नमस्कार मित्रांनो, How To Start Blogging in Marathi ब्लॉगिंग कसे सुरु करावे ? ब्लॉगिंग संदर्भातील प्रश्न तुम्हाला असतील तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की मिळतील.
आज आपण अनेक उदाहरणे बघतो लेखनातून Blogging मार्फत बरेच लोक लाखो रुपये कमवतात. मग जर हि लोक कमाऊ शकतो तर आपण का नाही. आज मी तुम्हला ब्लॉगिंग कसे सुरु करावे ? हे संपूर्ण लेखात सांगणार आहे. या लेखात आपण ब्लॉगिंग मार्फत पैसे कसे कमाऊ शकतो ते देखील बघणार आहोत. हि सर्व माहिती मी माझ्या अनुभवातून सोप्या शब्दात तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलाय.
आज तुम्हाला हजारो यूट्यूब वर ट्युटोरिअल मिळतील, गुगल वर लेख मिळतील ब्लॉगिंग कसे सुरु करावे How To Start Blogging याबाबतीत पण तुमच्या स्वतःच्या मातृभाषेत विस्तृत आणि अनुभवी माहिती फक्त इथेच मिळेल त्यामुळे हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुमच्या पारिजानामध्ये नक्की सामायिक करा. चला तर मग पाहूया How To Start Blogging in Marathi ब्लॉगिंग कसे सुरु करावे ?
लोभ नसावा
जवळपास सगळ्यांनाच माहित आहे ब्लॉगिंग करून पैसे कमवता येतात तर ब्लॉगिंग सुरु करताना पैसे मिळतील किंवा महिन्याभरात पैसे मिळतील याची अपेक्षा घेऊन ब्लॉगिंग सुरु करू नये. खूप मेहनत घ्यावी लागते त्यानंतरच ब्लॉगिंग मार्फत पैसे कमवायच्या संधी उप्लब्ध होते.
ब्लॉग म्हणजे काय ? Blog Means What?
ब्लॉग Blog म्हणजे एक संकेतस्थळ / वेबसाइट जिथे लेखक आपले विचार, अनुभव, माहिती सामायिक करतात. हि संकेतस्थळ आपण गूगल वर सर्च करून वाचू शकतो. आणि जो लेखक ब्लॉग लिहितो त्याला ब्लॉगर Blogger असे म्हणतात.
ब्लॉगिंग म्हणजे काय ? Blogging Means What ?
आपण ब्लॉग म्हणजे काय ? आणि ब्लॉगर म्हणजे काय पाहिलं आता ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉगर ब्लॉग वर जे वेगवेगळ्या विषयावर लिहितात आणि कालांतराने पैसे कमवतात त्याला ब्लॉगिंग असे म्हणतात.
ब्लॉगिंग कोण करू शकते ? Who Can Start Blogging in Marathi?
ब्लॉगिंग कुणीही करू शकतो अगदी कुणीही जसे कि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्व व्यक्ती ब्लॉगिंग करू शकतो.
ब्लॉगिंग साठी कुठले कौशल्ये आणि शिक्षणाची पात्रता आहे ? What Skills, Knowledge, Education Require for Blogging in Marathi?
ब्लॉगिंग करण्यासाठी बेसिक कॉम्पुटर च ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि शिक्षणाची काही अट नाही. कितीही शिकलेला व्यक्ती ब्लॉगिंग सुरु करू शकतो.
ब्लॉगिंग सुरु करण्यामागचा काय हेतू असावा ? What should be the Purpose Behind To Start Blogging in Marathi?
ब्लॉगिंग सुरु करण्यामागचा तुमचा हेतू पैसे कमावणे हा नसावा याला कारण आहे ते म्हणजे जेव्हा स्वतः आपण काही करण्याचा प्रयत्न करतो तिथे जर पैश्याची अपेक्षा ठेवून काम करतो तेव्हा जर काही कारणास्तव तुमचा ब्लॉग मॉनिटाईझ नाही झाला तर तुमचा ब्लॉग सुरु करण्यामागचा हुरूप कमी होतो आणि तुम्ही जितक्या जिद्दीने काम करायला सुरवात केलेली असते त्याच्या दुप्पट वेगाने नाराज होता आणि काम करणे बंद करता. ब्लॉगिंग खूप मेहनती फिल्ड आहे यात सातत्य अतिशय महत्वाचे आहे म्हणून पैश्याची हाव न ठेवता ज्ञान सामायिक करायला ब्लॉगिंग चा हेतू माना.
ब्लॉगिंग साठी कुठला विषय निवडावा ? Topics for Blogging or How to Chose Topic for Blogging in Marathi
या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायचे आहे. ते कसे? कारण तुम्हला कुठल्या गोष्टीत जास्त प्राविण्य आहे हे तुमच्या शिवाय जास्त चांगल्या पद्धतीने कुणालाच माहित नाही. ब्लॉग चा विषय असा निवडा ज्यात तुम्हाला इतकं माहित असेल कि ती माहिती वाचताना कुणाला कंटाळा येणार नाही आणि लोक परत परत तुमचे कंटेन्ट वाचायला येतील आणि शेवटपर्यंत वाचतील. थोडक्यात तुम्हला तुमच्या वाचकांना तुमच्या लेखनात सखोल रूळवायचं आहे . उदाहरणार्थ तुम्हाला जर खूप छान स्वयंपाक जमत असेल तर तुम्ही फूड ब्लॉग सुरु करू शकता ज्यात तुम्ही खाद्यपदार्थांबद्दल लिहाल.
मी खाली काही विषय सुचवत आहे :
१) आरोग्य
२) संपत्ती
३) देवधर्म
४) न्यूज
५) ट्रॅव्हलिंग
६) इतिहास
७) टेकनॉलॉजि
८) फूड
९) शेअर मार्केट
१०) शिक्षण
११) पॉलिटिक्स
१२) शेती
१३) नोकरी
१४) एंटरटेनमेंट
१५) फॅशन
१६) वूमन हेअल्थ किंवा मॅन हेअल्थ
१७) बेबी केअर आणि मदरहूड
१८) फिटनेस
१९) फायनान्स
२०) रेव्हिएव साईट
ब्लॉगिंग साठी काही भांडवल लागते का ? How Much Does it Cost to Start a Blog ?
भांडवल म्हटले तर तुम्हाला कॉम्पुटर किंवा लॅपटॉप लागेल आणि इंटरनेट कनेकशन. जर तुम्ही मोबाइल द्वारे करत असाल तर स्मार्ट फोन लागेल.
ब्लॉगिंग साठी काही आर्थिक खर्च लागतो का ? How Much Investment is Required To Start A Blog
तुम्ही फ्री मध्ये सुद्धा ब्लॉग सुरू करू शकता परंतु एक विश्वासू वेबसाइट बनवायची असेल तर डोमेन आणि होस्टिंग विकत घ्यायला थोडा आर्थिक खर्च लागेल. (५००० रुपये पेक्षा जास्त नाही किंवा त्यापेक्षा कमी खर्चात वेबसाइट तयार होईल )
ब्लॉगिंग साठी दिवसभरात किती वेळ द्यावा लागतो ? How Much Time Need to Give for Blogging in a Day?
तुम्ही ब्लॉगिंग दिवसभर, रात्रभर, प्रवासात, स्वतःच्या घरी, नातेवाईकाच्या घरी केव्हाही आणि कुठेही करू शकता आणि कितीहीवेळ कुठल्याही वेळी करू शकता. कारण ब्लॉगिंग म्हणजे स्वतःचा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक.
ब्लॉग सुरु कसा करायचा ? How to Start Blog in Marathi?
ब्लॉगिंग साठी कुठला प्लॅटफॉर्म निवडावा ? How to Choose the Best Blogging Platform?
Blogging ब्लॉगिंग साठी योग्य प्लॅटफॉर्म निवडणे फार महत्वाचे आहे . ज्या प्लॅटफॉर्म वर आपण लिहिणार आहोत ते मुळात आपल्याला सोप्प्या पद्धतीने समजले पाहिजे जेणेकरून काही बदल करायचे असतील तर काही ट्युटोरिअल्स बघून जमले पाहिजेत.
ब्लॉगिंग साठी २ बेस्ट प्लॅटफॉर्म्स आहेत
१) ब्लॉगर Blogger
ब्लॉगर म्हणजे www.blogger.com हा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुम्ही निवडला तर तुम्हाला वेब होस्टिंग घेण्याची गरज नसते , फक्त डोमेन नेम घ्यावे लागते . ब्लॉगर हे गूगल चे प्रॉडक्ट आहे त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने हा प्लॅटफॉर्म तुम्हाला हाताळता येईल . यात सर्वच सेटिंग आहेत , हवी तशी थीम बदलता येते . पण काही वेगळी अशी रचना करायची असेल आर्टिकल ची तर तुम्हला वेगळी अशी स्क्रिप्ट लिहावी लागते .
२) वर्डप्रेस WordPress
वर्डप्रेस म्हणजेच www.wordpress.com या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हला रेडिमेड प्लगिन्स Plugins उपलब्ध असतात ज्याने आर्टिकल ची रचना अगदी सोप्या पद्धतीने पटकन मांडली जाते . मोठं मोठ्या ब्लॉगर्स ची पहिली पसंती वर्डप्रेस आहे .
यापैकी तुम्ही कुठलाही प्लॅटफॉर्म निवडू शकता. पण मी तुम्हाला सुचवेल वर्डप्रेस सोबत जा. सोप्प साधं सरळ आहे.
तसेच ,
ब्लॉगिंग २ पद्धतीने करता येते ,
१) फ्री ब्लॉगिंग (Free Blogging)
जर डोमेन नेम ‘abc’ असेल तर मिळणारी लिंक अशी असते.
- https://abc.blogspot.com (Blogger Platform)
- https://abc.wordpress.com/ (wordpress Platform )
आणि निवडकच फीचर्स वापरायला मिळतात .
२) पेड ब्लॉगिंग (Paid Blogging )
जर डोमेन नेम ‘abc’ असेल तर मिळणारी लिंक अशी असते.
- https://www.abc.com (Any Platform)
पेड ब्लॉगिंग निवडल्यास तुम्हला हवी ती फीचर्स वापरायला मिळतात.
ब्लॉग साठी कुठल्या कंपनीची वेबहोस्टिंग निवडावी ? How To Buy Hosting For Your Blog?
जर तुम्ही blogger.com वर ब्लॉग सुरु करत असाल तर वेबहोस्टिंग ची गरज नाही . परंतु तुमचा ब्लॉग wordpress.com वर असेल तर तुम्हाला स्वतंत्र वेबहोस्टिंग घ्यावी लागेल .
ब्लॉगिंग साठी अनेक कंपनी बाजारात उपलब्ध आहेत पण तुम्हला बेस्ट सर्विस, फीचर्स देणारी कंपनी बघायची आहे.
बेस्ट वेबहोस्टिंग कंपनी लिस्ट :
१) Bluehost
२) HostGator
३) MilesWeb
४) Hostinger
५) DreamHost
६) GreenGeeks
७) SiteGround
८) A2 Hosting
९) InMotion
१०) WP Engine
११) Nexcess
या सर्व लिस्टपैकी Bluehost कंपनी ची वेबहोस्टिंग स्वस्तामध्ये चांगले फीचर्स देते.
Buy Hosting from Here >>> https://yazing.com/deals/bluehost/
ब्लॉग साठी कुठल्या कंपनीचे डोमेन निवडावे ? How To Buy Domain For Your Blog?
डोमेन नेम रजिस्टर करणाऱ्या टॉप चांगल्या कंपनी खालीलप्रमाणे :
१) Domain.com
२) GoDaddy.com
३) Namecheap.com
४) Name.com
५) Google Domains
६) Enom.com
७) Dynadot.com
८) NameSilo.com
Buy Domain Name from Here >>> https://yazing.com/deals/namecheap/
ब्लॉग साठी कसे डोमेन निवडावे ? How To Select Domain Name For Your Blog?
ब्लॉग वर ट्रॅफिक कसे आणायचे ?
Google Web Stories In Marathi गूगल वेब स्टोरीने वाढवा वेबसाईटची ट्रॅफिक https://knowinmarathi.com/google-web-stories-in-marathi/