नमस्कार मंडळी, कुठलीही पूजा असो औक्षण करताना आपण डोक्याला टिळा लावतो. तो कुंकवाचा टिळा लावल्यावर आपण तो तसाच मोकळा नाही ठेवत त्यावर आपण तांदूळ लावतो आणि डोक्यावर टाकतो पण तुम्ही कधी विचार केलाय का आपण टिळा लावल्यावर तांदुळ कपाळावर का लावतो ? यामागे काय शास्त्र असेल ?
याचीच माहिती आज आपण घेणार आहोत जेणेकरून जेव्हा आपण परत औक्षण करू तेव्हा टिळा लावल्यावर तांदूळ का लावतो या मागील कारण आपल्या लक्षात राहील आणि आपण नुसती पद्धत आहे म्हणुन किंवा नुसते आपल्याला लहान पणा पासून शिकवता म्हणुन करणार नाही.
डोक्याला टीळा लावायचे महत्त्व
हिंदू धर्मात डोक्याला टीळा लावणे खूप महत्वाचे आणि पवित्र मानले जाते. पूजा, लग्न, वाढदिवस वगैरे कोणत्याही समारंभात कपाळी टीळा लावला जातो. हिंदू धर्मात याचे विशेष महत्व आहे. शास्त्रात श्वेत चंदन , कुंकू, लाल चंदन,बिल्वपत्र, भस्म इत्यादींनी टीळा लावणे शुभ मानले गेले आहे.
पण हल्ली जास्तकरून पटकन जमतो म्हणुन कुंकवाचा टीळा लावला जातो. तुम्ही हेही पहिले असेल कि कुंकवाबरोबर तांदूळही टीळा लावताना लावले जातात. पण तुम्हाला त्या मागचे कारण माहिती आहे का ? चला याबद्दल माहिती जाणुन घेऊयात.
शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले गेले तर डोक्यावर जिकडे तुम्ही दोन भुवयांच्या मधोमध टीळा लावता त्याला अग्निचक्र असे म्हणतात. इथूनच संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार होतो. इथे टीळा लावल्याने शरीरात उर्जा निर्माण होऊन व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.
तांदूळ हे शुद्धतेचे प्रतिक मानले गेले आहे. शास्त्रानुसार तांदूळ हे हवनात देवतांना अर्पण केले जाणारे पवित्र आण आहे. अशात टीळा लावताना तांदुळाचा प्रयोग सकारात्मक उर्जा प्रदान करतो.
सनातन धर्मात कुंकवाच्या तीळाबरोबर हळद, चंदन, भस्मही वापरले जाते. प्रत्येकाचे आपापले लाभ सांगितले गेले आहेत.
चला तर याचे देखील लाभ पाहूयात
टिळ्याचे प्रकार
हळदीच्या टिळ्यात एंटी बैक्टीरियल तत्व असतात ज्याने अनेक आजारांपासून टिळा लावणाऱ्याला मुक्ती मिळते. पूजा पाठ करणारे लोक किंवा साधू संत माथ्यावर चंदनाचा टीळा नेहमी लावतात. पूजा करणाऱ्याला मानसिक शांती मिळते.
माथ्यावर चंदनाचा टीळा लावल्याने मेंदूत सेराटोनिन आणि बीटा एंडोर्फिनचा स्त्राव योग्य पद्धतीने होतो. याने डोके शांत राहते. अशा माणसाचे लक्ष कामात नीट लागते आणि लक्ष्मीची कृपाही त्यावर नेहमी राहते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे चंदन टीळा अनेक उग्र ग्रहांची शांती करतो. यामुळे माणसाचे आयुष्य आणखी सुखकारक होते.
काही साधू संन्यासी राखेचा टीळा लावतात काही मंदिरातही भस्माचा टीळा लावला जातो. आध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहायला गेले तर भस्माच्या टीळ्याचे विशेष महत्व आहे. असे म्हणतात कि राखेने अशुद्धपणा साफ होतो व भस्माच्या टीळ्याने माणसाला पापांतून मुक्ती मिळते आणि त्याला अक्षय असे पुण्य लाभते. असेही मानले जाते कि जो माणूस भस्म टीळा लावतो त्याला समाजात मान मरातब मिळतो व लोक त्याला सन्मान देतात.
स्नान झाल्यावर कपाळावर टिळा का लावतात ?
आपला देह म्हणजे जणू ईश्वराचे मंदीरच आहे. मंदिरात जो सर्वत्र ईश्वरी भाव आपल्याला जाणवतो तसाच देहात रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरीभावाकडे खेचणारे असते. हे ईश्वरी तत्व विशेषकरून मर्मस्थानात प्रचीतीस येते. भ्रुकुटीच्या मध्यभागी अज्ञाचक्रावर
सगूण परमेश्वर वास करतो.
देहाला मायेची उपाधी असेपर्यंत सगुण परमेश्वराचीच पूजा करणे महत्वाचे असते. म्हणून स्नान झाल्यावर सर्वांत प्रथम कपाळाच्या मध्यभागी असणाऱ्या परमेश्वराच्या मूर्तीस टिळा लावावा.
हि एक छोटी देवपूजा असते.
ज्या लोकांना कामाचा भरपुर व्याप असतो ज्यांना श्वास घ्यायला देखील फुरसत मिळत नसते अशा माणसांनी स्नान झाल्यावर किमान कपाळी टिळा तरी लावावा. त्या निमित्ताने भगवंताची पूजा होते.
टिळा लावताना मधल्या बोटाने लावावा मधल्या बोटाचा संबंध ह्रदयाशी असल्यामुळे या बोटातून प्रवाहित होणरी स्पंदने ह्रदयापर्यंत जाऊन पोहचतात. जप करताना मधले बोट वापरतात त्यामुळे दिवसभर मन शांत व भक्तिभावाने राहते. टिळा लावल्यामुळे मनुष्य सहसा पापकर्माकडे वळत नाही.
कारण जो टिळा लावतो तो देवाला मानतो. तुम्ही अनुभवलं असेल समाज देखील त्याच्याकडे सन्मानाने बघत असतो. जसे कि वारकऱ्याच्या कपाळावर नेहमी टिळा असतो त्यामुळे त्याच्याकडे आपण लगेच माउली च्या दृष्टीने बघतो. हिंदू धर्माखेरीज इतर कोणत्याही धर्माचे लोक टिळा लावत नाहीत.
या बाबतीत कठोपनिषदात असे सांगितले आहे की ह्रदयातून निघणाऱ्या शंभर प्रमुख नाड्यांपैकी सुषुम्ना ही नाडी मस्तकाच्या समोरील भागातून निघते. यातूनच मोक्ष मार्ग निघत़ो जो ऊर्ध्व दिशेने जातो. माणसाचा मृत्यू झाल्यावर जीवात्मा या मार्गाने गमन करता झाला तर त्याला त्वरित गति मिळते. म्हणूनच कपाळी तिलक धारण करतात.
चंदनाच्या टिळ्याला महत्त्व आहे कारण नाकातून वाहणाऱ्या दोन नाड्यांपैकी एक धन व दुसरी ऋण असते. धन नाडीतून श्वास वाहताना निर्माण होणारी उष्णता रोखण्यासाठी चंदनतिलक महत्वाची कामगिरी बजावतो. कपाळावर टिळा लावताना औषधी चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन, बुक्का इत्यादि चा शुद्ध टिळालावतात .
आर्य धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.
उदा. हळदी, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.
टिळा लावण्या मागे काय भावना असते ?
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि, संगमाच्या किनार्यावर “गंगा स्नान” केल्यानंतर साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.
कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक महत्व आहे. आपल्या शरीरात सात सुश्मउर्जा केंद्र आहे जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना “चक्र” असे म्हणतात.
कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो, तिथे आज्ञाचक्र असतो. हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.
इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन नाड्य!
१) इडा
२)पिंगला आणी
३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला त्रिवेणी किवा संगम पण म्हणतात.
हे गुरु स्थान आहे. इथूनच पूर्ण शरीर संचालन होते. हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण आहे. याला मनाचे घर पण म्हणतात. यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे. योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते. टिळा लावल्याने स्वभावात चांगले बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.
टिळा लावण्याचे कारण
१) मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..
२) शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनीने,
३) धनप्राप्ती हेतू मध्यमानी आणि
४) शांती प्राप्ती साठी अनामिकानि टिळा लावला जातो.
टिळा कसा लावतात ?
टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते. म्हणून टिळा जरूर लावावा. आर्य प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे. टिळा आर्य संस्कृती ची ओळख आहे.
टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण
निष्कर्ष
आज आपण डोक्याला लावायच्या टिळ्या बद्दल सर्व माहिती विस्तृत स्वरूपात पहिली. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.
खूब मस्त…