Financial Problems Vastu Tips आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी लवंग चे उपाय

Financial Problems Vastu Tips : प्रत्येक जण श्रीमंत होण्याकरता किंवा आपली गरिबी हटवण्यासाठीचा प्रयत्न करत असतो. पण पूर्णपणे जीव ओतून मेहनत करून सुद्धा यश येत नाही पदरी अपयशच पडते. याचा अर्थ असा नाही कि तुम्ही कमी पडता कधी कधी तुमची ग्रह दशा सुद्धा चांगली नसते, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची ग्रहदशा सुधरवण्यासाठी काही उपाय आहे ते तुम्ही केलेत तर नक्कीच तुमच्या जीवनात बदलावं घडेल.

तुम्हाला विश्वास बसणार नाही स्वयंपाकात पदाचर्थाची चव वाढवण्यासाठी ज्या मसाल्याचा वापर केला जातो त्याचे मत्कारीत फायदे आहेत तुमच्या आयुष्याची चव वाढवण्यासाठी. लवंग चा उपयोग सामान्यपणे आजारपणात औषध म्हणुनच नाही तर पुजे मध्ये पण होतो. लवंगला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक. नकारात्मक यासाठी कारण लवंगचा उपयोग तंत्र-मंत्र मध्ये पण होतो.



चला जाणुन घेऊयात लवंग चे चमत्कारिक उपाय :

१) घरातुन नकारात्मक ऊर्जा घालवते आणि समृद्धी येते :

घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे. यासाठी लवंग चा उपयोग तुम्ही नक्की करून बघा. शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी ५ लवंग, ३ मोठ्या इलायची, ३ कापुर वड्या भीमसेन कापुर असेल तर फार उत्तम, हे सर्व घेऊन पणती मध्ये मुख्य दाराजवळ जाळायचा. यानंतर याची राख मुख्य दाराच्या उंबरठ्याला लावायची.

घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी ५ लवंगांमध्ये ३ मोठे तमालपत्र, ३ कापुर वड्या सोबत जाळून त्याचा घुर  घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास देखील नकारत्मक ऊर्जा बाहेर जाते.

२) उधार दिलेले पैसे लवकर परत येतात :

कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभावण्यासाठी आपण धर्म म्हणुन मदत करतो खरी पण जर समोरचा व्यक्ती जाण न ठेवत सारखे मागूनही वर्षोनवर्षे उधारी परत करत नसेल लवंग चा उपाय नक्की करून बघा.

  • ७ लवंगा हातात घेऊन मंगळवारी ७ वेळा मारुती स्तोत्र म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या.
  • अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात २१ लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे समरण करत हवन करावे, आणि देवी ला प्रार्थना करावी पैसे परत मिळण्यासाठी.

बघा तो व्यक्ती ७ दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल.


३) राहु-केतु  ची कुंडली मध्ये दशा चांगली नसेल तर अश्या परीस्थितीत कुठलेच आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही, सतत काहीनाकाही नुकसान होते. अश्या परिस्थिती मध्ये राहु-केतु च्या दशा नीट होण्यासाठी शनिवारी कुणालातरी लवंगा दान कराव्यात. जर कुणी दान मध्ये घेऊ इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवर अर्पण करून टाका. हा उपाय ४० दिवस सलग न चुकता करावा. राहु-केतु चा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी-आनंद नांदेल. तुम्ही लवंग च रोपटे पण दान करू शकतात.

४) नोकरीच्या इंटरव्हीव साठी जाताना २ लवंगा तोंडात चावत जाव्यात. आणि इंटरव्हीवसाठी जाणाऱ्या कंपनी च्या मुख्य प्रवेशावर लवंगाचे उरलेले अवशेष फेकावे. हा उपाय नोकरी मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.

५) एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसांपासून मनासारखे काहीच घडत नसेल तर २१ मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात २ लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंताला सांगून हनुमान  चालीसा म्हणावी, नक्की चमत्कारीक फायदा अनुभवायला मिळतो.

६) जर तुमची मुलं अभ्यासात थोडे कमजोर असतील तर बुधवारी ११
अख्या लवंगा लाल कपड्यात बांधुन पुजा घरात ठेऊन ओम गं गणपतयै नमः या मंत्राची १०८ मण्यांची माळ जपावी आणि रोज १ लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं ११ दिवस करावे, असे केल्याने मुलाची समरणशक्ती वाढते.

७) घरातील लहान बाळ कुठ्ल्यागोष्टीला घाबरले असेल तर २ लवंगा घरात जाळून त्याची राख जिभेवर चालवून कपाळाला राख लावावी.

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

2 thoughts on “Financial Problems Vastu Tips आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी लवंग चे उपाय”

  1. मोठ्या आकाराचे तमालपत्र.
    तमालपत्र जे पुलाव, मसाले भात मध्ये टाकतात.

    Reply

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti