श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi

Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi

तारक मंत्र

ह्या दोन शब्दातच त्याचा संपूर्ण अर्थ दडला आहे. जो मनुष्य आजाराने त्रासलेला आहे, चिंतेने ग्रासलेला आहे; त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही तरी उपाय करत असतातच स्वामीनी तारक मंत्र देऊन आपल्याला अनमोल भेट दिली आहे.

तारक मंत्राच्या अफाट शक्तीचा विचार आपण कुणीही करू शकत नाही. शेवटी ती स्वामींची शक्ती …अगम्य आणि अद्भुत शक्ती. तारक मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात आणि मानसिक बळ येते कि नाही ते.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Shree Swami Samarth Tarak Mantra in Marathi

निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।३।।
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।४।।
विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
।। श्री स्वामी समर्थ ।
श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र” प्रत्येकाने दररोज कमीत-कमी तीन वेळा किंवा निदान दिवसभरात एक वेळा तरी म्हणावा.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचा जाप कधी करावा ? When to chant Shri Swami Samarth Tarak Mantra ?

  • श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचा जाप मनशांती साठी रोज करावा.
  • कुठल्या महत्वाच्या कार्यास जात असल्यास Shri Swami Samarth Tarak Mantra श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचा जाप करावा.
  • कुठल्याही गंभीर प्रसंगी श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचा जाप करावा.

श्री स्वामी समर्थ तारक मंत्रचा जाप कसा करावा ? When to chant Shri Swami Samarth Tarak Mantra ?

  • इतर वेळेस एकाजागी शांत बसुन सुद्धा तुम्ही जाप करू शकता.
  • वेळेच्या अभावी घरातील काम करताना देखील हा जाप करू शकता.
  • वेळेअभावी तुम्ही ऑडिओ ऐकून सुद्धा जाप करू शकता.
  • गंभीर प्रसंग ओढवल्यास तारक मंत्रचा जाप करत असताना एक अगरबत्ती लावावी व त्या अगरबत्तीची विभूती एका पाण्याने भरलेल्या पेल्यात पडू द्यावी. तारक मंत्र म्हणून झाल्यावर हे पाणी तीर्थ म्हणून प्र|शन करावे तसेच घरातील इतरांनाही द्यावे.

स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे Swami Samarth Tarak Mantra Benefits

जर तारक मंत्र तुम्ही हळू-हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती, ऊर्जा अंगात संचारते हा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. तारक मंत्रात एक कडवे आहे कि

“अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी”

फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी अशक्य गोष्ट असून द्या ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे लोक तुम्हाला विचारतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती ?

तेव्हा तुम्ही मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि “माझ्या पाठी मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत”, ह्या जगाचा जो एकाच मालक आहे “

असे स्वामी महाराज माझ्या मागे नेहमी राहतील असे सर्वानी म्हटले पाहिजे.

स्वामी समर्थ तारक मंत्र PDF

स्रोत

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti