Home Business Ideas in Marathi: आजकाल प्रत्येकाला काहीतरी करून पैसे कमवायचे असतात. घरातील कामासोबतच एक हातभार म्हणून एखादं उत्पन्न असावं असे अनेकांना वाटते. अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही घरबसल्या चालू करून अगदी कमी वेळेतच चांगला नफा मिळवू शकता.
चला तर मग, आज आपण महिलांसाठीच्या 10 बेस्ट व्यावसायिक कल्पना Home Business Ideas in Marathi जाणून घेऊया. ज्यामध्ये तुम्हाला जास्त भांडवल गुंतवावे लागणार नाही. हे तुम्ही घरी बसूनही करू शकता..
Home Business Ideas in Marathi
1. टिकल्या बनवण्याचा व्यवसाय
टिकली हा महिलांच्या मेकअपचा मुख्य भाग आहे. आता घरात राहून काही पैसे कमवायचे असतील तर तुम्ही टिकल्या बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला पैशांची आणि उच्च शिक्षणाची गरज नाही. अगदी सहज हा व्यवसाय चालू करता येतो.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एक लहान टिकल्या बनवण्याची कटिंग मशीन आणि गोंद खरेदी करून हे काम सुरू करू शकता.
2. मेणबत्ती व्यवसाय
Home Business Ideas in Marathi: मेणबत्त्या प्रथम घरांमध्ये प्रकाशासाठी वापरल्या जायच्या. पण आता ते सजावट म्हणून वापरले जाते. घरबसल्या कमी खर्चात व्यवसाय करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता. सणासुदीला मेणबत्त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते.
आज बाजारात मेणबत्त्या बनवण्याचे विविध प्रकारचे साचे उपलब्ध आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते विकत घेऊ शकता. कारण लोकांना सणासुदीला डिझायनर मेणबत्त्या जास्त आवडतात. त्यामुळे मेणबत्ती व्यवसायातून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.
3. पापड बनवण्याचा व्यवसाय
पापड जवळपास प्रत्येक घरात वापरला जातो. लहानांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच पापड खायला आवडतात. आणि स्त्रियांनाही पापड बनवायला आवडतात. घरबसल्या सहजपणे हा व्यवसाय चालू करता येतो.
गृहीणींसाठी पापड बनवण्याचा व्यवसाय एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला जास्त शिक्षित असण्याची किंवा जास्त भांडवल गुंतवण्याची गरज नाही, अगदी सुरूवातीला 5 ते 10,000 रुपये गुंतवून तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.
[2023] टॉप 10 बेस्ट नवीन बिजनेस आयडिया | New Business Ideas in Marathi
4. ब्युटी पार्लरचा व्यवसाय
आजकाल सर्वांनाच सुंदर दिसायला आवडते. स्त्रियांना तर आपण इतरांपेक्षा किती सुंदर दिसतो याकडे जास्त कल असतो, त्यामुळे ब्युटी पार्लरचा व्यवसाय खूप ट्रेंड होत आहे. प्रत्येक स्त्री स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी किती पार्लरमधून जाते माहीत नाही.
ब्युटि पार्लर चा कोर्स करून, चांगली ट्रेनिंग घेऊन तुम्ही स्वत:च पार्लर उघडू शकता आणि सहजच चांगली कमाई यातून करू शकता. या कामातील नफा तुमच्या हातावर म्हणजेच स्किल्स वर अवलंबून आहे.
जर तुम्ही चांगले काम केले तर महिला तुमच्याकडे वारंवार येतील आणि तुम्ही चांगला नफा यातून कमवू शकता.
5. दागिने बनवण्याचा व्यवसाय
महिलांना दागिन्यांची खूपच आवड असते त्यामुळे अगदी आपल्या कपड्यांना शोभेल असे दागिने त्या खरेदी करत असतात. जर तुम्हाला दागिने कसे बनवायचे हे माहित असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.
सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, विविध प्रकारचे दागिने बनवून तुम्ही या व्यवसायात उतरू शकता आणि घरातील कामांसोबतच काही पैसे कमवून घरखर्च चालवू शकता.
6. मसाल्याचा व्यवसाय
भारतात मसाल्यांना एक वेगळाच दर्जा आहे. विविध प्रदेशांनुसार मसल्यांची चव बदलते. जेवण चविष्ट बनविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे मसाले भेटतात ज्यामुळे जेवणाची चव वाढते.
तुम्ही गावामध्ये मसाल्याची शेती करून त्यातून चांगल्या प्रकारची कमाई करू शकतात. विविध प्रकारचे मसाले तुम्ही तुमच्या घरीच बनवू शकता आणि विकू शकता.
7. दूध व्यवसाय
गावातील बहुतांश लोक पशुपालन करतात. गाई, म्हशी पालन करून तुम्ही दूध व्यवसायाला सुरुवात करू शकता. या व्यवसायातही मोठ्या प्रमाणात कमाई करण्याची संधी आहे.
दुधापासून अनेक पदार्थ जसे की दही, ताक, तूप इत्यादी तयार करून तुम्ही ते बाजारात विकू शकता आणि चांगली कमाई करू शकता. सुरुवातील कमी गुंतवणूक करून तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता.
8. टेलरिंग व्यवसाय
हल्ली या फॅशनच्या जमान्यात प्रत्येक सणाला आपल्याला नवीन कपडे घालावेसे वाटतात. पण कपडे शिवणे प्रत्येकाच्याच क्षमतेत नसते. शिवणकाम शिकून तुम्ही या व्यवसायाला घरातून सुरुवात करू शकता.
यामध्येही अनेक प्रकारचे डिझायनर कपडे शिवून जास्त पैसे कमवण्याची संधी आहे.
9. लोणचे बनवण्याचा व्यवसाय
आपल्या भारतीय संस्कृतीत लोणचे हे प्रत्येकाच्या घरी असते आणि लोणची खायला जवळपास सगळ्यांनाच आवडते. पण, चांगले लोणचे बनवणे हे सगळ्यांनाच जमत नाही.
जर तुमच्याकडे लोणचे बनवायचे कौशल्य असेल तर तुम्ही याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून पैसे कमवण्याचे साधन बनवू शकता. बाजारात आज लोणच्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे तुम्ही यातून चांगली कमाई करू शकता.
10. किराणा दुकान
गावामध्ये किराणा मालाचे दुकान खूप चालते. यासाठी तुम्हाला वेगळ्या जागेची गरज भासणार नाही, अगदी घरातूनच तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. प्रथम काही वस्तूंसह आपला व्यवसाय सुरू करा आणि हळूहळू नफा वाढत गेल्यास तुम्ही दुकानातील मालही वाढवू शकता.
दुकानात खूप महागड्या वस्तू ठेवू नका. कारण बहुतांश लोकांना फक्त गरजेच्याच वस्तूंची खरेदी करायला आवडते. जसे तांदूळ, तेल, मैदा आणि इतर जीवनपयोगी वस्तु.
11. हस्तनिर्मित वस्तू
आजकाल अनेकांना आपल्या घरामध्ये हस्तनिर्मित वस्तु ठेवायला आवडते ज्यामुळे घर अजून छान दिसते. यामध्ये फुलदाण्या, एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, तसेच नक्षीकाम करून अनेक प्रोडक्टस बनवता येतील.
हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे चांगले कौशल्य असणे गरजेचे आहे.
12. कॉस्मेटिक दुकान
गावात बाजार खूपच दूर असतो त्यामुळे महिलांना गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे तुम्ही गावात कॉस्मेटिक दुकान उघडू शकता. यामध्ये अनेक प्रकारच्या वस्तु तुम्ही ठेऊ शकता. जसे बांगड्या, फॉल्स, मेकअपचे सामान इत्यादी.
कोणत्याही व्यवसायात महत्वाचे असते ते तुम्ही तुमच्या ग्राहकांना कशी वागणूक देता. त्यामुळे व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या ग्राहकांच्या तक्रारी आणि प्रश्न नीट ऐकून घ्यावे लागतील तरच तुम्ही एक यशस्वी उद्योजक बानु शकता.
निष्कर्ष: Home Business Ideas in Marathi
तर या होत्या काही युनिक व्यवसाय कल्पना ज्यांमध्ये तुम्हाला अतिशय कमी भांडवलाची गरज लागते आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही नफा कमवू शकता.
जर तुम्हाला Home Business Ideas in Marathi आधारित विषयावर हा लेख आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
नवनवीन व्यवसाय कल्पना जाणून घेण्यासाठी तुम्ही Smart Udyojak वेबसाईट ला भेट देऊ शकता.