Storage Planning of Kitchen in Marathi आपण खुप सुखी आणि नशीबवान आहोत कि आपल्याला ४ महिने मान्सुन अनुभवायला मिळतो. नाही म्हटला तरी हा काळ बराच मोठा असतो आणि हवेतील ओलाव्यामुळे बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. बऱ्याच लोकांना माहित नसेल पण घरातील स्त्रिया उन्हाळ्या पासुनच पावसाळ्याची तयारी करून ठेवता. ह्यात प्रत्येक स्त्री चा आपल्या आपल्या पद्धतीने हातखंडा असतो.
आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या वातावरणानुसार सर्व तयारी करावी लागते.
मी वर सांगितल्याप्रमाणे पावसाळ्याच्या आधी म्हणजेच उन्हाळ्यापासुन घरात काही गोष्टींचा साठा किंवा घरातील असलेल्या वस्तूंचं नियोजन करावे लागते. कारण याचा पूर्ण परिणाम घरातील खर्चावर पडतो. पावसाळ्याच्या आधी मी घरात कोणकोणत्या वस्तुंचा साठा करते ? आणि का ? यासोबत मी त्या साठवलेल्या वस्तु साठवायच्या कश्या? जेणेकरून हवेतील आद्रतेमुळे खराब होणार नाही ते पण मी सांगणार आहे.
पावसाळ्या आधी घरात कुठल्या गोष्टींचा साठा करायचा आणि कसा ? हे खाली दिलेलं आहे Storage Planning of Kitchen in Marathi
१) कांदे :
कांदे उन्हाळ्यात घेतले तर ८-११ रुपये किलो प्रमाणे पडतात. आणि जर पावसाळा सुरु झाल्यावर घेतले तर त्याची किंमत पुढे वाढते ती ८० रुपये किलो पर्यंत पण जाते. आपल्यातल्या बऱ्याच जणांनी ८० रुपये किंमत कांद्याची झाली हि बातमी तर ऐकलीच असेल. हा आर्थिक खर्च वाचवण्यासाठी बऱ्याच स्त्रिया त्याच्या घरातील सदस्यांनुसार मे महिन्यात ५०-१०० किलो कांदे भरून ठेवता. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत कांदा कापुन कडकडीत सुकवुन तयार असतो. म्हणुन मे महिन्यात कांदा भरून ठेवायची योग्य वेळ आहे.
कांदा साठवायचा कसा ?
- कांदा आणल्यावर तो पूर्ण कांदा उपसून उन्हात एकदा वाळवून घ्या.
- उन्हात पसरवताना आपल्याला त्यांची सॉर्टींग करायची आहे. कांद्यावर हात फिरवून त्यावरील एक्सट्रा साल बाजूला काढा, त्यात सडलेला, २ तोंडाचा, काळा झालेला, छोटे कांदे, कांदा बाजुला काढुन घ्या.
- यातील सडलेले कांदे तुम्ही कुंडीत लावून काही दिवसांनी कांदापात काढू शकता. छोटे कांदे तोंडी लावु शकता आणि २ तोंड असलेले कांदे रोजच्या वापरात आधी वापरून घ्या. काळा झालेला कांदा पाण्यात टाकून धुवून, कपड्याने पुसून खायला वापरू शकता.
- आता ज्या ठिकाणी कांदा ठेवायचा आहे ती जागा प्रथम स्वच्छ मिठाच्या पाण्याने पुसुन घ्यावी. ती जागा कोरडी झाली कि त्यावर न्युजपेपर अंथरून घ्यावा.
- यावर सर्वात आधी मोठ्या कांद्याची लेअर रचा आणि मग बाकीचे ठेवा.
- हे कांदे दर १५ दिवसांनी साफ करायचे आहे. त्यात कुठला कांदा सडलेला नाही ना हे बघायचं आहे.
Buy Kitchen Rotating Trolley Portable Storage Rack Square Design Fruits & Vegetable Onion
२) खोबरे :
सुख खोबर जे रोजच्या भाज्यांमध्ये लागते ते देखील उन्हाळ्यातच भरावे लागते. कारण ते सुद्धा खराब व्हायची शक्यता असते म्हणुन दुकानात नियोजन करायला लागते म्हणून महाग होते.
खोबरे साठवायचे कसे ? :
सुख खोबरं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणावे आपल्याला हव्या त्या प्रमाणात. मे महिन्यात कडकडीत ऊन असते आणि या उन्हाचा फायदा आपल्याला घ्यायचाय. त्यानंतर काळी बाजू खाली याप्रमाणे मोकळे रचून उन्हात ठेवायचे. १ दिवस संपूर्ण. आता दुसऱ्यादिवशी मिठाचे पाणी घ्यायचे आणि स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने ह्या पाण्यात बुडवून खोबऱ्याच्या वाट्या पुसून घ्यायच्या आतून बाहेरून. आता संपूर्ण दिवस वाट्या दोघी बाजूने सुकवून घ्या. आता तिसऱ्यादिवशी खोबरेल तेल घेऊन त्या खोबऱ्याच्या वाटीच्या काळ्या बाजूला जाऊन घ्या ऐक वाटी १ थेंब खोबरेल तेल. आणि परत सुकवून घ्या. आता २-३ दिवस कडकडीत सुकवून घ्या. आणि ४ थ्या दिवशी एका स्वच्छ प्लास्टिक च्या पिशवीत भरून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा.
Buy Airtight Plastic Big Boxes for Kitchen Storage Grocery Containers with Handle, 5 Litre
३) तांदूळ :
तांदूळ रोज लागणारी गोष्ट आहे आणि जर ती भरून नाही ठेवली आणि निरंतर पाऊस पडला तर बाहेर किराणा घ्यायला जायला जमत नाही तसेच दुकानातला माल पण किती स्वच्छ असेल आणि हवा तो तांदूळ मिळेल याची शाश्वता नसते.
तांदूळ घरात साठवायचा कसा ?
मी तांदूळ १०० किलो भरते. तांदूळ उन्हात वाळवत नाही म्हणून त्याला घरातच चाळून घेते आणि त्याला बोरिक पावडर चोळून कोठीत भरते. असे केल्याने तांदूळ चे गोळे बांधले जाणार नाही तसेच अळ्या पण पडणार नाही.
४) गहु :
गहू पण रोज लागणारी वस्तु आहे. म्हणुन गहु पण उन्हाळ्यात भरून ठेवावेत.
गहुचा घरात साठा कसा करायचा ?
गहू कडकडीत उन्हात २-३ दिवस वळवून कोठीत भरावे. त्यानंतर धान्यात टाकायचे इंजेक्शन त्या कोठीत खोचावे. वर्षभर कीड पडत नाही.
गहु साठवण्यासाठी खालील प्रमाणे कोठीत साठवावा .
५) लसून :
लसूण एप्रिल महिन्यात घ्यावा. त्यानंतर सुई धाग्यात गजऱ्या प्रमाणे माळून लसणाच्या माळा करून घ्याव्या आणि ओलावा येणार नाही हवेशीर राहतील अश्या ठिकाणी टांगाव्या.
६) तूर डाळ, मूग डाळ, मसूर, हरभरा डाळ, मठ
डाळ प्रकारच्या मोडणाऱ्या पदार्थाना तुम्ही १ किलो मागे १ चमचा एरंडेल तेल चोळून हवाबंद डब्यात साठवू शकता.
खाली दिलेल्या बरण्या परफेक्ट आहेत डाळी साठवणूक करायला. काचेच्या बरण्या असल्याने दिसायला सुंदर आणि वस्तु शोधावी लागणार नाही.
७) लाल तिखट :
उन्हाळ्यात जे लाल तिखट बनवले जाते त्याला पावसाळ्यात गोळे बांधले जातात आणि मग नंतर कीड पडते ते झाले नाही पाहिजे यासाठी त्यात आगपेटी च्या काड्या टाकाव्यात आणि शक्यतो काचेच्या बरणीत भरून ठेवाव्यात.
Buy Glass Jar and Container (2000 ml) with Rust Proof Air Tight Lid
८) चिंच :
उन्हाळ्यात चिंचपण भरपूर मिळते आणि मग पावसाळ्यात काय पूर्ण वर्षभर ती महाग होते, म्हणुन चिंचेची पण साठवणूक करून घ्यावी.
चिंच कशी साठवायची ?
चिंच ला एक दिवस उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर दुसऱ्यादिवशी चिंचेला मीठ लावून लाडू बांधतो तसे चिंचेचे घट्ट गोळे बांधून घ्या. आता हे चिंचेचे गोळे काचेच्या बरणीत घट्ट भरून घ्या.
९) गूळ :
गूळ पावसाळ्यात चिकट होतो म्हणून मी उन्हाळ्यात भरून घेते.
गुळाची भेळी फोडून ती प्लास्टिक च्या डब्यात भरली कि चिकट होत नाही.
१०) कोथिंबीर :
पावसाळ्यात कोथिंबीर खूप जास्त महाग होते म्हणून कोथिंबीर निवडून, उन्हात कडकडीत सुकवून काचेच्या बरणीत साठवून घ्यावी. पावसाळ्यात मिळाली नाही कि थोडी कोथिंबीर पाण्यात भिजवून वापरता येते.