NFTs म्हणजे काय ? Non-Fungible Token | NFT in Marathi

जेव्हा एका डिजिटल आर्टवर्क चा तुकडा लिलावात ६९$ मिलिअन्स ला विकला जातो तेव्हा साहजिकच रित्या तो टेकनॉलॉजि क्षेत्रात चर्चेचा विषय बनला जातो. जग झपाट्याने डिजिटायझेशन अग्रेसर होत आहे यातच सर्वात महागात विकल्या जाणाऱ्या आणि अचंबित करणाऱ्या किमतीत ते विकत घेतल्या जाणाऱ्या NFTs बद्दल बोलले जात आहे.

परिचय

NFT Technology आर्ट वर्ल्ड मध्ये एक भली मोठी क्रांती आणत आहे. NFTs नवीन पिढीसाठी खुपच कुतूहलाची टेकनॉलॉजि ठरत आहे. मोठ मोठ्या अरबपतींनी लाखो डॉलर्स NFTs वर खर्च केले आहे परंतु NFT हे डिजिटल स्पेस मध्ये असते यांना तुम्ही इंटरनेट वर पाहु शकता परंतु त्याना हात लावु शकत नाही मग असं काय आहे यात ज्याने डिजिटल जगात हंगाम केलाय लोक लाखो, करोडो ने हे विकताय आणि विकत घेतले पण जाताय ? डिजिटल आर्टवर्क इंटरनेट वर सर्च करून कधीही पाहिलं जाऊ शकते मग लोक ते विकत का घेत आहेत ? हे बघुयात


महागात विकले गेलेले NFTs 

१) जगातील पहिले ट्विट विकले गेले २० करोड रुपयाला

ट्विटर चे फाउंडर जैक डोर्सी यांचं एक ट्विट २० करोड रुपयाला विकले गेले. यु.एस. च्या cent नावाच्या कंपनी ने Valuables नावाच्या एका प्लॅटफॉर्म वर हे ट्विट विकले गेले. हे ट्विट २१ मार्च २००६ ला केले होते हे जैक डोर्सी यांचे पहिलेच ट्विट नसून ते ट्विटर वरीलच पहिले ट्विट होते. २२ मार्च २०२१ ला हे ट्विट डिजिटल स्वरूपात NFT म्हणून विकली गेले. हे ट्विट Sina Estavi सीना एस्टावी ने  एस्टावी च्या ट्विटर च्या आधारे विकत घेतले आहे. blockchain company Bridge Oracle चे ते सिइओ आहेत.


२) १ JPEG फाइल विकली गेली ५ अरब रुपयाला

Everyday-The-First-5000-Days-by-Beeple-NFT-Cropped
तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही परंतु १ कोलाज केलेली फाइल NFT स्वरूपात विकली गेली आहे ६९$ मिलियनला . Mike Winkelmann नावाच्या एका डिजिटल आर्टिस्ट ने एक कोलाज इमेज बनवली होती जी त्याने लिलावात ठेवली होती ती ६९$ मिलियनला विकली गेली. २००७ पासून आजपर्यंत जेही फोटो त्याने पोस्ट् केले त्याचे कोलाज त्याने यात करून प्ले केले होते. दररोज: Everydays: the First 5000 Days हे माईक विंकेलमन यांनी तयार केलेले एक डिजिटल वर्क आहे, ज्याला व्यावसायिकपणे बीपल म्हणून ओळखले जाते.

असे अजून बरेचशे NFTs आहेत जे खूप महागात विकले गेले आहेत.

फुल्ल फॉर्म एनएफटी चा What is Full form of NFT in Marathi ?

NFT म्हणजे नॉन-फंगीबल टोकन Non-Fungible Token.

Fungible फंगीबल म्हणजे सामान मुल्य असलेल्या वस्तुसोबत अदलाबदल करता येणे. म्हणजे १० रुपयाची वस्तु दुसऱ्या १० रुपयाच्या वस्तु सोबत अदला बदल करता येणे.

एनएफटी म्हणजे काय ? What is NFTs in Marathi ?

एनएफटीला क्रिप्टोग्राफिक टोकन असे देखील म्हटले जात आहे. कुठलेही डिजिटल आर्ट ला युनिक असल्याचा दावा कुणी करत असेल आणि त्याचा मालकी हक्क असणारा एक खास व्यक्ती आहे तर त्याला Non-Fungible Token असे म्हणतात. हे एक डिजिटल आर्ट असतात जसे कि Music, Image, GIF, Video, Text, Game. हे Non-Fungible असल्या कारणाने याचे मालकी हक्क हस्तांतरित होत नाहीत.यांची स्वतःची एक ओळख असते. हे कुठल्याही दुसऱ्या वस्तु सोबत बदलता येत नाहीत.

प्रत्येक एनएफटी हि दुसऱ्या एनएफटी पेक्षा वेगळी असते. उदा. मोनालिसा चे चित्र जे सगळ्यात महाग आणि अनोखे आहे जे कुठल्याही वस्तु सोबत अदला बदल करता येणार नाही, किंवा नाही त्याचे तुकडे तुकडे करून वाटले जाऊ शकत. NFT ची संकल्पना अशीच काही आहे.

NFT डिजिटल असल्या कारणाने त्याला स्पर्श करू शकत नाही. NFT चा नेहमीसाठी १च मालक असतो कोणीही त्याला इंटरनेट वरून डाउनलोड करून विकू शकत नाही कारण NFT हे Blockchain वर चालते आणि सर्व एनएफटी ची माहिती हि Blockchain मध्ये सेव्ह होते. हि ब्लॉकचेन सार्वजनिक रित्या प्रसारित होत असल्या कारणाने कुठल्या NFT चा कोण खरा मालक आहे हे सर्वानाच माहित होते. थोडक्यात Blockchain मध्ये डिजिटल आर्ट चे पंजीकरण यालाच NFT असे म्हणतात.

बिटकॉइन पाठवताना जशी लेजर मध्ये एन्ट्री होते तशीच NFT साठी होते पण येथे फाइल चा ॲड्रेस सेव केला जातो ज्याने NFT च्या स्वामित्वाचे पंजीकरण होते.

NFT मध्ये कोणते Assets येतात ?

तुमच्या अधिक माहितीसाठी सांगत आहोत NFT मध्ये ते सर्व assets येतात जे Unique आहेत.

  • Images
  • Virtual Video Games or Video Game Clips
  • GIF
  • Text
  • Music
  • Digital Avatar

NFTs कसे काम करते ? How NFTs Works in Marathi ?

आधी सांगितल्या प्रमाणे NFT Blockchain वर सेव केली जाते. बिना ब्लॉकचेन एनएफटी चे अस्तित्व शून्य आहे. ETHEREUM हा पहिला प्लॅटफॉर्म आहे ज्याने Smart Contract बनवले ज्याच्यावर सगळ्यात पहिली NFT Cryptokitties बनवली गेली आणि सगळ्यात जास्त NFT संबंधीत प्रोजेक्ट्स ETHEREUM वरच बनवले जातात. ETHEREUM  प्रमाणे Binance Smart Chain, EOS, TRON, WAX हे देखील प्लॅटफॉर्म आहेत जेथे NFTs खरेदी विक्री केले जातात.

जेव्हा एखाद्या image, video याची NFT बनवतो तेव्हा त्याच्या वापर हा मर्यादित उरतो, प्रत्येक जण त्याचा वापर करू शकत नाही कारण त्याला Tokenised करून त्याचे Digital Certificate बनवले जाते ज्याला ब्लॉकचेन वर स्टोर केले जाते. जोही व्यक्ती त्या डिजिटल सर्टिफिकेटचा मालक आहे तो ते कुणालाही विकू शकतो त्याचप्रमाणे कुणाचे Digital Certificate विकत देखील घेऊ शकतो.

याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि जो कुणी NFT चा मूळ मालक आहे त्याच आर्टवर्क असलेली NFT विकल्यानंतर ती पुढे परत कुणाला विकली गेली तरी मूळ मालकांना काही टक्के हिस्सा मिळणार. आणि ती NFT पुढे विकलीच जाईल.


NFT कशी बनवायची ? How to Make NFT in Marathi ?

NFT बनवायची म्हणजे आपलं डिजिटल आर्टवर्क जेकी Unique आहे त्याला NFT मध्ये convert करायचे. त्याचीच माहिती आता आपण घेणार आहोत. कुठल्याही आर्टवर्कला NFT मध्ये कन्व्हर्ट करायचे असेल तर Blockchain Technique चा वापर करावा लागतो. ब्लॉकचेन Tron, Binance, Ethereum इत्यादींपैकी काहीही असू शकते. कुठल्याही टॉप लेव्हल च्या NFT MarketPlace च्या मदतीने डिजिटल आर्टवर्क ला Crypto NFT मध्ये बदलता येते.

NFTs खरेदी आणि विक्रीसाठी सर्वोत्तम MarketPlace कोणते आहेत? What are Best Marketplaces to Buy and Sell NFTs?

  • Binance
  • OpenSea
  • Nifty Gateway
  • Rarible
  • Foundation
  • SuperRare
  • Solanart
  • Decentraland
  • NBA Top Shot
  • Axie Infinity

NFT विकायची कशी ?How to Sell NFT in Marathi ?

एकदाका Non-Fungible Token बनवली कि ती विकणे फार सोप्पे आहे. क्रिप्टो मार्केटप्लेसमध्ये अनेक प्लॅटफॉर्म्स आहे जिथे तुम्ही बनवलेली  NFT सेल करायची संधी उपलब्ध असेल. तुमच्या डिजिटल आर्टवर्क संबंधित मार्केटप्लेस तुम्हाला निवडावे लागेल. उदा. Crpto Kitties हे एक मार्केटप्लेस आहे जिथे Digital Cats चे खरेदी विक्री होऊ शकते. तर कुठल्याही डिजिटल कॅट्स चे आर्टवर्क तुम्ही या मार्केटप्लेस वर लिस्ट करू शकता.

NFT खरेदी कशी ?How to Buy NFT in Marathi ?

डिजिटल एनएफटी चे पेमेंट क्रिप्टोकरन्सी मध्येच होते. क्रिप्टो एनएफटी खरेदी करण्यासाठी तुम्ही कुठल्याही टॉप मार्केटप्लेस ला भेट देऊ शकता. एनएफटी विकत घेण्यासाठी To Buy NFT, Crpto Wallet असणे महत्वाचे आहे. Crpto Wallet मध्ये पैसे हवे. त्या पैश्यामधून इथरियम, ट्रॉन, बिनन्स या Cryptocurrency विकत घ्याव्या लागतात.

NFTs इतके लोकप्रिय का आहेत? Why are NFTs so Popular?

  • ते हस्तांतरणीय आहेत
  • ते Unique आहेत
  • मालकी हक्क कितीही हस्तांतरित झाले तरी जतन केले जातात.

NFTs Characteristics NFT ची वैशिष्ट्ये

  • अद्वितीय Unique
  • शोधण्यायोग्य Traceable
  • दुर्मिळ Rare
  • अविभाज्य Indivisible
  • प्रोग्रामेबिलिटी Programmability

निष्कर्ष :

आशा आहे तुम्हाला NFTs बद्दल हवी ती माहिती मिळाली असेल NFT काय आहे ? कसे काम करते ? कशी बनवायची ? कशी विकायची ? कशी विकत घ्यायची ?  Non-Fungible Tokens ची उदाहरणे तुम्ही पाहिलीत. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया आमच्या सोबत सामायिक करायला विसरू नका तसेच तुम्हाला याशिवाय अजून काही जास्त माहिती ठाऊक असेल तर ती आम्हाला कंमेंट सेकशन मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. तुम्हाला NFTs संबंधात अजून काही शंका असतील तर आम्हाला कळवा आम्ही नक्की त्याचे निरसन करू.

3 thoughts on “NFTs म्हणजे काय ? Non-Fungible Token | NFT in Marathi”

  1. छान आहे माहिती. क्रिप्टोकरन्सीबद्दल मराठीमध्ये बरंच कमी माहिती आहे – अजून लिहा.

    Reply

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti