संपत्तीसाठी झाडुच्या वास्तु टिप्स Vastu Tips For Broom in Marathi

Vastu Tips For Broom in Marathi आपल्या हिंदु धर्माच्या ग्रंथांमध्ये लिहिलेय कि घरात समृद्धी राहण्यासाठी घर नीटनेटके आणि साफ असले पाहिजे. असेही म्हटले जाते कि स्वतःच घर घरात नकारात्मकता आणि दारिद्रता वाढु नाही देत. यासाठी झाडू हि सामान्य आवश्यक असणारी गोष्ट आहे. झाडू घर साफ ठेवण्यास आपल्याला मदत करते आणि आपण काम झालं कि कुठेही ठेऊन देतो. पण तुम्हाला सांगतो झाडू कुठेही ठेवणं हे वास्तु शास्त्रा प्रमाणे चुकीचं आहे. असेच काही चुकीच्या गोष्टी केल्याने आई लक्ष्मी माता रुष्ट होते आणि वास्तु पासुन लांब राहायला सुरवात होते. वास्तुशास्त्रा प्रमाणे झाडुच्या नियमांचा विचार न करता झाडु कुठेही ठेवणं अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानास, गरिबीला निमित्त होते.
झाडू ला वास्तु मध्ये विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात झाडू घरात संपत्ती, पैश्यासारखा लपवुन ठेवला पाहिजे. झाडु उघडयावर ठेवणे आणि नेहमी नजरेस राहणे अशुभ मानले जाते. तसेच याची दक्षता घ्या कि झाडू कधीही उभा नसावा, म्हणजेच झाडू हा जमिनीवर पडून असला पाहिजे.

 आपणास झाडु घरात कुठे ठेवला पाहिजे आणि झाडुचा वास्तुशी Vastu Tips For Broom काय संदर्भ आहे याची माहिती आपण आज देणार आहे. 

  • झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा कि जेव्हाही झाडू खराब व्हायला सुरवात होईल तेव्हा झाडू लगेच बदलला गेला पाहिजे.
  • झाडु खरेदी करताना कृष्णपक्षातला शनिवार बघून खरेदी करावा. शनिवारी झाडु खरेदी केल्याने शनि देव देखील प्रसन्न होतात. असे करणे शुभ असते.
  • पोथी-पुराणां मध्ये तर असं पण नमूद केलाय कि ज्या घरात अस्वच्छता असते तिथे रोग-राई पसरते.
  • वास्तु प्रमाणे झाडू नेहमी पश्चिम, दक्षिण दिशेस किंवा दक्षिण-पश्चिम दिशेस ठेवावा याला कारण म्हणजे या दिशांमध्ये पंचमहाभूतत्त्व किंवा पाच घटकांपैकी एक तत्त्व आहे ते म्हणजे पृथ्वी तत्त्व.
  • सुर्यास्त झाल्यावर झाडू मारू नये अश्याने लक्ष्मी रुसते, गरज पडल्यास तुम्ही ओल्या कपडयाने पोचा करू शकता.
  • हिंदू पुराणकथांमध्ये झाडूला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की घरातील  कोणत्याही सदस्याने झाडूला पाय मारू नये.
  • घर झाडायचा झाडु अपवित्र, घाणेरडया, ओल्या जागी वापरू नये त्यासाठी वेगळा झाडु ठेवावा.
  • घरातील सदस्य किंवा पाहुणे घराबाहेर पडल्यावर कधीच त्वरित झाडु मारू नये.
  • तुटका झाडु घरात कधीच ठेऊ नये झाडु तुटल्यास लगेच नवा झाडु वापरायला काढावा. तुटका झाडु अशुभ मानला जातो.
  • झाडु शक्यतो लक्ष्मीपुजनेच्या दिवशी एखादा जास्त घ्यावा त्यादिवशी रितसर पुजा करून नंतर वापरण्यास काढावा.
  • पोथी-पुराणा प्रमाणे घराला झाडुहा सूर्योदय झाल्यावर आणि सूर्यास्त होण्या आधी लावावा याने घरात लक्ष्मी वास करते.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti