Ways To Drink Water : नमस्कार मित्रानो, आजच्या लेखात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तुम्हाला माहित आहे का चुकीच्या पद्धतीने पाणी पिणं ठरु शकतं तुमच्या तब्येतीला हानिकारक; जवळपास ९६-९७ % लोक चुकीच्या पद्धतीने पाणी पितात. मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत पाणी कसं आणि कधी प्यावं आणि किती प्यावं आणि कुठल्या पद्धतीने प्यावं.
मानवी शरीर ६० टक्के पाण्याने भरलेला आहे. पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी महत्त्वाचं काम करते. जी तहान पाण्याने भागते ती कुठल्याच पेयाने भागात नाही.
परंतु तुम्हाला माहित आहे का Ways To Drink Water पाणी पिण्याची पण एक पद्धत आहे, त्या पद्धतीने पाणी न पिल्यास शरीराला तेच पाणी अपायकारक ठरते.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी कधीही एका घोटात किंवा एका दमात पिऊ नये. पाणी पितानातोंडातील लाळ पाण्यात मिसळली पाहिजे आणि त्यासकट पाणी पोटात गेलं पाहिजे. लाळेत काही हेल्थी बॅक्टरीया असतात ते पोटात गेलेले शरीरास चांगले असतात. त्याने खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. त्यामुळे कितीही घाईत असलं तरी पाणी पिताना हळू-हळू, दमाने, सावकाश पिलेला कधीही चांगलं कारण पिलेल पाणी शरीराला लागलं तरच उपयोग नाहीतर व्यर्थ. असं म्हणता येईल कि पाणी प्यायला पण काही क्षणाचा अवधी काढायला हवा आपल्याच प्रकृतीकरता.
पाणी कधीच उभे राहून पिले नाही पाहिजे पाणी हे बसून आरामात प्यावे. पाणी उभे राहून पिल्यास ते सरळ पोटाच्या खालच्या भागात वेगाने निघून जाते. त्यामुळे अश्या पद्धतीने पाणी प्यायल्यास तहान भागात नाही, शरीर हायड्रेट होत नाही,पाण्यातील पोषक तत्व शरीरास मिळत नाही. खाली दिलेल्या पद्धतीने पाणी पिल्यास कुठलेही विकार होत नाही.
पाण्याने भरलेला ग्लास तुमच्यासमोर कुणी ठेवला तर एक सेकंड वेळेचा अवधी तुम्ही न घालवता १० सेकंदामध्ये हे पाणी तुम्ही संपवून टाकाल पण ते सपशेल चुकीचे आहे.
जर तुम्ही १० सेकंदात पाणी प्यायले तर तुमचे पोट तुम्हाला गच्च भरल्यासारखे वाटेल आणि त्यानंतर तुम्ही दुसरा ग्लास पाण्याचा पिऊ शकत नाही. पाणी पिण्याची योग्य पद्धत काय आहे हे आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.
क्रीडा क्षेत्रातील लोक देखील या गोष्टीचे अनुसरण करतात. हे आपण क्रिकेट मॅच बघताना किंवा इतर कुठला खेळ टीव्हीमध्ये चालु असतांना पाहू शकता.
- पाणी कधीच बॉटल ने न पिता ग्लास मध्ये काढून खाली दिलेल्या पद्धतीने प्यावे.
- सकाळी उठल्यावर १-२ ग्लास पाणी खाली दिलेल्या दिलेल्या पद्धतीनुसार पिल्यास खुप फायदेशीर पडते.
- जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर आणि जेवणानंतर अर्धा तास नंतर या पद्धतीने पाणी पिल्यास जेवण पचण्यास मदत होते. जेवणापूर्वीच्या अर्धा तास पाणी पिऊ नये याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात भुकेने एक आग तयार झालेली असते ती जर पाण्याने विझली तर जेवताना जेवण जात नाही आहि असे जेवण पचायला जड होते.
- झोपण्यापूर्वी खाली दिलेल्या पद्धतीने पाणी पिऊन झोपावे हार्ट अटॅक चा त्रास उध्दभवत नाही.
- व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर १-२ ग्लास खाली दिलेल्या पद्धतीने पाणी प्यावे डी-हायड्रेट झाल्यासारखे कधीच वाटणार नाही.
पाणी प्यायची आयुर्वेदानुसार योग्य पद्धत Ways To Drink Water as Per Ayurveda
आता असे करून बघा १ ग्लास पाणी ५०-६० सेकंड हळू हळू प्या. जर तुम्ही असे प्यायले तर तुम्ही त्या १ ग्लास पाण्यानंतर अजून २ ग्लास पाणी पिऊ शकतात. आणि तुमचे पोट पण भरल्यासारखे वाटणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ५-१० मिनिटांत ३ ग्लास पाणी पिऊ शकता आणि तरीही तुमचे पोट भरणार नाही.
जर तुम्ही १० सेकंदात १ ग्लास पाणी प्याल तर:
- तुमचे पोट भरेल आणि तुम्हाला चालवू पण जाणार नाही.
- धावताना पोटात वेदना होईल आणि धावणे थांबवाल.
आम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही ५-१० मिनिटांत ३ ग्लास प्यायलात तर:
- तुमच्या पोटात वेदना होणार नाहीत.
- तुम्ही जितके शक्य तितके धावू शकता.
- सर्व रोगांचे समुळ कारण ऍसिडिटी आहे आणि या पध्दतीने पाणी पिल्यास ऍसिडिटी कधीच होणार नाहि.
अशाप्रकारे तुम्ही पाणी पिण्याची पद्धत बदलून फरक स्वतः अनुभवू शकता.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.
पाणी पिण्याबद्दलची छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद.
धन्यवाद !
तुम्हाला अजून कुठल्या विषया बद्दल माहिती हवी असल्यास कळवा.