Guru Pradosh 2022 गुरु प्रदोष व्रत कथा आणि महत्त्व

Guru Pradosh 2022 : प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षामध्ये म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष मध्ये त्रयोदशी ला प्रदोष व्रत असते. कुठल्याही प्रदोष व्रतामध्ये महादेवाची पुजा संध्याकाळी सूर्यास्त च्या ४५ मिनिट आधी आणि सूर्यास्त च्या ४५ मिनिट नंतर केली जाते. 

गुरु प्रदोष व्रत म्हणजे काय ?

हिंदु शास्त्र मध्ये प्रदोष व्रत भगवान महादेवाची विशेष कृपा मिळवण्यासाठी केले जाते. जो प्रदोष व्रत गुरुवारी येतो त्याला गुरु प्रदोष व्रत Guru Pradosh म्हणतात.

यावर्षी कृष्ण पक्षात  गुरुवारी प्रदोष व्रत आहे जयला गुरु प्रदोष व्रत असे म्हणतात.

Guru Pradosh 2022 तारीख आणि मुहूर्त 

१४ एप्रिल २०२२, गुरुवार 
पूजा मुहूर्त: संध्याकाळी ०६:४६ ते रात्री ०९:०० पर्यंत

२८ एप्रिल,  गुरुवार
पूजा मुहूर्त: संध्याकाळी ०६:५४ ते रात्री ०९:०४

०८ सप्टेंबर, गुरुवार
पूजा मुहूर्त: संध्याकाळी ०६:३५ ते रात्री ०८:५२

ज्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये गुरु दोष आहे त्याव्यक्तीने हे व्रत नक्की करावे.परिणामकारक बदलाव अनुभवायला मिळतो. 

Guru Pradosh व्रत इतके परिणाम कारक आहे कि वैवाहिक सुख मिळत नसेल किंवा सारखे भांडण वादविवाद होत असतील तर ते बंद होतात. कुठले वाईट योग असतील तर ते नाहीसे होतात. Guru Pradosh व्रत करणाऱ्याला १०० गायी दान केल्यावर जे पुण्य मिळते ते पुण्य मिळते. शत्रूचा नाश करण्यासाठी Guru Pradosh व्रत करतात. 

Guru Pradosh व्रत करताना भगवान विष्णु आणि महादेवाची पुजा कशी करतात ?

१) गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून फिकट पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत. 

२) केळी च्या झाडाखाली शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावुन विष्णु सहस्र्नामावली पठण करावी. 

३) संपूर्ण दिवस भगवान शिव शंकर आणि भगवान विष्णुचा मनात जाप करावा.

४) सायंकाळी शिवशंकराच्या पिंडीचा दूध, दही ने अभिषेक करून अक्षता वाहाव्यात आणि धूप दिवा लावावा. 

५)  भगवान शिव शंकर ला तांदळाच्या खिरीचा आणि भगवान विष्णुला पिवळ्या फळाचा नैवैद्य अर्पण करावा.

६) भगवान शिव शंकरचे नामस्मरण करून आपल्यावर ओढवलेल्या संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी विनंती करावी.

वैवाहिक जीवन खराब का होऊ लागते ?

  • जन्मपत्रिकेमध्ये लग्नाच्या ठिकाणी पापी ग्रह ठाण मानून बसलेले असतात जसे कि सूर्य,शनी, राहू 
  • गुरु आणि शुक्र ग्रह संकटात असतील 
  • सप्त स्थानात पापी ग्रह असेल तर 

Guru Pradosh व्रत आनंद आणि सौख्याचे वरदान देते 

१) गुरु हा ज्ञान आणि सौभाग्याचा घटक मानला जातो ज्यामुळे सर्व मंगल कार्य मध्ये गुरुची पूजा केली जाते. प्राध्यान्य दिले जाते. 

२) मुलीच्या लग्नात गुरु ग्रहाचा आशीर्वाद शुभ मानला जातो. 

३) निरंतर ४० दिवस अंघोळीच्या पाण्यात ७ चिमूट हळद टाकून अंघोळ केल्याने गुरु चा प्रभाव वाढतो.

४) गुरु ग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी मातीच्या मडक्यात पाणी भरून उत्तर पूर्व दिशेस ठेवावा. यातील पाणी दर आठवड्याला बदलावे. 

५) पूर्वेस तोंड करून, पिवळ्या आसनावर बसून गुरु ग्रहाचा जाप केल्याचे गुरू ग्रहाचा चा प्रभाव वाढतो. 

६) Guru Pradosh व्रताच्या दिवशी शिवशंकराच्या मंदिरात शुद्ध गायीचा दिवा लावावा. 

गुरु प्रदोष व्रताची कहाणी 

एका प्रचलित कथेनुसार, एकदा इंद्र आणि वृत्तासुराच्या सैन्यात भयंकर घनघोर युद्ध झाले. देवांनी राक्षस सैन्याचा पराभव केला आणि त्यांचा नाश केला. हे पाहून वृत्तासुराला खूप राग आला आणि तो स्वतः युद्धासाठी सज्ज झाला. त्याने आसुरी माया पासून एक भयानक रूप धारण केले. सर्व देव भयभीत झाले आणि गुरुदेव बृहस्पतीच्या आश्रयाला पोहोचले. बृहस्पती महाराज म्हणाले – प्रथम मी तुम्हाला वृत्तासुराची खरी ओळख करून देतो.

वृत्तासुरा अतिशय तपस्वी आणि मेहनती आहे. त्याने गंधमादन पर्वतावर कठोर तपस्या करून शिवाला प्रसन्न केले. पूर्वीच्या काळात चित्ररथ नावाचा राजा होता. एकदा तो त्याच्या विमानात कैलास पर्वतावर गेला.

तेथे आई पार्वतीला शिवाच्या डाव्या अंगात बसलेले पाहून उपहासाने चित्ररथ राजा म्हणाले- ‘हे प्रभु! मोह आणि मायेत अडकल्यामुळे आपण स्त्रियांच्या नियंत्रणाखाली आहात, पण स्त्रीला मिठी मारून विधानसभेत बसवावे हे देवलोकात दिसत नव्हते.
चित्ररथाचे हे शब्द ऐकून सर्वव्यापी शिवशंकर हसले आणि म्हणाले – ‘हे राजा! माझा व्यावहारिक दृष्टिकोन वेगळा आहे. मी मृत्यू देणारा – कलकूट महाविष प्यायलो आहे, तरीही तू माझी एक सामान्य व्यक्तीसारखी थट्टा केलीस!

आई पार्वती संतापली आणि चित्ररथाला उद्देशून म्हणाली – ‘अरे दुष्ट! तू माझी तसेच सर्वव्यापी महेश्वराची थट्टा केली आहेस, म्हणून मी तुला नक्कीच अद्दल शिकवीन की तू अशाप्रकारे कुठल्याही संतांची थट्टा करण्याचे कधीही धाडस करणार नाहीस – आता तू राक्षसाचे रूप धारण करत विमानातून खाली पडशील, असा मी तुला शाप देतो.’
जगदंबा भवानीच्या शापामुळे चित्ररथाला राक्षसयोनी मिळाली आणि तो त्वष्ट नावाच्या ऋषीच्या तपश्चर्येतून वृत्तासुर झाला.

गुरुदेव बृहस्पती पुढे म्हणाले – ‘वृतासुर लहानपणापासून शिवभक्त होता, म्हणून हे इंद्र! तुम्ही गुरु प्रदोष Guru Pradosh उपवास करून भगवान शंकरांना प्रसन्न करा.
गुरुदेवांच्या आदेशानुसार देवराजने गुरु प्रदोष Guru Pradosh व्रत पाळले. गुरु प्रदोष व्रताच्या गौरवामुळे इंद्राने लवकरच व्रतासुरावर विजय मिळवला आणि देवलोकात शांतता पसरली. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताने प्रदोष व्रत अवश्य पाळावे.


तुम्हाला हि सर्व माहिती कशी वाटली नक्की कंमेंट करून कळवा. आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असल्यास ते देखील कंमेंट करून कळवा, आम्ही विस्तारात माहिती देऊ.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti