Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the rank-math domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/u798046542/domains/knowinmarathi.com/public_html/wp-includes/functions.php on line 6114
Immunity Power Increase In Marathi रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे चाटण

Immunity Power Increase In Marathi रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे चाटण

Increase Immunity Power In Marathi : भारतात कोरोना वायरस वरील लस जरी बनली असेल तरी आपल्यावरील कोरोना चे सावट अजूनही गेलेले आहे. कोरोना वायरस च्या संसर्गाच्या भीतीचे वातावरण अजूनही आहेच. नाही म्हटले तरी दिवसेंदिवस कोरोना च्या केसेस आहेतच. रोज कोरोना वायरस मुळे कुणा-ना-कुणा चा जीव जायच्या बातम्या कानी येतच आहे.

कोरोनाची लस घेणे का महत्वाचे आहे ते इथे वाचा जे लोक कोरोनाची लस घेणार नाही त्यांच्यासाठी कोविडचा भारतीय वैरिएंट धोकादायक ठरू शकतो, असा तज्ज्ञांचा दावा आहे

तसेच कोरोना वायरस ची लस जरी अली असेल तरी लस घेऊनसुद्धा कोरोना चा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे शासनाने अजूनही गर्दी टाळून घरातच काही दिवस राहायचा सल्ला दिलेला आहे.

आपल्याला कुठल्याच रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून आपण आपली Immunity Power रोगप्रतिकारक शक्ती मजबुत राखली पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोना पासुन बचावासाठी सुरक्षित अंतर पाळा, गर्दी टाळा, आयोग्यदायी पदार्थांचं सेवन करा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा हे सल्ले दिले आहेत.

आपल्या आजी च्या बटव्यात अश्या बऱ्याच गोष्टी असतात ज्याने आपली Immunity Power रोगप्रतिकारक शक्ती वाढु शकते. आज आपण एका आयुर्वेदिक चाटण बद्दल माहिती घेणार आहोत. हे चाटण तुम्हाला रोज चमचाभर अनशापोटी घ्यायच आहे, जर व्यायाम करत असाल तर व्यायामा आधी घ्यायचं आहे.

ह्या चाटणाची कृती अगदी सोप्पी आहे आणि ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या घरात सर्रास असतात.

खालील प्रमाण हे १ व्यक्तीसाठी आहे.

साहित्य :

१) ४-५ कढीपत्त्याची पाने

कढीपत्त्याच्या पानामध्ये ‘अ’ जीवनसत्व असते. पत्ताकोबी, पालक, गाजर, टोमॅटो, भेंडी यापेक्षा जास्त ‘अ’ जीवनसत्व कढीपत्या मध्ये असते. कढीपत्त्याला अनेक भाज्यांपैकी एक सुपरफूड मानले जाते.  तसेच कर्बोदके आणि प्रथिने देखील कढीपत्त्याच्या पानामध्येइतर भाज्यांपेक्षा जास्त आहे. कढीपत्यामुळे उष्णता कमी होते. कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग रक्तशुद्धी करतात. यासाठी आपली आई रोज भाजीत आवर्जून कढीपत्ता टाकतो पण कढीपत्याला नेहमी विलगीकरण च मिळते. आम्हाला आशा आहे हा लेख वाचल्यापासून तुम्ही प्रत्येक भाजी मधला, पोह्यामधला कढीपत्ता आधी खाल.

२) ४-५ तुळशीची पाने

तुळस हि खुप मोठ्या प्रमाणात प्राणवायू ऑक्सिजन सोडते. तुळस अतिशय थंड असते. रोज सकाळ संध्याकाळ तुळशीला प्रदक्षिणा मारल्याने शरीराला ऑक्सिजन ची कमतरता कधीच भासत नाही.  तुळस हि जवळपास सर्वच रोगांवर प्रथमोपचार म्हणून वापरण्यात येते. तुळशीकत जैव सक्रिय रसायने आहेत.  ट्रैनिन, सैवोनिन, ग्लाइकोसाइड आणि एल्केलाइड्स हि ती उपयोगी रसायने आहेत. तुळशीच्या पानामध्ये एक पिवळ्या रंगाचे वेळेनुसार नाहीसे होणारे तेल पण असते, ते देखील शरीरास खुप उपयोगी असतात. या तेलात ७१% यूजीनॉल, २०% युजिनॉल मिथाइल ईथर आणि ३% कार्वाकोल आहे.

३) १ चमचा मध

मध हे कुठलेही औषध खाता यावे यासाठी वापरतात. मधात फ्रक्टोज़: ३८.२%, ग्लूकोज़: ३१.३%, सकरोज़: १.३%, माल्टोज़: ७.१%, जल: १७.२%, उच्च शर्कराएं: १.५%, भस्म: ०.२%, अन्य/अज्ञात: ३.२% या प्रमाणात असतात.

कृती :

४-५ कढीपत्त्याची पाने आणि ४-५ तुळशीची पाने एकत्र खलबत्यामध्ये कुटून घ्यावेत बारीक पेस्ट झाली कि त्यात १ चमचा मध टाकुन मिक्स करावे.

हि पेस्ट करताना दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक म्हणजे हे सर्व ताजेच करावे बनवून शीतकपाटात ठेऊ नये. आणि दुसरे म्हणजे हि सर्व कृती खलबत्यातच करावी यासाठी मिक्सर वापरू नये. मिक्सर च्या वापरामुळे पोषणतत्त्वे निघून जाऊ शकतात.

लक्ष्यात ठेवा !!! कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात घेतली कि शरीरास त्याचे काही ना काही अपाय असतात, म्हणून जर तुम्ही नेम धरला हे करायचा तर एक आठवडा सलग घेऊन पुढची काही दिवस दुसरं काहीतरी घ्यावं.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक काढा ची रेसिपी इथे आहे तो तुम्ही बदल म्हणून घेऊ शकता >>> कडुनिंब आणि हे ३ पदार्थ खा, संसर्ग झाल्यास ऑक्सिजनची गरजच पडणार नाही

——————

आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा, चुकीची माहिती पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले  जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.

तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे  सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti