Salt and Vastu Tips in Marathi घरात सुख-समृद्धी, प्रसन्नता, शांती नांदावी यासाठी वास्तुचे नियम पाळणे अतिआवश्यक आहे. तुम्हाला पण वाटत असेल कि आपल्या घरात पैश्यांची चणचण कधीच भासु नये, सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, मुलांचे अभ्यासात लक्ष एकाग्रचित्त व्हावे तर आजपासुनच सर्व वास्तुचे नियम पाळायला सुरवात करा.
तुम्हाला माहित आहे का दैनंदिन जीवनातील वापरात असणारी वस्तु तुमच्या सर्व समस्या चुटकीसरशी घालवु शकते. ती गोष्ट आहे मीठ. हो खडे मीठ Salt and Vastu Tips हा अनेक वास्तु दोषा वरील उपाय आहे.
मीठ जसे अन्नाला चव देते तसेच मिठाचे गुणधर्म वास्तुत आनंद आणि भरभराट आणु शकते आणि तुमच्या सुखात भर घालते. मिठाला नेहमी नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरले जाते. म्हणुन पुर्वीपासून मिठाचा उपयोग नजरदोष, वाईट दृष्टी काढण्यासाठी केला जातो.
वास्तुशास्त्रा प्रमाणे जाड मीठ Salt and Vastu Tips काय उपयोग आहे आपण बघूया :
१) रोज फरशी पुसतांना त्या फरशी पुसायच्या पाण्यात थोडे जाड मीठ घालून फरशी पुसावी. याने नकारात्मकता निघून जाते आणि तुम्ही लगेच प्रसन्नता अनुभवाल.
२) जाड मिठाचे खडे लाल कपडयात गुंढाळून मुख्य दरवाजाच्या वर बांधल्याने वाईट शक्तींचा वावर घरात शिरत नाही. तसेच कुणी व्यक्ती नकारात्मकता घेऊन घरात येत असेल तर ती नकारात्मकता बाहेरच राहते.
३) घराचा उंबरा जाड मिठाच्या पाण्याने धुतल्याने किंवा जाड मिठाच्या पाण्याने पुसल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो.
४) जो व्यक्ती घरून काही व्यवसाय करतो त्या व्यक्तीने त्याची संपत्ती, कामाचे कागद ठेवायच्या जागी लाल कपड्यात जाड मीठ बांधलेली पोटली ठेवावी कामात प्रगती होते आणि अडथळे दूर होतात.
५) काचेच्या वाटीत मीठ भरून ती वाटी बाथरूम आणि टॉयलेट च्या खिडकीत कोपऱ्यात ठेवावी याने नकारात्मकता दूर होते.
६) स्वयंपाक घरातील मिठाची साठवणुक नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत करावी आणि शक्यतो त्यात ४-५ लवंगा टाकाव्यात याने स्वयंपाक करणारी स्त्रीला प्रसन्न चित्ताने स्वयंपाक करण्याचा आनंद अनुभवता येतो. हे तुम्ही करून बघा नक्कीच फायदा होईल.
७) मुख्यतः मीठ नेहमी शुक्रवारीच आणावे त्याने घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि सदैव लक्ष्मीचा वास राहतो.
८) कामाचा अधिक ताण तणाव वाढला असेल किंवा घरात काही टोकाची भांडणे झाल्यास मिठाच्या पाण्यात पाय ठेऊन १० मिनिटे आराम घ्यावा याने डोके शांत होते आणि योग्य निर्णय घेऊन भांडणे दूर करण्यासाठी डोके शांत होते.
९) लिंबू आणि मीठाचा वापर करून तवा स्वच्छ करू शकता. तवा जितका जास्त स्वच्छ तितके जास्त नशीब तुमचे उजळेल.
१०) सकाळी तव्यावर कुठलाही पदार्थ करण्याआधी तवा स्वच्छ धुतल्यावर मीठ शिंपडावे. याने घरात अन्न-धान्य मुबलक प्रमाणात राहते कधीही अन्न धान्यांची कमी भासत नाही.
११) दर आठवड्याला घरातील लहान मुलांची मिठाने नजर काढावी याने वारंवार होणारी नजरबाधा दूर होते.
१२) एका स्प्रे च्या बॉटल मध्ये जाड मिठाचे पाणी आणि निलगिरी ची ७-८ थेंब टाकून ते पाणी रोज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्प्रे केल्याने वास्तु मध्ये राहणाऱ्या लोकांचे आरोग्य निरोगी राहते.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.
मुद्दा क्र ७ मध्ये म्हटलेलं बरोबर आहे मीठ शुक्रवारी आणावे, परंतु शुक्रवारी सुर्य उगवताना पासून एक तास शुक्राची होरा असते त्यावेळेस आणणे चांगले अन्यथा सकाळी आकरा पूर्वी देखील चालू शकेल. तसेच दुकानात केवळ मीठ च घेवून यावे अन्य दुसऱ्या वस्तू पुन्हा खेप घालून घेवून यावेत. आणलेले मीठ स्वैपाक घरात आणून मनानं लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी. त्यासाठी अंघोळ केली नसेल तरी मन साफ असावे.
इतर मुद्दे बरोबर आहेत.
धन्यवाद सर,
असच मार्गदर्शन करत राहा.