क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? Cryptocurrency in Marathi

Cryptocurrency in Marathi : क्रिप्टोकरन्सी हि जगातील आभासी चलन म्हणुन उदयास आली आहे. आपण क्रिप्टोकरन्सीला प्रत्यक्ष स्पर्श करून पाहु शकत नाही, या उलट क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये डिजिटल मनी या आभासी चलन रूपात आपल्याला दिसते.

कॉम्प्युटराइज अल्गोरिदमवर क्रिप्टोकरन्सी डिजिटल स्वरूपात तयार होतात. जेव्हा ती तयार होते, तेव्हा ते आपल्याला Digital Form डिजिटल स्वरूपात दृश्यमान होते.

आपण ते कोणत्याही क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या वॉलेट Cryptocurrency Exchange Wallet मध्ये सुरक्षित ठेवू शकतो. क्रिप्टोकरन्सी खरेदी केल्यानंतर, ती विकली जाऊ शकते आणि तुम्हाला पाहिजे तितका काळ तुमच्याकडे सुरक्षित ठेवली जाऊ शकते.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला Cryptocurrency in Marathi क्रिप्टोकरन्सीबद्दल मराठीमध्ये माहिती देणार आहोत कारण मराठी भाषिक राज्यांतील लोकांना क्रिप्टोकरन्सीबद्दल सखोल माहिती मिळत नाही आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला Cryptocurrency in India , Cryptocurrency News , Cryptocurrency che Fayde, Cryptocurrency kashi Vikat ghyaychi, Cryptocurrency Meaning इत्यादी विषयावर तपशीलवार माहितीघेऊयात. कृपया पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? What is Cryptocurrency in Marathi ?

हे एक आभासी चलन आहे. सोप्या भाषेत तुम्ही याला Digital Money डिजिटल मनी म्हणू शकता. क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचे श्रेय जपानच्या सातोशी नाकामोटो यांना जाते. सतोशी नाकामोटो यांनी २००८ मध्ये या आभासी चलनाचा शोध लावला. पण २००९ मध्ये क्रिप्टोकरन्सी पहिल्यांदाच चलन म्हणून वापरण्यात आली.

जसे आम्ही तुम्हाला वर सांगितले आहे की तुम्ही क्रिप्टो चलनाला भौतिक स्वरूपात स्पर्श करू शकत नाही.परंतु, ते डिजिटल स्वरूपात त्याचे अस्तित्व प्रतिबिंबित करते. जेव्हा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी लाँच केल्या गेल्या, तेव्हा त्याची सुरुवातीची किंमत खूपच कमी होती. ते खूप कमी किंमतीत विकत घेतले जाऊ शकत होते. पण आज जर पहिले तर बिटकॉईन दिवसेंदिवस चौपट गतीने आपले मूल्य वाढवत आहे. सध्या एका बिटकॉइनची किंमत भारतीय रुपयांमध्ये ३४,००,००० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच एक बिटकॉइन खरेदी करण्यासाठी तुम्हाला ३४ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागेल.

जगात सध्या १०० पेक्षा जास्त अधिक क्रिप्टोकरन्सी चलनात आहेत, परंतु सर्व क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक बिटकॉइन व्यतिरिक्त इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. तज्ञांच्या मते, सध्या कमी मूल्य असलेल्या क्रिप्टोकरन्सी येत्या १०-१५ वर्षात त्यांच्या मूल्यात मोठी झेप येऊ शकते.

क्रिप्टोकरन्सी कशी कार्य करते ? How does Cryptocurrency Work in Marathi ?

बहुतेक क्रिप्टोकरन्सी बँक किंवा सरकारच्या पाठिंब्याशिवाय कार्य करतात. सरकारी हमीवर विसंबुन राहण्यापेक्षा Blockchain ब्लॉकचेन नावाचे तंत्रज्ञान क्रिप्टोकरन्सी ऑपरेशन अनुसरण करते.  क्रिप्टोकरन्सी हे नोट किंवा कॉईन्स सारखे नाही आहेत ते इंटरनेट वर डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.

क्रिप्टोकरन्सी हे व्हर्च्युअल टोकन आहेत ज्याची व्हाल्यु ते खरेदी किंवा विक्री करणाऱ्या मार्केट रेट वर ठरवली जाते. क्रिप्टोकरन्सी मायनिंग Mining म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रक्रियेद्वारे तयार होते ज्यामध्ये कॉईन्स Coins मिळवण्यासाठी कॉम्पुटराइज प्रक्रिया वापरली जाते कठीण गणिती समस्या सोडवुन.  वापरकर्ते ब्रोकर्सकडून चलने देखील खरेदी करू शकतात, जी ते नंतर एन्क्रिप्टेड वॉलेट Encrypted Wallets वापरून संग्रहित आणि खर्च करू शकतात.

Blockchain ब्लॉकचेन सामान्यत: प्रूफ-ऑफ-वर्क (PoW) किंवा प्रूफ-ऑफ-स्टेक (PoS) अल्गोरिदमद्वारे कार्य करतात. PoW मायनिंग Mining वर आधारित कार्य करते जे सहसा प्रक्रियेसाठी विशिष्ट संगणकीय मशीन नियुक्त करतात.

क्रिप्टोकरन्सीचे प्रकार Types of Cryptocurrency in Marathi

विविध प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचे खालील दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते

  1. Coins, ज्यात Bitcoin आणि altcoins समाविष्ट असू शकतात (Non-Bitcoin Cryptocurrency)
  2. Tokens, प्रोग्रामेबल मालमत्ता जी दिलेल्या प्लॅटफॉर्म च्या blockchain ब्लॉकचेन मध्ये असते.

तुम्हाला माहीत आहे का गुंतवणूकदारांसाठी १५,००० पेक्षा जास्त प्रकारचे क्रिप्टोकरन्सी पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी लोकांमध्ये सगळ्यात जास्त प्रचलित असणाऱ्या  क्रिप्टोकरन्सी  बद्दल आपण माहिती घेऊयात.

Bitcoin (BTC) बिटकॉइन :

बिटकॉइन हे पहिले आणि सर्वात लोकप्रिय डिजिटल चलन आहे. बिटकॉइन २००९ मध्ये, सातोशी नमामोटोद्वारेनिर्माण केले गेले,  बिटकॉइन हि मार्केट मधील पहिली आणि सर्वात जास्त वापरात असलेली ऑनलाइन आवृत्ती आहे. या चलनाच्या व्यवहारांवर क्रिप्टोग्राफी आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाअंतर्गत लक्ष ठेवले जाते.

Ethereum (ETH) इथरियम

२०१५ मध्ये विकसित केलेले, इथरियम हे स्वतःचे क्रिप्टोकरन्सी असलेले ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे, ज्याला इथर (ETH) किंवा इथरियम म्हणतात. बिटकॉइन नंतर ही सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे.

Litecoin (LTC)

हे चलन बिटकॉइन सारखेच आहे परंतु जलद पेमेंट आणि मोठ्या व्यवहारांना अनुमती देणे यासारख्या नवीन संकल्पना विकसित करण्यासाठी हे झटपट विकसित झाले.

निष्कर्ष :

आशा आहे तुम्हाला Cryptocurrency  बद्दल हवी ती माहिती मिळाली असेल Cryptocurrency काय आहे ? Cryptocurrency कसे काम करते ? Cryptocurrency चे प्रकार याची माहिती पाहिलीत. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया आमच्या सोबत सामायिक करायला विसरू नका तसेच तुम्हाला याशिवाय अजून काही जास्त माहिती ठाऊक असेल तर ती आम्हाला कंमेंट सेकशन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तुम्हाला Cryptocurrency संबंधात अजून काही शंका असतील तर आम्हाला कळवा आम्ही नक्की त्याचे निरसन करू.

1 thought on “क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? Cryptocurrency in Marathi”

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti