Ways To Eat Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा खाण्याची पद्धत

Mango in Pregnancy in Marathi : जेव्हा तुम्हाला तुम्ही गरोदर असल्याचे समजते अगदी तेव्हापासून तुम्ही खाण्या पिण्याच्या बाबतीत अगदी चिकित्सक बनतात. तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून जीवनशैलीत बदल करण्याचे सल्ले मिळतात. त्यात काय खायचं, काय प्यायचं, किती प्रमाणात खायचं, कुठल्या वेळेत खायचं हे सर्वच सल्ले असतात. तुम्हाला तुमचे घरातील, नातेवाईक, मित्र मंडळी सर्वच आहारात काय बदल करायचे ? काय खायचे काय खाल्याने काय होते ? याचे अनुभव सांगायला सुरवात करतात मग यासर्व मुळे गरोदर स्त्री गोंधळात पडते, विचलित होते काय खावे काय न खावे या बाबतीत.
गरोदरपणात डॉक्टर फळांचे सेवन करण्यास सांगता पण त्यामध्ये काही फळ खावी न खावी याबाबतीत घरातील लोकांचे सल्ले असतात. यामध्ये खूप बाऊ करण्यात आलेलं फळ आहे फळांचा राजा ‘आंबा‘. आज आपण  Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा खाऊ शकता कि नाही याबाबत माहिती घेणार आहोत.

गरोदरपणात आंबा खाणे सुरक्षित आहे का ? Is It Safe To Eat Mango in Pregnancy ?

गरोदरपणात पिकलेले आंबे खाण्याचे खुप फायदे आहेत ज्यांच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. गरोदरपणात प्रत्येक गोष्ट प्रमाणात खायला हवी त्यात आंबा पण आहे. गरोदरपणात आंबा देखील प्रमाणात खावा. आंबा सुपरफूड मध्ये मोडला जातो. आंबा मध्ये अ, ब आणि क जीवनसत्व आढळतात. त्यामुळे गरोदरपणात आंबा नक्कीच काही प्रमाणात खावा. तसेच आंब्या मध्ये फोलिक ऍसिड, लोह, पोटॅशिअम इत्यादी देखील असतात. त्यामुळे गरोदरपणात पायावर ज्यांना सूज येते त्यांनी जर योग्य प्रमाणात  गरोदरपणात आंबा खाल्ला तर त्यांना पायावर सूज कमी प्रमाणात किंवा काहींना येणार पण नाही. आंबा हा ऊर्जेचा आणि अँटिऑक्सिडेन्टचा उत्तम सोर्स आहे त्यामुळे Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा वगळावा हि चुक ठरू शकते. पण याचा अर्थ असा नाही कि अतिप्रमाणात आंब्याचे सेवन करावे. आंबा Rich Source आहे Vitamin C चा त्यामुळे गर्भवती बाईची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा खाऊ नये नाहीतर उष्णता वाढून बाळाला त्रास होऊ शकतो किंवा गर्भपात होतो असे काही सल्ले मिळतात पण हे पूर्णपणे खरं नाही. किंवा याचे ठोस असे पुरावे देखील नाही. 

आंब्याचे पोषण मूल्य  Nutrition Value  in Mango

healthline नुसार १६५ ग्रॅम आंब्यात म्हणजेच १ कप आंब्यात खालील पोषण मूल्य आढळतात

घटक पोषण मूल्य
कॅलरी ९९
प्रथिने १.४ग्रॅम
कार्ब २४.७ ग्रॅम
चरबी ०.६ ग्रॅम
आहारातील फायबर २.६ ग्रॅम
व्हिटॅमिन सी ६७%
तांबे २०%
फोलेट १८%
व्हिटॅमिन बी 6 ११.६%
व्हिटॅमिन ए १०%
व्हिटॅमिन ई ९.७%
व्हिटॅमिन बी 5 ६.५%
व्हिटॅमिन के ६%
नियासिन ७%
पोटॅशियम ६%
रिबॉफ्लेविन ५%
मॅंगनीज ४.५%
थायमिन ४%
मॅग्नेशियम ४%

गरोदरपणात आंबा किती प्रमाणात खावा ?  

आंब्या मध्ये खुप ऊर्जा आणि कॅलरी असतात म्हणून डॉक्टरांनी वजन वाढवण्याचा सल्ला दिल्यास गरोदरपणात आंबा खाण्यास काही हरकत नाही. गरोदरपणात शेवटच्या ३ महिन्यात ऊर्जेची खूप गरज असते तेव्हापण खाऊ शकतो. १ ते २ मध्यम आकाराचे आंबे खाऊ शकता, त्यापेक्षा जास्त अपायकारक ठरू शकता. आंबा कश्या पद्धतीने खावा याची माहिती खाली दिली आहे ती नक्की वाचा. 

गरोदरपणात आंबा खाण्याचे आरोग्यदायी फायदे Benefits to Eat Mango in Pregnancy

 • आंबा खुप गोड असल्याने गरोदरपणात साखर खायची जी इच्छा होते ती होत नाही.
 • आंब्यात फोलिक ऍसिड असल्याने पायावर सूज कमी येते किंवा येत पण नाही.
 • आंब्यात कॅलरी जास्त असल्याने फ्रेश आणि ऊर्जा येते मरगळल्यासारखे वाटत नाही.
 • आंब्याची चव गोड आंबट असल्याने सकाळी उठल्यावर जी मरगळ असते किंवा मळमळ होते ते होत नाही. तसेच व्हिटॅमिन ६ मुळे हा त्रास सहन होण्यास बळकटी येते.
 • आंब्यातील व्हिटॅमिन अ मुळे बाळाची हाडे, दात मजबूत होतात, डोळे सुंदर होतात, मज्जासंस्थेचे पोषण होते. 
 • आंब्यातील व्हिटॅमिन क मुळे अकाली प्रसूती होण्याचा धोका टळतो.
 • गर्भवती स्त्रियांचा अशक्तपणा दूर होण्यासाठी मदत होते.

गरोदरपणात आंबा खाण्याचे दुष्परिणाम 

नैसर्गिक रित्या पिकवलेले आंबे खाल्यास काही दुष्परिणाम नाही आहेत परंतु कॅल्शिअम कार्बाइड मध्ये पिकवलेले आंबे खाल्यास त्याचे वाईट दुष्परिणाम आईवर आणि बाळावर होण्याची शक्यता आहे. अर्सेनिक आणि फॉस्फरस घटक कॅल्शिअम कार्बाइड मध्ये असतात ते शरीरास इतर वेळेस पण घातक असतात. यामुळे 
 • अतिसार 
 • डोकेदुखी 
 • पोटदुखी 
 • जुलाब 
 • मूड स्विंग होऊ शकते 

गरोदरपणात आंबा खाण्याची पद्धत Ways To Eat Mango in Pregnancy 

वर सांगितल्याप्रमाणे १ ते २ आंब्याचे सेवन गर्भवती स्त्री ने केले पाहिजे पण ते पण कसे खायचे ते आपण पाहुयात. 
 • पिकलेले आंबे घ्यावे आणि त्यांचा रस काढुन घ्यावा त्यात १ ते २ चमचे वितळलेले साजुक तुप घालावे आणि चिमुटभर वेलची पुड घालुन आमरस खावा.
 • आमरस करताना त्यात दुध किंवा पाणी घालु नये. किंवा कुठलाही अन्य फळाचा रस घालु नये.

तिमाहीनुसार आंबा कुठल्या प्रमाणात खावा ?

 • १ ते ३ : १ छोटा आंबा 
 • ४ ते ६ : १ ते २ मध्यम आंबा 
 • ७ ते ९ : १ छोटा आंबा 
असे केल्याने प्रमाणात आंबा खाल्ला जातो आणि त्रासपण होत नाही.
वर दिलेल्या प्रमाणात आंबा खाणार असाल तर तुम्ही आठवड्यातून ३ वेळा आंबा खाऊ शकता. त्यापेक्षा जास्त वेळा खाणे शक्यतो टाळा. 
आंबा हा आंब्याच्या मौसम मध्येच खावा इतर मौसमात अजिबात खाऊ नये.

गरोदरपणात आंबा खाण्यासाठी कसा निवडावा ?

 • आंबा कृत्रिम रित्या न पिकवलेला भेटला तर तोच घ्यावा.
 • आंबा खाण्याआधी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवुन घ्यावा.
 • आंब्याच्या साली खाऊ नये त्यावर केमिकल टाकले असतील तर ती खाण्यात येणार नाही.
 • कच्चा आंबा खरेदी करून घरातच तो पिकवावा याने कॅल्शिअम कार्बाइड मुक्त आंबा खाण्यास मिळेल.

1 thought on “Ways To Eat Mango in Pregnancy गरोदरपणात आंबा खाण्याची पद्धत”

 1. you’re reаlly ɑ good webmaster. The website loading speed іѕ amazing.
  It ҝind օf ferls that you are doing anyy unique trick. Fuгthermore, Τhe contentѕ аrе masterwork.
  yoᥙ hɑve done a fantastic job іn this matter!

  Reply

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti