ABG Shipyard Bank Fraud in Marathi : सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेडवर ABG Shipyard Limited २८ बँकांची २२,८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही सर्वात मोठी बँक फसवणूक प्रकरणांपैकी एक आहे ज्याची सीबीआय चौकशी करणार आहे.
ABG Shipyard Bank Fraud संबंधातील ट्विट
#CBI has booked Gujarat-based ABG Shipyard Limited, its directors and others for allegedly causing a loss of ₹22,842 crore to a consortium of 28 #banks. It is the #biggestever case of #bankfraud registered by the agency pic.twitter.com/xdUYnPbdR2
— Arvind Chauhan (@Arv_Ind_Chauhan) February 12, 2022
देशातील बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा Biggest Bank Frauds in India उघडकीस आला आहे. एबीजी शिपयार्ड ABG Shipyard या जहाज बांधणी कंपनीने हा घोटाळा केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वप्रथम ८ नोव्हेंबर २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. यावर सीबीआयने कंपनीकडून १२ मार्च २०२० रोजी उत्तर मागितले होते. सुमारे पाच महिन्यांनंतर कंपनीने नवीन तक्रार दाखल केली. १८ महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी परत तक्रार दाखल केली.
एसबीआयच्या तक्रारीवरून सीबीआयने एबीजी शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
कंपनी आणि तिच्या संचालकांवर एसबीआयच्या नेतृत्वाखालील २८ बँकांच्या समुहाकडून २२,८४२ कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याचा आरोप आहे.
गुजरातमधील दाहेज आणि सुरत येथील एबीजी ग्रुपची ही शिपयार्ड कंपनी जहाज बनवायचे आणि दुरुस्तीकरण्याचे कामं करायची. आतापर्यंत या कंपनीने १६५ जहाजे बांधली आहेत. एबीजीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका संघाची फसवणूक केल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. ABG Shipyard Bank Fraud In Marathi हा घोटाळा देशातील बँकिंग इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे म्हटले जात आहे कारण हा नीरव मोदीपेक्षाही मोठा घोटाळा आहे.
घोटाळ्याच्या पैशाने परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा दावा
सीबीआय एफआयआरनुसार, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन मोठ्या कंपन्यांची नावे एबीजी शिपयार्ड ABG Shipyard आणि एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड ABG International Private Limited आहेत. दोन्ही कंपन्या एकाच समुहाच्या आहेत. या घोटाळ्याचा पैसा परदेशात पाठवून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप कंपन्यांवर आहे.
१८ जानेवारी २०१९ रोजी अर्न्स्ट अँड यंग एलपीने दाखल केलेल्या एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीतील फॉरेन्सिक ऑडिट अहवालाच्या तपासणीत असे उघड झाले आहे की कंपनीने बेकायदेशीर कृतींद्वारे बँक कर्जाचा गैरवापर केला आणि निधी वळवला.
कोणत्या बँकेची किती थकबाकी आहे
SBI – रु. २,४६८.५१ कोटी
ICICI – रु ७,०८९ कोटी
IDBI – रु. ३,६३४ कोटी
BOB – रु. १,६१४ कोटी
PNB – रु. १२४४ कोटी
IOB – रु. १,२२८ कोटी
ABG Shipyard Bank Fraud संबंधात या लोकांवर गुन्हा दाखल
सीबीआयने एफआयआरमध्ये तत्कालीन कार्यकारी संचालक शांतनम मुथुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल नेवातिया आणि आणखी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड यांची नावेही नोंदवली आहेत. त्यांच्यावर फौजदारी कट रचणे, फसवणूक, विश्वास भंग आणि पदाचा गैरवापर अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ABG Shipyard Company बद्दल थोडी माहिती
एबीजी शिपयार्ड लि. ही विविध व्यावसायिक हितसंबंध असलेल्या एबीजी ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे. १९८५ मध्ये स्थापन झाली आहे, याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. गुजरातमधील सूरत आणि दाहेजमध्ये जहाज बांधणीचे काम करते. ऑक्टोबर २०१० मध्ये वेस्टर्न इंडिया शिपयार्ड लिमिटेडचे अधिग्रहण केल्यानंतर, ते गोव्यात जहाज दुरुस्ती युनिट चालवत होते जे भारतातील सर्वात मोठी जहाज देखभाल सुविधा केंद्र आहे. ABG ही २० टन वजनापर्यंतची जहाजे तयार करण्याची क्षमता असलेली भारतातील सर्वात मोठी खाजगी जहाज बांधणी कंपनी बनली आहे.
ABG Shipyard Company एबीजी शिपयार्ड लिमिटेड अनेक व्यावसायिक जहाजे तयार करते. यामध्ये सेल्फ-लोडिंग आणि सेल्फ-डिस्चार्जिंग बल्क कॅरिअर्स, कंटेनर जहाजे, फ्लोटिंग क्रेन, स्प्लिट बार्ज, अँकर हँडलिंग टग्स, डायनॅमिक पोझिशनिंग जहाजे, ऑफशोअर सप्लाय व्हेसल्स आणि डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स यांचा समावेश आहे.
- एबीजी शिपयार्ड लिमिटेडला भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि इतर विविध जहाजे तयार करण्यासाठी भारत सरकारकडून मंजुरी देण्यात आली होती. पिपावाव शिपयार्डनंतर हा परवाना मिळवणारे हे दुसरे कॉर्पोरेट शिपयार्ड होते.
- २००४ मध्ये, भारतीय तटरक्षक दलासाठी प्रदूषण-नियंत्रण जहाजे बांधण्याचे कंत्राट ABG Shipyard Company ला देण्यात आले होते.
- २००९ मध्ये, कोस्ट गार्डसाठी ११ हाय-स्पीड वॉटर जेट प्रोपेल्ड इंटरसेप्टर्स तयार करण्यासाठी ABG Shipyard निवड करण्यात आली होती.जून २०११ मध्ये, ABG Shipyard Ltd ला भारतीय नौदलासाठी दोन कॅडेट प्रशिक्षण जहाजे तयार करण्यासाठी $१३० मिलिअनचा करार देण्यात आला होता.
- जानेवारी २०१२ मध्ये, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ५ बिलियन ऑर्डरची ऑर्डर मिळवली होती आणि त्याची ऑर्डर सुमारे $2.7 बिलियन ला बुक झाली होती.
- जुलै २०१७ मध्ये, कंपनी दिवाळखोरीसाठी दाखल करण्यास सहमत झाली.