Kadhipatta in Pregnancy in Marathi गरोदरपणात कढीपत्ता

Kadhipatta in Pregnancy गरोदरपणात  स्त्रिया आपल्या आहाराबद्दल खुप सतर्क असतात. काय खावं, कसं खावं, केव्हा खावं पासून तर किती प्रमाणात खावं या बद्दल पण त्या खुप विचार करतात. त्यात रोज स्वयंपाक करताना प्रत्येक पदार्थामध्ये काय टाकता, किती प्रमाणात टाकता याचा पण गर्भवती स्त्री विचार करते. रोज स्वयंपाक करताना ज्या वस्तु आपण पदार्थात टाकतो त्या मध्ये एक पदार्थ म्हणजे कढीपत्ता. तुम्हाला आश्चर्य वाटेल कढीपत्त्याचे आयुर्वेदिक फायदे वाचुन. परंतु गरोदरपणा मध्ये होणारी आई बाळाच्या बाबतीत इतकी विचार करते कि साहजिक रित्या तिला कढीपत्ता किती प्रमाणात खावा, गरोदरपणात कढीपत्ता खावा कि नाही इथपर्यंत प्रश्न पडतात.

गरोदरपणात कढीपत्ताचे सेवन करणे सुरक्षित आहे का ? Is It Safe To Eat Kadhipatta in Pregnancy?

कढीपत्त्या मध्ये आयरनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे गर्भावस्थेत होणाऱ्या एनिमियाच्या धोक्यापासुन  कढीपत्त्या खाल्ल्यास धोका टळतो. कढीपत्त्यामध्ये आयरन चे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असल्याने गर्भावस्थेत रक्ताच्या कमतरत्याच्या समस्या उध्दभवत नाही.

कढीपत्ता मधील पोषण तत्वे Nutrition Value in Kadhipatta

कढीपत्ता मध्ये भरपूर पोषण तत्वे आणि औषधीय गुणधर्म आहेत, ज्यामुळे कढीपत्ता खुप लाभदायी ठरतो.
  • १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ८१० मिलिग्रॅम कॅल्शिअम असत
  • १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ६०० मिलिग्रॅम फॉस्परस आढळते.
  • १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये १२६०० आइयू कैरिटिन (म्हणजे व्हिटॅमिन ‘अ’ चा प्रकार) असतात.
  • १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ३.१ मिलिग्रॅम आयरन
  • १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये निकोटिनिक एसिड २.३ मिलिग्रॅम
  • १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ४ मिलिग्रॅम व्हिटॅमिन ‘क’
  • प्रोटिन्स

गरोदरपणात कढीपत्ता खाण्याचे काय फायदे आहेत ? हे आपण पाहुयात Benefits to Eat Kadhipatta in Pregnancy

गरोदरपणात कढीपत्ता Curry Leaves in Pregnancy खाल्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत, ज्याने गर्भवती स्त्री च्या तब्येतीत खूप सारे फायदे पडतात. त्यातील काही फायदे आपण आज बघणार आहोत.

१) अपचन होत नाही :

कढीपत्ताच्या सेवनाने पाचक स्राव बनायला मदत होते, ज्याने उलटी, अपचन, मळमळ सारखे गरोदरपणात नेहमी होणारे त्रास होत नाही.

२) एनिमिया होत नाही :

एनिमिया अशी समस्या आहे ज्यात रक्त संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात सक्षम नसते. जी समस्या शरीरात आयरन च्या कमतरतेने उध्दभवते. कढीपत्त्याच्या काही प्रमाणात आयरन असल्याने एनिमिया Curry Leaves in Pregnancy गरोदरपणात कढीपत्ता चे सेवन करणाऱ्या स्त्री ला शक्यतो होत नाही.

३) बॅकटिरिअल इन्फेकशन होत नाही :

गरोदरपणात कधी कधी इन्फेकशन होते. हे न होण्यासाठी गरोदरपणात कढीपत्ता Kadhipatta in Pregnancy खाल्ला पाहिजे कारण कढीपत्ता मध्ये अँटी-बॅक्टरील गुणधर्म असतात ज्याने शरीरातील बॅक्टरीया मारले जातात.

४) किडनी साठी योग्य :

कढीपत्त्याचे सेवन केल्याने मूत्रपिंड स्वस्थ राहते. एका रिसर्च नुसार ३० दिवस कढीपत्ता खाल्ल्याने मूत्रपिंडचे फंक्शन योग्य चालते. गरोदरपणात हे खुप महत्वाचे असते कारण गरोदरपणात मूत्रपिंडावर अधिक दबाव पडतो आणि सारखी लघवी लागते.

५) मधुमेह दूर राहतो :

कढीपत्ता रक्तातील साखर कमी करतो आणि मधुमेहावर नियंत्रण आणण्यास मदत करतो. कढीपत्ता शरीर मधील इन्सुलिन वाढवुन अँटिडायबेटिक प्रभाव वाढवतो. त्यामुळे ज्या गर्भवती स्त्रीला मधुमेह असेल तिने नक्कीच गरोदरपणात कढीपत्ता Curry Leaves in Pregnancy खावा.

गरोदरपणात कढीपत्ता खाण्याचे काय तोटे आहेत ? हे आपण पाहुयात

ह्यात काही दुमत नाही कि कढीपत्ता खाण्याचे अगणित फायदे आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे ‘अति तिथे माती’ म्हणून आपण कढीपत्ता खाण्याचे  काही तोटे पण आहेत का ते पण पाहुयात.
  • ज्या स्त्रिया संवेदनशील आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.
  • कढीपत्ता मध्ये हायपोग्लिसेमिक असते ज्याला रक्तामधील साखर कमी करायला ओळखले जाते. जर जास्त कढीपत्ता खाण्यात आला तर रक्तातील साखर कमी होऊ शकते जे गर्भवती स्त्री ला घातक ठरू शकते.

गरोदरपणात कढीपत्ता खातांना घ्यायची खबरदारी

कढीपत्त्याचे सेवन करताना काही गोष्टीची खबरदारी घेणे खुप जरुरी आहे, विशेषतः गरोदरपणात. त्यामुळे  गरोदरपणात कढीपत्ता Curry Leaves in Pregnancy खाताना काही गोष्टींची खबरदारी घ्यावी ती आपण पाहुयात :
  • सर्वात आधी  गरोदरपणात  कढीपत्ता अगदी प्रमाणात खावा. अति खाऊ नये.
  • गडद हिरव्या रंगाच्या कढीपत्ताचा वापर करावा.
  • कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा बारीक दांडीचा वापर करू नये.
  • वापरात घेण्या आधी पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.
  • किडलेली किंवा छिद्र असलेली पाने वापरू नये
  • गरोदरपणा च्या आधी कढीपत्त्याची एलर्जी असेल तर खाऊ नये.
  • गरोदरपणा च्या आधी कढीपत्त्याची एलर्जी नसेल आणि गरोदरपणात सेवन केल्यानंतर एलर्जी किंवा कसला त्रास होत असेल खाणे बंद करावे.

गरोदरपणात कढीपत्ता खातांना खाद्यपदार्थांमध्ये कसे वापरता येते ? How To Eat Kadhipatta in Pregnancy?

कढीपत्ता वेगवेगळ्या स्वरूपात आहारात घेता येतो. कढीपत्त्याने खाद्यपदार्थाला चव वाढायला मदत होते, तसेच आरोग्यदायी राहायला मदत होते. खालील प्रकारे कढीपत्ता खाद्यपदार्थात टाकता येतो :

गरोदरपणात कढीपत्ताची  Kadhipatta in Pregnancy खालील प्रत्येक पदार्थात ७-८ पाने टाकू शकतो.
  • कढीपत्ता सांबर, ताकाची कढी, मट्ठा यात घालता येतो.
  • कढीपत्ता पोहे, उपमा यात टाकून खाऊ शकतो.
  • गरोदरपणात कढीपत्ताची चटणी बनवून खाऊ शकतो. अधिक प्रमाणात खाऊ नये १ ते २ चमचे खावी.
  • बटाटयाच्या भाजीत कढीपत्ता ची चव खुपच छान लागते. तुम्ही खाऊ शकता.
छोट्या छोट्या दिसणाऱ्या कढीपत्त्याच्या पानात खूप सारे गुणधर्म असतात. याने गरोदरपणात खूप सारे फायदे होतात ते तर आपण पहिलेच सोबत तोटे, खाण्याची पद्धत, गरोदरपणात कढीपत्ता Kadhipatta in Pregnancy खातानाची खबरदारी सर्वच पहिले त्यामुळे कढीपत्ताचे सेवन विचारी बुद्धीने करावा. सोबत काही समस्या असल्यास डॉक्टरांचा नक्कीच सल्ला घ्यावा.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti