Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

प्रधानमंत्रीची कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठीची मोठी घोषणा – PM CARES for Children

PM CARES for Children

कोरोना महामारी मध्ये अनेक लहान मुलांच्या पाठीवरचे आईबाबांचे छत्र हिरावले गेले आहे. कोरोनामुळे आर्थिक, मानसिक, कौटुंबिक सुख पुर्णपणे हिरावले गेले आहे. असे म्हणता सर्व गोष्टींचे सोंग करता येते पण पैश्याचे सोंग करता येत नाही पण काही काळ गेल्यानंतर माणसात हिम्मत आणि धमक असेल पैसा परत कमावता पण येतो पण जवळच्या माणसांचं कायमच आपल्या पासुन हिरावलं जाण याहुन जगात मोठं दुःख नाही त्यात प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देणाऱ्या आईवडिलांची तर खुपच आठवण येते.

 

या कोरोना महामारी च्या काळात लहान मुले ज्यांचे आईवडील कायमचे त्यांना सोडून गेले त्यांची काळजी कोण करणार हा प्रश ऐरणीवर होता परंतु हा प्रश केंद्रशासनाकडुन सोडवला गेला आहे.

 

कोरोना महामारी मुळे ज्या लहान मुलांचे पालक हिरावले आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने काही घोषणा केल्या आहेत.

 

अनाथ मुलांना मोफत शिक्षण मिळणार आहे

आणि

पी. एम. केअर फंड मधुन १० लाखाची भरपाई मिळणार आहे.

 

हा सर्व खर्च पी. एम. केअर्स फॉर चिल्ड्रेन फंड मधुन केला जाणार आहे. पी. एम. केअर्स फॉर चिल्ड्रेन हि एक केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेला बघुन दिसून येते कि सरकारला या अनाथ मुलांची काळजी आहे.

 

कोरोना महामारीच्या काळात आईवडील गमावलेल्या मुलांना १८ व्या वर्षा पासुन मासिक स्टायपेंड आणि २३ व्या वर्षी पी. एम. केअर्स मधुन १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्या अनाथ मुलांना उच्च शिक्षण घ्यायच असेल त्यांना कर्जासाठी केंद्र सरकार मदत करणार आहे. उच्च शिक्षणाच्या खर्चाच्या कर्जाची व्याजाची रक्कम पी. एम. केअर फंड मधुन जाणार आहे.

 

१८ वर्षांपर्यंतच्या मुलांना ५ लाखापर्यंत आरोग्यविमा मिळणार आहे त्याचा प्रीमियम पी. एम. केअर फंड मधुन जाणार आहे.

 

हि सर्व माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ट्विट मध्ये दिली आहे. 

 

Supporting our nation’s future!

Several children lost their parents due to COVID-19. The Government will care for these children, ensure a life of dignity & opportunity for them. PM-CARES for Children will ensure education & other assistance to children. https://t.co/V3LsG3wcus

— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2021

या कोरोना महामारीच्या काळात मोदी सरकार ची हि खरच दिलासादायक बातमी आहे. आज कोरोनामुळे आई-वडील गमावलेले मुले या योजनेचा फायदा घेऊन आत्मविश्वासाने उभे राहतील सरकारच्या भरवसे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहुन देशाला हातभार लावतील.

 

आम्हाला विश्वास आहे अश्याच काही उत्तम देशहितपर योजना घेऊन मोदीसरकार प्रत्येक संकटात आपल्या पाठीशी उभे राहातील.

 

जय हिंद !!!

Exit mobile version