Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

कडुनिंब आणि हे ३ पदार्थ खा, संसर्ग झाल्यास ऑक्सिजनची गरजच पडणार नाही

नमस्कार मित्रानो, आजच्या लेखात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण खुप रोगांशी सामना करतोय. या साथीच्या रोगाच्या काळात स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करायचा असेल तर आपले शरीराची रोगांशी सामना करायची क्षमता वाढवायला हवी. 


रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुम्हाला आणि कुटुंबाला कडुनिबांसोबत या ३ गोष्टींचं सेवन केल्याने एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील. एक म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढून साथीच्या रोगाचे संक्रमण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला होणार नाही आणि दोन म्हणजे तुमच्या शरीरातील ऑक्सिजन ची पातळी कधीच कमी होणार नाही.  कडुनिंब आणि या ३ गोष्टी अगदी सहज उपलब्ध आहेत. 

कडुलिंबाचे आयुर्वेदिक गुणधर्म बघुयात. कडुनिंब ताप, खोकला, कफ, मुळव्याध, गोवर, कांजिण्या यासारख्या रोगांवर प्रभावी आहे. कडुनिंबाची झाडे जिथे जास्त प्रमाणात असतात तिथे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन ची निर्मिती होते तसेच तिथे हवा देखील शुद्ध राहते.

 
या कडुनिबां सोबतच्या ३ गोष्टी आहेत हळद, तुळस आणि मध. 

 

हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट आहेत. आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर साथीचे आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे आपण दररोज हळदीचे आहारात सेवन केले पाहिजे. हळदीचे सेवन कफ, सर्दी खोकला झाल्यास औषध म्हणून केले जाते. 
 
तुळस हि खुप मोठ्या प्रमाणात प्राणवायू ऑक्सिजन सोडते. तुळस अतिशय थंड असते. रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला प्रदक्षिणा मारल्याने शरीराला ऑक्सिजन ची कमतरता कधीच भासत नाही.  तुळस हि जवळपास सर्वच रोगांवर प्रथमोपचार म्हणून वापरण्यात येते. तुळशीकत जैव सक्रिय रसायने आहेत.  ट्रैनिन, सैवोनिन, ग्लाइकोसाइड आणि एल्केलाइड्स हि ती उपयोगी रसायने आहेत. तुळशीच्या पानामध्ये एक पिवळ्या रंगाचे वेळेनुसार नाहीसे होणारे तेल पण असते, ते देखील शरीरास खुप उपयोगी असतात. या तेलात ७१% यूजीनॉल, २०% युजिनॉल मिथाइल ईथर आणि ३% कार्वाकोल आहे. 
 
मध हे कुठलेही औषध खाता यावे यासाठी वापरतात. मधात फ्रक्टोज़: ३८.२%, ग्लूकोज़: ३१.३%, सकरोज़: १.३%, माल्टोज़: ७.१%, जल: १७.२%, उच्च शर्कराएं: १.५%, भस्म: ०.२%, अन्य/अज्ञात: ३.२% या प्रमाणात असतात. 

 

 
या सर्व घटकांचे आपल्याला इम्युनिटी बुस्टर चाटण बनवायचं आहे. याची कृती खालीलप्रमाणे आहे. 
 

साहित्य :

१) २५-३० कडुनिंबाची पाने
२) १ टी स्पून मध
३) १०-१५ तुळशीची पाने
४) १ आणि १/२ टी स्पून हळद (आंबेहळद असेल तर उत्तम)
कडुनिंब आणि हे ३ पदार्थ खाल्याने, संसर्ग झाल्यास ऑक्सिजनची गरजच पडणार नाही.

 
कृती : 

 

खलबत्यात कडुनिंबाची पाने कुटून घ्यायचेत, यात तुळशीची पाने घालून कुटून घ्यायचीत, आता यात हळद घालून गोलाकार बत्ता फिरवायचा कुटायचा नाही आता एकजीव झाले कि त्यात मध घालून हे चाटण कुटुंबात सर्वानी समान प्रमाणात रोज उपाशी पोटी घ्यायाचे.

 

 

लक्ष्यात ठेवा !!! कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात घेतली कि शरीरास त्याचे काही ना काही अपाय असतात, म्हणून जर तुम्ही नेम धरला हे करायचा तर एक आठवडा सलग घेऊन पुढची काही दिवस दुसरं काहीतरी घ्यावं. 

 

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.  
 
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.
Exit mobile version