स्वयंपाक घरात वास्तुशास्त्राप्रमाणे गॅसची काळजी घ्या, नकारात्मकता राहील कायमची लांब – Vastu Tips for Gas in Marathi

Vastu Tips for Gas in Marathi : स्वयंपाकघर योग्य दिशेने आहे तरीही वित्तीय हानी, आरोग्य संबंधित तक्रारी, नकारात्मकता घरात असेल किंवा स्वयंपाक करताना उत्साह वाटत नसेल तर एकदा आपण आपला गॅस योग्य ठिकाणी आणि वास्तुशास्त्राच्या नियमानुसार आहे कि नाही याची दखल नक्की घ्या.

स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असेल तर त्याचा स्वयंपाककरणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम पडतो, शिजवणाऱ्या अन्नावर पण नकारात्मक परिणाम होतो. त्याचप्रमाणे गॅस सुद्धा चुकीच्या पद्धतीने हाताळला जात असेल तर समस्यांना आपसुक आमंत्रण मिळते.

आज आपण जाणून घेऊया की, वास्तुनुसार घरातील स्वयंपाकघरातील गॅस कोठे असावा आणि स्वयंपाक घरात वास्तुशास्त्राप्रमाणे Vastu Tips for Gas in Marathi गॅसची कशी रचना आणि काळजी घ्यावी …

१) स्वयंपाकघरातील गॅस ओटा हा  दक्षिण-पूर्व दिशेस असावा त्यात गॅस ची दिशा पुर्व असावी म्हणजे स्वयंपाक करणाऱ्या स्त्री च तोंड हे पुर्व दिशेस असावे. स्वयंपाकघरातील गॅस ओटा हा दक्षिण-पश्चिम भागात तर त्या वास्तु मधील कुटुंबात पुरुष वंश टिकत नाही किंवा कमतरता असते.

२) चुकीच्या दिशेने गॅस ठेऊन अन्न तयार केल्याने पुरुषांमध्ये सतत ताप, मधुमेह आणि उच्च रक्तदाब इत्यादी समस्या उद्भवतात. तसेच स्त्रीयां मध्ये गुढघे दुखी, अपचन, ताणतणाव या समस्या हळु-हळु उध्दभवतात.

३) गॅस स्टोव्ह जवळ भांडी घासायचे बेसिन किंवा पाणी  भरून ठेवलेले नको. म्हणजेच गॅस स्टोव्ह (अग्नि घटक) आणि पाण्याचे स्त्रोत (जल घटक) एकत्र ठेवणे कुटुंबातील सदस्यांमधील घरात संघर्ष आणि वारंवार भांडणाचे निमित्त आहे. जागेअभावी असे असल्यास तर यावर एक उपाय आहे तो म्हणजे या दोन गोष्टीमध्ये एखादे छोटे रोपटे ठेवावे किंवा लाल चिकट टेप ओट्याला लावावा.

४) गॅस हा देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा चे प्रतीक आहे त्यामुळे रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस पाण्याने स्वच्छ करावा. तो खरगटा ठेऊ नये. अश्याने घरातील अन्न-धान्य मध्ये भरभराट होते.

५) रोज सकाळी एक नित्य क्रम असावा तो म्हणजे गॅस ला हळदी कुंकू लावून स्वयंपाकाला सुरवात करावी.

६) तांदुळाच्या पिठाचे पाणी बनवुन गॅस वर जिथे थोडी जागा असेल तिथे खालील चित्रातील रांगोळी काढावी.

७) एक चौकोनी तांब्याचे पात्र मध्ये रोज बनवलेल्य जेवणाचा एक घास त्यात टाकुन गॅस वर आहुती द्यावी.

८) गॅस स्टोव्हच्या वर कोणताही शेल्फ ठेवू नये.

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti