Private Yoga Classes in Alandi आम्हाला असे वाटते कि योगामुळे प्रत्येक व्यक्तीला फायदा होतो. योगा करण्यासाठी तुमचे वजन, वय किंवा लिंग याची काहीही मर्यादा नसते. आम्ही तुम्हाला आळंदी, चऱ्होली बुद्रुक येथील एका अतिशय हुशार आणि योगा मध्ये खोलवर माहिती घेऊन शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षका बद्दल माहिती घेणार आहोत.
तुमच्या गरजा आणि क्षमतेनुसार तयार केलेला खाजगी योग वर्ग (Personalize Yoga Class) हा निरोगी योगाची सवय लावण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे!
योगा सुरुवात करणाऱ्यांना मूलभूत गोष्टी प्रभावीपणे शिकण्यासाठी स्पष्ट स्पष्टीकरण आणि सूचना आवश्यक असतात.
तुम्हाला योग प्रशिक्षकाची गरज का आहे? Why do you need a yoga instructor ?
- खाजगी योग क्लास तुमच्या गरजांनुसार आणि उद्धिष्ठनुसार बनवले जातात
- खाजगी योग क्लास तुम्हाला वेळ आणि स्थानावर बंधन आणत नाही.
- खाजगी योग संवादावर बांधला जातो
- खाजगी योगामुळे तुम्हाला योगाचे सखोल ज्ञान मिळेल
- खाजगी योग तुम्हाला तुमच्या स्वतःच्या सराव प्रवासासाठी तयार करेल
- खाजगी योग ही तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे
आळंदीतील सर्वोत्तम योग प्रशिक्षक कोण आहे? Who is Best Yoga Instructor in Alandi ?
श्रीमती शुभदा राहुल भंटार या आळंदी, चऱ्होली बुद्रुक या भागातील उत्तम योग प्रशिक्षक आहेत. (Mrs. Shubhda Rahul Bhantar is a great yoga instructor from Alandi, Charholi Budruk area.)
KnowinMarathi टीम ने श्रीमती शुभदा राहुल भंटार यांची योगा क्लास साठी एक मुलाखत घेतली ती तुम्ही नक्की वाचा,
१) तुम्ही कधीपासून योगाभ्यास करत आहात ?
मी साधारणपणे १७ वर्षांपासून योगाभ्यास करत आहे.
२) तुम्ही सुरवात कशी केली ? तुम्ही योगामध्ये काही रीतसर शिक्षण घेतले आहे का ?
सुरवातीला मी योगासने शिकण्यास जात होते नंतर मला त्यामध्ये गोडी निर्माण झाली आणि मग मी ठरवलं कि आपण योग शिक्षक व्हावे मग मी YTC म्हणजेच योग शिक्षक कोर्स केला. परंतु जेव्हा मी योगा चे क्लास घेण्यास सुरवात केली तेव्हा मला जाणवले कि आपले ज्ञान अजून अपूर्ण आहे आणि मग मी पुढे Ramamani Iyengar Memorial Yoga Institute मधून योगाचा ६ वर्ष सराव केला. यामध्ये प्रत्येक लेव्हल असते ती मी पूर्ण केली आणि मी intermediate course 2 पण पूर्ण केला.
३) तुम्ही कुठल्या प्रकारचे योग शिकवतात ?
मी हठयोग म्हणजेच अष्टांग योग आणि मेडिकल योगा घेते.
४) योगा बद्दल तुम्हाला काय वाटते ?
शरीर आणि मनाचा थकवा दूर होतो योगामुळे.
५) तुम्हाला काय वाटते योगाचा आनंद कोण घेऊ शकते ?
योगा चा आनंद कुठल्याही वयाचा व्यक्ती घेऊ शकतो मग तो लहान असो किंवा वृद्ध. आजारी व्यक्ती, स्त्रिया पुरुष सर्वच योगा करू शकता. शारीरिक व्याधी असणारे सुद्धा योगाभ्यास करू शकता.
६) तुमच्याकडे योगा क्लास कसा लावावा ?
तुम्ही मला दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता +91 92712 90781
तुमच्यासोबत रीतसर बोलून तुमचा योगा क्लास डिझाईन केला जाईल. जसे कि काही मानसिक तणाव असेल तर त्याप्रमाणे सेशन्स ठेवता येईल किंवा काही व्याधी असतिल तर त्याचा अभ्यास करून क्लास बद्दल माहिती देऊ शकतो.