प्राचीन काळापासून शकुन आणि अपशकुन घटना आपल्या धर्मात मानल्या जात आहेत. असे मानले जाते कि या शकुन अपशकुन घटनांच्या आधारे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज आपण घेऊ शकतो. ज्योतिषशास्त्र देखील या घटनांच्या पक्षात आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या घटना एखाद्या व्यक्तीचे फायदे, तोटे, यश आणि अपयशाबद्दल सांगू शकतात. हेच कारण आहे की आपणशिंक येणे , मांजरीने मार्ग कापणे या सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. ज्योतिषशास्त्रानुसार घरात नको असणाऱ्या गोष्टी घडत असेल तरी देखील शुभ अशुभ संकेत मिळतात. जसे कि हातातून भांडी निसटणे, काचेही भांडी फुटणे किंवा दूध उतू जाणे किंवा सांडणे. या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संकेत असतात. या गोष्टी आपल्याला भविष्यातील घटनांविषयी चेतावणी देतात. कधीकधी त्यांची भविष्यवाणी इतकी अचूक असते की आपल्या डोळ्यांवर देखील विश्वास बसत नाही. हे लक्षात ठेवून, आज आम्ही तुम्हाला उकळते दूध भांड्यातून बाहेर पडण्याचा अर्थ समजावून देऊ.
दूध सांडणे किंवा उतू देतात हे संकेत :
बर्याचदा आपण गॅसवर दूध उकळण्यासाठी ठेवतो आणि दुसऱ्या कामाला लागतो. परंतु कधी-कधी योग्य वेळात गॅस बंद न केल्यामुळे दूध उकळते आणि गॅस स्टोव्हवर किंवा ओट्यावर सांडते. बरेच लोक याकडे किरकोळ वस्तू म्हणून दुर्लक्ष करतात. त्याच वेळी, काही लोक असे आहेत की या दुधाचे ह्या प्रमाणे सांडणे म्हणजे काय याबद्दल संभ्रमित होतात.
दुध ह्याप्रकारे सांडण्याचा अर्थ किंवा संकेत आहे अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसान. ज्या दिवशी असे काही घडेल त्या दिवशी शक्यतो बाजार करणे, काही वस्तु खरेदी करणे टाळावे.
जर घरात सलग काही दिवस दूध तापवताना उतू जात आहे तर नक्कीच घरात वाद, भांडणे कुटुंबकलाह होतील हा संकेत मिळतो.
थंड दूध भांड्यातुन सांडणे :
ज्योतिष शास्त्रात दूध सांडायला खुप महत्त्व आहे. थंड दुधाचे भांड हातातून निसटून दूध सांडणे याला काही लोक अपशकुन मानतात. चुकून दुधाच्या भांड्याला पाय लागून थंड दूध सांडणे देखील मोठा अपशकुन मानला जातो. अश्या स्थितीत काही शुभ किंवा महत्वाची कामे करू नये.
थंड दूध भांड्यातुन सांडल्याचा अपशकुन असा मानला जातो कि काहीतरी मानहानी , सन्मान, प्रतिष्ठा इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
दूध गॅस हुन ऊतू जाऊ नये हा अपशकुन होऊ नये यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता ती पुढील प्रमाणे :
गॅस वर दूध तापायला ठेवल्यावर दुधाच्या भांड्यावर एक लाकडी चमचा ठेवावा याने दूध ऊतू जायला प्रतिबंध होतो. याचे कारण हे कि धातू ऊर्जेचे वाहक आहे आणि लाकूड प्रतिबंधक.
आपण पाहिलेत कि दूध उतू जाण्याचे इतके दुष्परिणाम आहेत म्हणून आपल्या घरात सौख्य टिकावे, समृद्धी राहावी, आर्थिक नुकसान न व्हावे आणि सर्वांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मुद्दाम दूध ऊतू घालू नये तसेच घरात बाहेरच्या व्यक्तीला करू देऊ नये.
आमच्या लाडक्या वाचक प्रेक्षकांनो आम्ही येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या संकेत स्थळाचा अजिबात उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी, समज आपल्या पर्यंत पोहचवले जावे हा आमचा प्रयत्न. कोठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला बढावा आम्ही देत नाही. इथे लिहिले जाणारे लेख हे फक्त तुमच्या माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका हि विनंती.
तुम्हाला आमच्यामार्फत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.