Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

Union Budget 2022 in Marathi : अर्थसंकल्प अपडेट्स

Union Budget २०२२ in Marathi

Union Budget 2022-23 केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 चे स्पष्टीकरण: सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे आणि त्याचे स्पष्टीकरण आणि विश्लेषण येथे करत आहोत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी २०२२ मंगळवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला.

पाच मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये, सरकारने देशातील महामार्ग २५,००० किलोमीटरने विस्तारित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, नल से जल योजनेसाठी ६०,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, विविध राज्यांमध्ये पाच नदी जोडण्याचा प्रकल्प, पंतप्रधान गृहनिर्माण योजनेत अतिरिक्त ४८,००० कोटी रुपये या विकासाला चालना देणे ह्या सर्व गोष्टी आहेत.

२०२२ मध्ये ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली; ७५ जिल्ह्यांमध्ये ७५ डिजिटल बँकिंग युनिट्सची स्थापना करण्याचा प्रस्तावित मांडला आहे; कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे बिघडलेल्या मानसिक आरोग्यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम जाहीर केला; आणि क्रिप्टोकरन्सी आणि नॉन-फंजिबल टोकन्स यावर कर आकारण्यात आला आहे; रेल्वे बजेटमध्ये आणखी 400 वंदे भारत गाड्या.

सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे आणि त्याचे स्पष्टीकरण आणि विश्लेषण खाली देत आहोत

Exit mobile version