नाशिक, महाराष्ट्र – २७-८-२०२१ – ‘महावीर’ महाविद्यालयात ‘युथ ड्रीमर फाऊंडेशन’ने दिली शिष्यवृत्ती प्रमाणपत्रे ‘
संवेदनशील मनावरच आज जग चालत असून दैनंदिन जीवनात जगतांना सर्वांनी ‘संवेदनशीलता’ जपली पाहिजे, दुसऱ्याच्या दुःख ,वेदना आपल्याला जाणता आल्या पाहिजे,ज्यांची संवेदना जागृत नाहीत अथवा कमी होत गेल्यात ते निष्ठुर आहेत’ असे प्रतिपादन भारतसरकार मानवाधिकार आयोगाचे सल्लागार, थोर लेखक तसेच ज्ञानरत्न पुरस्कार, गोदारत्न पुरस्कार प्राप्तकर्ते श्री. प्रकाश कोल्हे यांनी श्री महावीर एज्युकेशन सोसायटी,नाशिक येथे आयोजित ‘पेरनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन (सीग्राम) शिष्यवृत्ती’ कार्य्रक्रमात केले. यावेळी व्यासपीठावर युथ ड्रीमर फाऊंडेशनचे प्रोजेक्ट ऑफिसर श्री रमण टेकाळे, श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयिका तसेच डीन डॉ. प्रियंका झंवर, महावीर पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. संभाजी सगरे, संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य श्री. नवनाथ पाळदे, महावीर इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी आणि बी. फार्मसीच्या प्रभारी प्राचार्या सौ. अनघा सर्वज्ञ,युथ ड्रीमर फाऊंडेशनचे अधिकारी श्री. वैभव कदम, शिष्यवृत्ती विभागाचे प्रमुख श्री. गोपाळ घुगे आदी उपस्थित होते. यावेळी अधिक बोलतांना श्री. प्रकाश कोल्हे म्हणाले की, “ज्यावेळी दुसऱ्याचे दुःख कष्ट पाहून आपल्या हृदयात मदतीची जाणीव निर्माण होईल, त्यावेळी आपण संवेदनशील आहोत याची आपल्याला जाणीव होईल. त्यामुळे समाजात जगतांना आपण कुणाचे तरी देणे लागतो, आपण सतत दुसऱ्याला काही तरी चांगलं देण्याची सवयही लावलीच पाहिजे.
संकटकाळी गरिबांना मदत करणे, त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे ही आपली समाजाप्रती बांधिलकी आहे” असेही ते यावेळी म्हणाले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानातून बोलत होते. ‘परनॉड रिकार्ड इंडिया (सीग्राम) फाउंडेशनचे व्यवस्थापक राजेंद्र देशमुख, युथ ड्रीमर फाऊंडेशनचे डायरेक्टर सौरभ मेहरोत्रा, सीईओ मनीष शर्मा यांच्या मार्गदर्शना खाली झालेल्या या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, युथ ड्रीमर फाऊंडेशनचे प्रोजेक्ट ऑफिसर श्री रमण टेकाळे,श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयिका तसेच डीन डॉ. प्रियंका झंवर यांच्या हस्ते अंजली निकम, शुभम कुमावत,साहिल पगारे, वैष्णवी निंबाळकर, मुस्कान मणियार, राघव वडजे, शुभम गांगुर्डे, प्राजक्ता जाधव, साक्षी शार्दूल, विशाल घुगे, निलेश ढाकणे आदींना प्रातिनिधिक स्वरूपात स्कॉलरशिप प्रमाणपत्रे देण्यात आली.
सण २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाविद्यालयाच्या एकूण १०५ विद्यार्थ्यांना २७ लाखापर्यंतची स्कॉलरशिप फाउंडेशन तर्फे त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे अशी माहिती यावेळी युथ ड्रीमर फाऊंडेशनचे प्रोजेक्ट ऑफिसर श्री रमण टेकाळे यांनी उपस्थितांना दिली. ‘महावीर’ महाविद्यालयात दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांचा मोठया संख्येने प्रवेश होत असल्याने सदर योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात याठिकाणी मिळणे सुलभ झाले असून सण २०२१-२२ साठी विद्यार्थ्यांनी महावीर पॉलिटेक्निक , संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि महावीर संस्थेमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा व महाविद्यालयातून सदर योजनेचे आवेदन भरावे असेही यावेळी श्री रमण टेकाळे म्हणाले.
इंजिनिअरिंग,फार्मसीचे शिक्षण घेऊ ईच्छिनाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षण अतिशय सोपे झाले असून शैक्षणिक खर्चाची चिंता न करता आपले भविष्य उज्वल करायचे आहे, परनॉर्ड रिचर्ड इंडिया फाउंडेशन ( सिग्राम), युथ ड्रीमर फाऊंडेशन आणि महावीर शिक्षण संस्था आपल्या पाठीशी आहे आणि या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थी पालकांनी घ्यावा असे आवाहन महावीर एज्युकेशन सोसायटीच्या समन्वयिका डॉ. प्रियंका झंवर यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमासाठी श्री.गोपाळ घुगे, मनीषा पवार,श्री. वैभव कदम यांनी कष्ट घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय भामरे यांनी केले.