Fixed Deposit Returns : खुप वर्षापासून पैश्यांच्या गुंतवणुकीसाठी FD हा सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्या गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारची रिस्क नको असते त्यांची पहिली पसंती फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit असते. फिक्स्ड डिपॉझिट वर किती व्याजदर मिळतो याकडे गुंतवणूकदारांची पैसे गुंतवतांना नजर असते. शेअर बाजारातील चढ-उताराची फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit वर कुठलाही फरक पडत नाही. त्यामुळे FD मध्ये गुंतवणुक करणारे लोकांना काळजी नसते.
बहुतेक गुंतवणुकदारांना जास्तीत जास्त व्याजदर मिळावा याची अपेक्षा असते. मुख्यत्वे जुन्या वयाचे लोक (सिनिअर सिटिझन्स) जास्त व्याजदर कुठे मिळेल याचे विकल्प शोधायच्या प्रयत्नांत असतात. यामुळे जास्तीत जास्त व्याजाचे पैसे मिळतात तसेच पैसे देखील सुरक्षित राहतात.
तुम्हाला येथे आम्ही काही खाजगी बँकाची नावे सांगणार आहोत ज्यामध्ये फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit गुंतवल्यास जास्तीत जास्त व्याज मिळणार.
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या एका वर्षात रेपो दरात काहीही बदल केला नाही आहे. फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit वर मिळणारे व्याज करपात्र आहे, त्यामुळे फिक्स्ड डिपॉझिट Fixed Deposit वर मिळणार मोबदला कमी झाला आहे.
त्यातल्या त्यात काही खाजगी बँका बऱ्यापैकी चांगला व्याजदर देत आहेत. हे चांगले व्याजदर १ कोटी रुपया पेक्षा कमी आणि ५ वर्षाच्या मुदतीसाठी आहे. सिनिअर सिटिझन्स ला ५० बेसिस पॉईंट्स अधिक व्याज मिळणार आहे.
खालील खाजगी बँका आणि त्यांचे व्याजदर बघा
१ डीबीएस बँक – ५.७० – ६.५० टक्के
२ इंडसेंड बँक – ५.५० – ६.५० टक्के
३ RBL बँक – ५.४० – ६.५० टक्के
४ येस बँक – ५.२५ – ६.५० टक्के
५ टीएनएससी बँक – ५.७५ – ६.०० टक्के
६ IDFS पहिली बँक – ५.२५ – ६.०० टक्के
७ करूर वैश्य बँक – ४.२५ – ६.०० टक्के
८ ऍक्सिस बँक – ४.४० – ५.७५ टक्के
९ दक्षिण भारतीय बँक – ४.५० – ५.६५ टक्के
आम्हाला आशा आहे तुम्हाला या माहितीचा नक्की फायदा होईल आता बिनधास्त Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करा.