गरोदरपणात कढीपत्ताचे सेवन करणे सुरक्षित आहे का ? Is It Safe To Eat Kadhipatta in Pregnancy?
कढीपत्ता मधील पोषण तत्वे Nutrition Value in Kadhipatta
- १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ८१० मिलिग्रॅम कॅल्शिअम असत
- १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ६०० मिलिग्रॅम फॉस्परस आढळते.
- १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये १२६०० आइयू कैरिटिन (म्हणजे व्हिटॅमिन ‘अ’ चा प्रकार) असतात.
- १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ३.१ मिलिग्रॅम आयरन
- १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये निकोटिनिक एसिड २.३ मिलिग्रॅम
- १०० ग्रॅम कढीपत्ता मध्ये ४ मिलिग्रॅम व्हिटॅमिन ‘क’
- प्रोटिन्स
गरोदरपणात कढीपत्ता खाण्याचे काय फायदे आहेत ? हे आपण पाहुयात Benefits to Eat Kadhipatta in Pregnancy
गरोदरपणात कढीपत्ता Curry Leaves in Pregnancy खाल्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत, ज्याने गर्भवती स्त्री च्या तब्येतीत खूप सारे फायदे पडतात. त्यातील काही फायदे आपण आज बघणार आहोत.
१) अपचन होत नाही :
कढीपत्ताच्या सेवनाने पाचक स्राव बनायला मदत होते, ज्याने उलटी, अपचन, मळमळ सारखे गरोदरपणात नेहमी होणारे त्रास होत नाही.
२) एनिमिया होत नाही :
एनिमिया अशी समस्या आहे ज्यात रक्त संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात सक्षम नसते. जी समस्या शरीरात आयरन च्या कमतरतेने उध्दभवते. कढीपत्त्याच्या काही प्रमाणात आयरन असल्याने एनिमिया Curry Leaves in Pregnancy गरोदरपणात कढीपत्ता चे सेवन करणाऱ्या स्त्री ला शक्यतो होत नाही.
३) बॅकटिरिअल इन्फेकशन होत नाही :
गरोदरपणात कधी कधी इन्फेकशन होते. हे न होण्यासाठी गरोदरपणात कढीपत्ता Kadhipatta in Pregnancy खाल्ला पाहिजे कारण कढीपत्ता मध्ये अँटी-बॅक्टरील गुणधर्म असतात ज्याने शरीरातील बॅक्टरीया मारले जातात.
४) किडनी साठी योग्य :
कढीपत्त्याचे सेवन केल्याने मूत्रपिंड स्वस्थ राहते. एका रिसर्च नुसार ३० दिवस कढीपत्ता खाल्ल्याने मूत्रपिंडचे फंक्शन योग्य चालते. गरोदरपणात हे खुप महत्वाचे असते कारण गरोदरपणात मूत्रपिंडावर अधिक दबाव पडतो आणि सारखी लघवी लागते.
५) मधुमेह दूर राहतो :
कढीपत्ता रक्तातील साखर कमी करतो आणि मधुमेहावर नियंत्रण आणण्यास मदत करतो. कढीपत्ता शरीर मधील इन्सुलिन वाढवुन अँटिडायबेटिक प्रभाव वाढवतो. त्यामुळे ज्या गर्भवती स्त्रीला मधुमेह असेल तिने नक्कीच गरोदरपणात कढीपत्ता Curry Leaves in Pregnancy खावा.
गरोदरपणात कढीपत्ता खाण्याचे काय तोटे आहेत ? हे आपण पाहुयात
- ज्या स्त्रिया संवेदनशील आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.
- कढीपत्ता मध्ये हायपोग्लिसेमिक असते ज्याला रक्तामधील साखर कमी करायला ओळखले जाते. जर जास्त कढीपत्ता खाण्यात आला तर रक्तातील साखर कमी होऊ शकते जे गर्भवती स्त्री ला घातक ठरू शकते.
गरोदरपणात कढीपत्ता खातांना घ्यायची खबरदारी
- सर्वात आधी गरोदरपणात कढीपत्ता अगदी प्रमाणात खावा. अति खाऊ नये.
- गडद हिरव्या रंगाच्या कढीपत्ताचा वापर करावा.
- कढीपत्त्याच्या पानांचा वापर करावा बारीक दांडीचा वापर करू नये.
- वापरात घेण्या आधी पाने स्वच्छ धुवून घ्यावीत.
- किडलेली किंवा छिद्र असलेली पाने वापरू नये
- गरोदरपणा च्या आधी कढीपत्त्याची एलर्जी असेल तर खाऊ नये.
- गरोदरपणा च्या आधी कढीपत्त्याची एलर्जी नसेल आणि गरोदरपणात सेवन केल्यानंतर एलर्जी किंवा कसला त्रास होत असेल खाणे बंद करावे.
गरोदरपणात कढीपत्ता खातांना खाद्यपदार्थांमध्ये कसे वापरता येते ? How To Eat Kadhipatta in Pregnancy?
कढीपत्ता वेगवेगळ्या स्वरूपात आहारात घेता येतो. कढीपत्त्याने खाद्यपदार्थाला चव वाढायला मदत होते, तसेच आरोग्यदायी राहायला मदत होते. खालील प्रकारे कढीपत्ता खाद्यपदार्थात टाकता येतो :
- कढीपत्ता सांबर, ताकाची कढी, मट्ठा यात घालता येतो.
- कढीपत्ता पोहे, उपमा यात टाकून खाऊ शकतो.
- गरोदरपणात कढीपत्ताची चटणी बनवून खाऊ शकतो. अधिक प्रमाणात खाऊ नये १ ते २ चमचे खावी.
- बटाटयाच्या भाजीत कढीपत्ता ची चव खुपच छान लागते. तुम्ही खाऊ शकता.