयाचे एक्सपर्ट्स असतात त्यांना आपण प्रश्न विचारून समाधान करू शकतो.
जर तुम्ही एखाद्या विषयात पारंगत असाल तर, ह्या वेबसाइट्स वर एक्सपर्टस बनुन तुम्ही पैसे कमवू शकता. खाली मी लिंक देत आहे तिथे तुम्ही अकाउंट ओपन करून अर्निंग स्टार्ट करू शकता.

 • https://www.cheggindia.com/

१३) टेस्टिंग (Testing Jobs)

Earn Money Online वेबसाइट्स आणि मोबाइल अँप्स ओनर्स ला कधीच असं वाटत नाही कि त्यांचा युझर एक्सपेरियन्स खराब व्हावा. यासाठी ते टेस्टर्स ला नोकरी देतात. हेच काम तुम्ही घरून देखील करू शकता. आणि तुम्हाला याचे उत्तम पैसे देखील मिळता. वेबसाईट टेस्टिंग साठी काही फार मोठ्या सेटअप ची आवश्यकता नसते.

१४) ग्राफिक्स डीजायनिंग (Graphics Designing)

तुम्हाला जर उत्तम असे फोटो क्लिक करता येत असतील आणि त्यातल्या त्यात एडिटिंग येत असेल तर तुम्ही फोटो वेबसाईट्स वर अपलोड करून पैसे कमाऊ शकता. जर तुम्हाला फोटोग्राफी ची आवड असेल तर कॅमेरा तर असेलच तुमच्याकडे त्याने हाय डेफिनेशन चे फोटो मिळतील. वेबसाईट वर अपलोड केलेले फोटो जेव्हा लोक विकत घेतील तेव्हा त्यावर मिळणारे कमिशन तुम्हाला मिळेल तीच तुमची अर्निंग. खाली काही लिंक्स देत आहे तिथे तुम्ही फोटो अपलोड करू शकतो.

 • https://www.shutterstock.com/
 • https://www.istockphoto.com/
 • https://app.photobucket.com/
 • https://www.fotolia.com/

१५) कस्टमर सर्विस  (Customer Service Jobs)

जर तुमच्यात उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असतील तर तुम्ही कस्टमर सर्विस चा घरबसल्या जॉब करू शकता. त्यासाठी संबंधित टेक्निकल नॉलेज असणं जरुरी आहे किंवा त्याच ट्रेंनिंग तुम्हाला काम देणारी कंपनी देतेच. उत्तम घरबसल्या कमाऊ Earn Money Online शकता.

4 thoughts on “घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग Earn Money Online without Investment in Marathi”

 1. sir apane bahot acche se yah blog me samajaya hai very nice blog aur very useful hai yah blog padhane ke badh bahot logoko bahot fayada hone wala hai.

  Reply

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti