Mantra to Get Back Lost Money आपण सर्वच रोज कष्ट करून पैसे कमावतो आणि रोज एक-एक पैसा बाजूला काढुन संसाराला लागेल किंवा आपल्या चैनीच्या गोष्टी विकत घेतो घेतो. त्या प्रत्येक गोष्टीमागे काही आपल्या काही भावना असतात. आणि त्या अचानक हरवल्या किंवा अचानक चोरी गेल्या कि खुप वाईट वाटत. सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटत जेव्हा डोळ्यादेखत ची वस्तु अचानक चोरीला जाते. हरवलेली वस्तु खुप शोधुन सुद्धा मिळत नसेल तर मन हताश होते त्यात ती जास्त किमती असेल तर खुप वाईट वाटते.
आपल्या प्राचीन साधु ऋषीमुनींनी शब्दांची रचना करून असे मंत्र बनवलेले आहेत ज्यांनी चोरी गेलेली वस्तु कुठे ठेवली आहे किंवा कुठल्या दिशेस आहे याची थोडी फार कल्पना मिळु शकते.
जेव्हा वस्तु चोरीला जातो तेव्हा आपण रीतसर पोलिसांकडे तक्रार करतोच. आणि यामध्ये चोरी गेलेली वस्तु कधीपर्यंत परत मिळते किंवा मिळेल पण कि नाही किंवा कुणी चोरलीये हे कधी पर्यंत समजेल याची शाश्वती नसते.
याकरता आपल्याकडून पण एक आध्यात्मिक प्रयत्न म्हणुन जुन्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे एक प्रयत्न करून बघण्यास काय समस्या आहे ?
काही तांत्रिक त्यांना सिद्ध झालेल्या सिद्धी द्वारे अगदी लगेच चोरी झालेल्या वस्तुचे ठिकाण किंवा चोरी केलेल्या व्यक्तीचे वर्णन करतात. भलेही काही लोकांनी मंत्र, साधु लोकांना बदनाम करून ठेवलं असेल तरी काही गोष्टींचे उपाय हे ह्याच लोकांकडून कधी मिळतात.
चोरी झालेली वस्तु परत मिळवण्यासाठी मंत्र क्रमांक १:
” उद्दमुद्द जल जलाल पकड़ चिटी धर पछाड भेज कुन्दाल्या व मुद्दा कहार या कहार “
वरील मंत्राचा जाप कोणत्या दिवशी आणि कसा करायचा ?
होळी, दिवाळी किंवा ग्रहणाच्या दिवशी १०,००० च्या संख्येत या मंत्राचा जाप करायचा.
वरील मंत्राचा जाप कुठे करायचा ?
नदी च्या किनारी रात्री १२१ वेळा हा मंत्राचा जप करून झोपल्याने ७ दिवसाच्या आत स्वप्नात समजून येत कि चोरी कोणी केली आहे आणि कुठे ठेवलाय हे पण समजून येते.
चोरी झालेली वस्तु परत मिळवण्यासाठी मंत्र क्रमांक २:
“ॐ नाहरसिंह वीर हरे कपडे ॐ नाहरसिंह वीर चावलं चुपडे सरसो के फक करे शाह को छोडे चोर को पकडे आदेश गुरु को”
वरील मंत्राचा जाप कोणत्या दिवशी आणि कसा करायचा ?
होळी, दिवाळी किंवा ग्रहणाच्या दिवशी १०,००० च्या संख्येत या मंत्राचा जाप करायचा.
वरील मंत्राचा जाप कुठे करायचा ?
चौकोनी रुपया घ्या ज्याला छिद्र नसेल त्याला दुधाने धुवून लोभान ने धुनी देऊन घ्या. त्यानंतर सव्वा पाव तांदुळ पाण्याने धुऊन गोमूत्र मध्ये भिजवुन सुखावुन घ्या. त्यानंतर शनिवारी पांढरा कपडा अंथरून त्यावर हे तांदुळ टाकून लोभन ची धुनी देऊन ऊन द्यायचं नंतर या तांदूळ ला पूर्वोक्त मंत्र ने ७ वेळा अभिमंत्रित करून घ्या. आणि त्या चौकोनी रुपयाच्या वजनाएवढे तोलून त्यालोकांना खायला द्या ज्या लोकांवर तुम्हाला चोरीचा संशय आहे.
ह्या सर्व गोष्टीची माहिती शाबरी तंत्र शास्त्र मधुन तुमच्यासाठी आम्ही आणली आहे. या शास्त्राच्या मते चोरी झालेल्या वस्तु परत मिळवण्यासाठी किंवा चोर समजण्यासाठी या मंत्राचा आणि उपायांचा उपयोग केल्याने चोरी केलेल्या व्यक्तीला काही तरी हानी होते,किंवा चोर आसपास असेल तर त्याच्या तोंडातून रक्त येते.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.