तुळशी हा सर्व पवित्र गोष्टींचा अविभाज्य घटक आहे. तुळशीची रोपे हे आरोग्य आणि संपत्तीचे प्रतीक आहे. जवळपास प्रत्येक हिंदू घरात आपण तुळशी हि शुभ वनस्पती असते. बऱ्याच लोकांचा हा समज आहे कि हि पवित्र वनस्पती आवारात सकारात्मक स्पंदने निर्माण करते. आणि पौराणिक कथांनुसार हि तुळस वनस्पती भगवान विष्णु देवतां शकत सर्व देवांची लाडकी आहे.
तुळशी औषधी वनस्पतींची राणी म्हणून ओळखले जाते, ही औषधी वनस्पती सामान्य सर्दी, फ्लू आणि खोकला यासारख्या विविध हंगामी रोगांवर उपचार करते. वास्तुनुसार घरी तुळशीची वनस्पती ठेवल्यास कुटुंबात सुसंवाद, सौख्य, आनंद नांदतो , असे ने म्हटले आहे.
तुळशी वृंदावन ठेवण्याचे कोणते आदर्श स्थान आहे ?
तुळशीची रोज उपासना आणि नियमित काळजी घेतल्याने दीर्घायुष्य लाभते तसेच कुटुंबात समृद्धी येते;परंतु आपल्या घरात समृद्धी आणण्यासाठी आपण वास्तुशास्त्रातील तुळशी Tulsi Plants; संबंधातील नियमांचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करायला हवे.;वास्तुशास्त्रानुसार तुळशीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल असे स्थान योग्य आहे. आपण आपल्या घरात तुळशी वृंदावन Tulsi Plants ठेवायची जागा सुनिश्चित करत असाल तर खालील काही निकष बघा.
तुळशी वृंदावन ठेवण्याची वास्तु नुसार दिशा Best Direction for Tulsi Plant
आपण आपल्या घरात तुळशी ठेवण्याचा विचार करीत असल्यास, खालील टिप्स आणि सूचना:
- तुळशीच्या रोपासाठी योग्य स्थान म्हणजे आपल्या घराची पूर्वेकडील बाजू आणि जर ते शक्य नसेल तर आपल्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये.
- तुळशी वृंदावन हे घराच्या जमिनीच्या वर असावे. नसेल तर खाली काहीतरी ठेऊन ते उंच करून घ्यावे.
- वास्तुच्या मूलभूत नियमानुसार तुळशी वृंदावन जिथे ठेवले आहे ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असावी, तिथे कुठलीच वस्तूंची गर्दी नको.
- तुळशी वृंदावनात तुळशी खेरीज दुसरे कुठलेच रोप नको. तसेच तुळस हि काटेरी वनस्पती सोबत वाढवु नये.
- तुळशी च्या आजू बाजूला जागा असेल तर गुलाब (काटेरी) सोडून दुसरे फुलांची रोपटी लावावीत.
- तुळस अश्या ठिकाणी ठेऊ नये जिथे झाडु, केराचे सूप,कचराकुंडी ठेवत असाल, चप्पल-बुट काढत असाल, ओले कपडे सुकवत असाल
साधं-सरळ सांगायचं झालं तर वास्तु शास्त्रानुसार तुळस Tulsi Plants योग्य दिशेला, स्वच्छ ठिकाणी लावली तर त्याचे अनन्य साधारण फायदे घरातील व्यक्तींना अनुभवायला मिळतात.
घरात तुळशी कोणत्या दिवशी लावावी ?
हिंदु दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील गुरुवारी तुळशीची लागवड करावी.
तुळशीच्या झाडाला थेट सूर्यप्रकाशाची गरज आहे का ?
बागकाम तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, Tulsi Plant तुळशीच्या रोपाला ७-८ तास सूर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे तुळस उबदार आणि सूर्यप्रकाश पडेल अश्या ठिकाणी ठेवावी.
तुळशी घरात वाढवता येते का ?
हो तुम्ही घरात पण तुळशी वाढवु शकतात परंतु ती सुर्यप्रकाश येईल अश्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे.
तुळशीची निगा कशी राखावी ? How to Take Care of Tulsi Plant?
- तुळशी ची माती दर १५ दिवसात थोडी विखरून घ्यावी याने हवेतील ऑक्सिजन मातीत शिरतो.
- तुळस डेरेदार व्हावी यासाठी रोज तिची मंजिरी खुडावी, हि मंजिरी तुम्ही श्रीकृष्णाला आणि विठ्ठल-रुख्मिणी ला अर्पण करू शकतात.
वाळलेली पान काढून घ्यावी. - रोज अगदी पुरेल तितकेच पाणी टाकावे.
- कधी सेंद्रिय खत पण टाकू शकतात किंवा वाळलेल्या केळी च्या सालाचे पीठ टाकू शकतात खत म्हणून.
- महत्वाची गोष्ट आपल्यातील बरीच लोक देवाच्या आंघोळीचे पाणी तुळशीला घालतो ज्याने तुळस कालांतराने जळून जाते किंवा डेरेदार नाही बनत. तर असं तुम्ही करत असाल तर त्वरित ते बंद करा. आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ असते आपण देवाला गंध लावण्यासाठी जो अष्टगंध, कुंकू लावतो त्यात रंगासाठी काही केमिकल्स टाकलेली असतात ज्याने तुळशीच्या रोपाला हानी पोहचते.
घरात तुळशी ठेवण्याचे फायदे
- ज्या घरात किंवा अंगणात तुळस Tulsi Plant असते त्या घरात कधीच भूत-बाधा होत नाही.
- तुळशीत औषधी तत्व असल्याने कुठल्याही रोगाच्या सुरवातीला याचा उपयोग करू शकतो.
- तुळशीत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे आणि तुळस हि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते
- तुळशीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे हृदय, मधुमेह आणि तणावच्या समस्यांसाठी चांगले असतात.
- तुळशीची पाने निरनिराळ्या बॅक्टेरियातील संक्रमणाशी लढण्यासाठी मदत करतात, अशा प्रकारे तापाने पीडित असलेल्या लोकांनी २-३ वेळा तुळशीचा चहा पिल्यास त्वरित बरे होण्यास मदत होते.
- कुठल्याही प्रकारचे त्वचेवर आलेल्या इन्फेकशन वर प्रथमोपचार म्हणून तुळशीची निवड योग्य ठरते.
- तुळशीमध्ये शुद्धीकरण गुणधर्म आहे त्यामुळे त्वचेचे विकार, केसांचे काही विकारांवर तुळस प्रभावशील ठरते.
घरात तुळशी Tulsi Plant ठेवण्याचे आध्यात्मिक फायदे
- तुळशीची पाने Tulsi Plant सर्व हिंदु लोकांच्या घरात प्रार्थनेच्या वेळी देवाला अर्पण केली जातात, जी आपल्या प्राचीन परंपरेचा अविभाज्य भाग आहे.
- तुळशीची पूजा सातत्याने केल्याने आपल्याला वाईट शक्तीशी लढायला सामर्थ्य मिळते. कोणतेही घर त्यात तुळशी शिवाय अपूर्ण असल्याचे समजले जाते.
- तुळशीच्या पानाचा उपयोग देवाच्या प्रसादात करतात त्याशिवाय प्रसाद पूर्ण म्हटला जात नाही.
- घरात एखादे लहान मुलं घाबरले असेल तर तांब्याच्या पेल्यात पाणी भरून रात्र भर ते तुळशीजवळ ठेवावे आणि ते पाणी बाळाच्या आंघोळीच्या वापरावे किंवा हलक्या हाताने पाण्याचा शिपका तोंडावर मारावे.
नजर झाल्यास देखील तुळशीच्या पानांनी कशी उतरवायची ? Tulshichya Panani Najar kashi utrvayachi?
- ७ तुळशीची पाने हातात घ्यावीत.
- नजर झालेल्या व्यक्तीला सरळ झोपण्यास सांगावे आणि त्याच्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत २१ वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र म्हणुन उतरवून घ्यावे.
- आता ती पाने नजर झालेल्या व्यक्तीस हाताने चोळून खाण्यास सांगावी. (हे सांगण्यामागे कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतु नाही ज्याची श्रद्धा असेल त्यांनी करावे)