Five Elements of Vastu in Marathi – वास्तुशास्त्रातील पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटक

हिंदू धर्मग्रंथानुसार, सृष्टीचे रचेते भगवान ब्रह्मा यांनी, पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटकांचा (Five Elements of Vastu in Marathi ) वापर करून मानवी शरीर निर्माण केले. पृथ्वी (Earth), जल (Water), अग्नि (Fire), वायु (Air), आकाश (Space) हि ती पंचमहाभूतत्त्व आहेत.

एक समृद्ध घराचे निर्माण करण्यासाठी  हे पंचमहाभूतत्त्व महत्वाचे कार्य बजावतात.  भगवंताने मानवी शरीराची रचना अशी केली आहे कि ज्यात आपला आत्मा वास करतो, आणि आपल्याला निरोगी शरीर आणि मन, तसेच शांत वातावरण मिळावे यासाठी पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटकांचा शरीरात तसेच बाहेर सुसंवाद असणे अतिआवश्यक आहे. तसेच आपले शरीर ज्या वास्तु मध्ये राहते तिथले वातावरण सकारात्मक, निरोगी राहण्यासाठी हे पाच घटक सुसंगत राहणे जरुरी आहे.

आपण ह्या (Five Elements of Vastu in Marathi) पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटकांची सखोल माहिती घेऊयात :

  • पृथ्वी आपल्या शरीराला आकार आणि गंध देते तर;
  • आकाश म्हणजे जागेमुळे शरीरात आवाज निर्माण होतो;
  • वायु  स्पर्श भावना प्रदान करते;
  • अग्नी इच्छा, उष्णता आणि भूक प्रदान करते; आणि
  • जल शरीरातील रक्त आणि इतर द्रवपदार्थाचे समर्थन करते.

वास्तुशास्त्रातील-पंचमहाभूतत्त्व-किंवा-पाच-घटक

१) पृथ्वी (Earth) : आपल्या पृथ्वीवरील चुंबकीय आणि गुरुत्वीय शक्तीचा पृथ्वीवरील सजीव, निर्जीव गोष्टीवर परिणाम होतो, तसेच तिचे भौतिक गुणधर्म  आकार, शरीर, रूप आणि रचना तयार करते. उत्तर ध्रुव आणि पृथ्वीच्या दक्षिण ध्रुव दरम्यान चुंबकीय आकर्षण आहे. पृथ्वी घटक आपण राहत असलेल्या इमारतीत, जागेत, परावर्तित होते आणि त्याचे गुणधर्माचा परिणाम राहत्या जागेवर पडतो.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल कि ह्या घटकांचा जागेवर, इमारती वरच नाही तर बांधकाम करायला लागणाऱ्या वस्तुवर पण त्याचा प्रभाव पडतो, बांधकाम किंवा इमारतीच्या रचनेच्या स्थिरतेसाठी हे जरुरी आहे. म्हणूनच कुठल्याही इमारतीत राहायला जाताना किंवा त्याचे बांधकाम करताना प्रथम भूमी पूजन होते. चौरस आकार पृथ्वी घटकाचे प्रतिनिधित्व करतो.

 

२) आकाश (Space) : संपूर्ण सौर यंत्रणा या एका घटकाद्वारे नियंत्रित ठेवली जाते, आकाश / अवकाश याला अनंत किंवा ना संपणारे असे पण म्हणतात. अवकाश हे नक्षत्र, आकाशगंगा, तारा, चंद्र, सूर्य आणि सर्व नऊ ग्रह यांनी भरलेले आहे. 

 

अवकाश म्हणजे विश्व जे, ‘ब्रह्मान्ड’- देवाचे स्थान म्हणून ओळखले जाते.

प्रकाश, उष्णता, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शक्ती आणि चुंबकीय क्षेत्र हे  सर्व अवकाशाची शक्ती आहेत जी बिंदूने दर्शविली जाते. या घटकाचा  मुख्य गुणधर्म ध्वनीची शक्ती आहे. भारतीय पद्धतीच्या घरामध्ये  मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेचे खुप महत्व आहे. वास्तु मधील मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेला ब्रह्मस्थान असे म्हणतात. वर जसे मोकळे दिलेल्या आकृती प्रमाणे आकाश घटक वास्तु च्या मध्य भागी विराजित असते आणि आकाश जसे मोकळे असते त्याप्रमाणे हे घराचे ब्रह्मस्थान देखील मोकळे राहिले पाहिजे. नसल्यास त्याचे वास्तु मध्ये राहणाऱ्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतात.

 

३) वायु (Air) : हा एक अतिशय शक्तिशाली घटक आहे पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीच अस्तित्व वायु घटका वर अवलंबून आहे. आग सुद्धा वायु वर अवलंबुन आहे. हवेच्या प्रवाहाने वास्तु मध्ये झिगझॅग पॅटर्न अवलंबला पाहिजे, म्हणजे दरवाचे सामोरा-समोर नकोत. आपले घर किंवा इमारत अशा प्रकारे डिझाइन केली गेली पाहिजे जेणे करून जे हवेला सर्वत्र प्रसारित होऊन प्रत्येक काना-कोपर्यात पोहोचली पाहिजे. हवेने प्रसारित होऊन त्वरित बाहेर वाहुन जाणाऱ्या संरचनेत घर नसावे. त्यासाठी वास्तु मध्ये गरज नसणारे सजावटीच्या वस्तु नसाव्यात ज्याने जागा आटेल.

 

४) अग्नि (Fire) : अग्नि वास्तु मध्ये हे दक्षिण-पूर्व दिशेचा एक घटक मानला जातो. अग्निचे प्रमुख मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे शब्द (आवाज), स्पर्श. घरामधील गॅस शेगडी हि दक्षिण-पूर्व दिशेस असावी याचे प्रभावी परिणाम बघण्यास मिळतात.  गॅस  शेगडी प्रमाणे इतर इलेक्ट्रॉनिक वस्तु जसे कि ओव्हन, मिक्सर याची देखील दिशा दक्षिण किंवा दक्षिण पूर्व दिशेस असावी. वास्तु मध्ये सुर्याचे व्यवस्तीत वायुविजन झाले पाहिजे कारण सुर्यप्रकाश घरात पडणे खुप आवश्यक आहे मुख्यत्वे स्वयंपाक घरात, त्याने कुठलेही किट-किटके, बुरशी लागत नाही.

 

५) जल (Water) : पाणी हे जीवनातील महत्वपूर्ण घटक आहे. अग्नि वास्तु मध्ये हे उत्तर-पूर्व दिशेचा एक घटक मानला जातो. जल जीवन तर देतेच पण व्यक्तीचे आयुष्य अस्थिर पण करू शकते जर वास्तु मध्ये त्या घटकाचा योग्य ठिकाणी उपयोग नाही केला गेला तर. हिंदु संस्कृतीत पाण्याचे देवता वरुण देव आहेत. पूर्वीच्या काळात पाऊस पैशाने ओळखला जायचा आणि तसाच, वास्तु रचनेत पुरेसे पाणी हे निधीची चांगली आवक दर्शविते. अर्धचंद्र किंवा अर्ध्या चंद्राचा आकार पाण्याचे घटक दर्शवितो. 
  • वास्तु मध्ये पाण्याचे स्रोत हे उत्तर-पुर्व दिशेस असणे योग्य आहे. पाण्याच्या टाक्या, हाफसा, बोअरवेल हि उत्तर-पुर्व दिशेस असावी. 
  • आपल्या निवासस्थानाच्या ईशान्य कोपऱ्यात गंगाजल (पवित्र पाणी) भरलेला कलश ठेवणे खूप शुभ आहे. असे मानले जाते की भगवान विष्णू कलशात वास्तव्य करतात.
  • आरसे म्हणजेच पाणी उत्तर दिशेच्या भिंतीवर किंवा उत्तर दिशेस आरसा ठेवल्याने घरात समृद्धी येते.
  • पाणी पिताना उत्तरेकडे तोंड करावे ह्याने मुबलक संपत्ती निर्माणहोते. यासाठी आपल्या पाण्याशी संबंधित सर्व भांडी जसे कि माठ, पाण्याचे फिल्टर, हंडे आपल्या स्वयंपाक घराच्या उत्तर भागात ठेवण्याचा प्रयत्न करा.
  • पाण्याचे घटक बेडरूममध्ये ठेवू नयेत, यामुळे नात्यात अस्थिरता निर्माण होते, जोडप्यामध्ये भांडणे होतात. नळांमधून पाणी गळती होत असल्यास त्वरित ती थांबवावी कारण हे तुमचे पैसे पाण्याप्रमाणे वाया जाण्याचे किंवा चोरी होण्याचे लक्षण आहे.

—————————————————————————————————————————————-

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti