वास्तु प्रमाणे किचन मध्ये तवा ठेवायची पद्धत Tawa Vastu Tips in Kitchen

Tawa Vastu Tips in Marathi आपल्या हिंदू संस्कृतीत अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या धर्माशी बांधुन ठेवतात. बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्याच्यात काही तथ्य नाही तरी पूर्वी पासुन चालु आल्यात म्हणुन आपण पण त्या डोळे झाकुन काही विचार न करता पाळत आलो आहोत. बरेच लोक तर अश्या गोष्टीना अंधश्रद्धा पण म्हणतात पण वास्तु शास्त्रा प्रमाणे काही गोष्टी खुप महत्वाच्या असतात, जसे कि गरम तव्यावर पाणी नाही टाकलं पाहिजे.                               

स्वयंपाक घरातील महत्वाच्या भांडयापैकी एक भांड म्हणजे तवा. तव्या शिवाय स्वयंपाकघर अपूर्ण आहे. तवा चपाती बनवण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत कधी कधी पाणी तापवायला पण वापरले जाते. परंतु वास्तुशास्त्रात तवा स्वयंपाकघरात कसा ठेवावा आणि त्यातून होणारा फायदा आणि तोटा आपल्यला लक्षात घ्यायला हवा.

तवा चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास खालील कारणांमुळे होऊ शकतो स्वयंपाक घरात वास्तुदोष Tawa Vastu Tips :

१) तवा कधीही वापरण्याआधी स्वच्छ धुवुन घ्यावा याने त्यावर जर रात्री किट-कीटक फिरून गेले असतील तर ब्याक्टेरिया पसरले असतील तर ते धुवुन निघतील आणि सात्विक जेवण बनवले जाईल. तसेच हे केल्याने घरातील व्यक्तीचे आरोग्य अबाधित राहते. असे न केल्यास त्याचा दुष्परिणाम पुरुषांवर खास करून पतीवर होतो.

२) सकाळी तव्यावर कुठलाही पदार्थ करण्याआधी तवा स्वच्छ धुतल्यावर मीठ शिंपडावे. शक्यतो सर्व गृहिणी चपातीचा करतात तेव्हाच मीठ शिंपडून घ्यावे, याने घरात अन्न-धान्य मुबलक प्रमाणात राहते कधीही अन्न धान्यांची कमी भासत नाही. त्याच प्रमाणे एक बोनस टीप म्हणजे,

” प्रत्येक दिवशी पहिली चपाती प्राणी-पक्ष्यांना काढुन ठेवावी याने घरात समृद्धी आणि प्रसन्नता नांदते ”  

खडे मीठ, जाड मीठ, मीठ संदर्भातील वास्तु टिप्स साठी इथे वाचा   खडे मीठ किंवा जाड मीठ आणि वास्तु

३) तवा नेहमी बाहेरच्या लोकांच्या नजरेस पडला नाही पाहिजे असा ठेवावा, बाहेरच्या व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडणं वास्तुनुसार वाईट आहे.

४) तवा कधीही उपडी / उलटी ठेऊ नये, चुकुन पण  असे केल्यास काही वाईट बातमी ऐकू येते. किंवा अचानक घडणारी एखादी वाईट बातमी येऊ शकते.

५) बऱ्याच बायका रात्रीची भांडी घासायचा कंटाळा करतात किंवा सकाळ साठी मांडुन ठेवता परंतु हे वास्तु च्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे असे केल्याने आपण आपसुक अलक्ष्मी, दारिद्रता, नाकारात्मकतेला आमंत्रण देतो. अश्याने घरात कानाकोपऱ्यात रोगराई पसरण्यास सुरुवात होते. न धुतलेल्या भांड्यामध्ये मुख्यत्वे कढई, तवा यामध्ये राहू- केतू विराजमान असतात आणि ती अस्वच्छ असल्याने वरील परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी १०-१५ मिनिटे काढुन भांडी घासुन घ्यावीत न जमल्यास कमीत कमी लोखंडाची भांडी जसे कि कढई, तवा घासुन ठेवावा.

६) तवा कधीही खरडु नये. स्वच्छ होत नसल्यास पाण्यात भिजत ठेवावा स्वच्छ निघतो.

७) तव्यात कधीही खाऊ नये म्हणजे तो उष्टा करू नये.

८) लिंबू आणि मीठाचा वापर करून तवा स्वच्छ करू शकता. वास्तुनुसार स्वच्छ आणि चमचमत्या तव्याच्या सहाय्याने तुमचं नशीबही पालटू शकतं. तवा जितका जास्त स्वच्छ तितके जास्त नशीब तुमचे उजळेल.

९) गरम वाफाळत्या तव्यावर कधीही पाणी टाकु नये याने नवरा-बायकोच्या संबंधावर वाईट परिणाम पडतात.

१०) स्वयंपाक घरात तव्याची जागा हि जेवण बनविणाऱ्याच्या डाव्या बाजुला असावी.

अश्याच छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात केलं तर घरात सुख, सकारात्मकता आणि आर्थिक सौख्य नांदेल आणि प्रसन्न वास्तु राहील.
जर तुमचाही वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर वरील तव्यासंदर्भातील उपाय नक्की करून पाहा. तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडुन आलेला दिसून येईल.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

 

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti