डोक्याला टीळा लावल्यावर तांदूळ का लावतात ?

हिंदू धर्मात डोक्याला टीळा लावणे खूप महत्वाचे आणि पवित्र मानले जाते. पूजा, लग्न, वाढदिवस वगैरे कोणत्याही समारंभात कपाळी टीळा लावला जातो.

हिंदू धर्मात याचे विशेष महत्व आहे. शास्त्रात श्वेत चंदन , कुंकू, लाल चंदन,बिल्वपत्र, भस्म इत्यादींनी टीळा लावणे शुभ मानले गेले आहे.

शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले गेले तर डोक्यावर जिकडे तुम्ही दोन भुवयांच्या मधोमध टीळा लावता त्याला अग्निचक्र असे म्हणतात. इथूनच संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार होतो.

तांदूळ हे शुद्धतेचे प्रतिक मानले गेले आहे. शास्त्रानुसार तांदूळ हे हवनात देवतांना अर्पण केले जाणारे पवित्र आण आहे. अशात टीळा लावताना तांदुळाचा प्रयोग सकारात्मक उर्जा प्रदान करतो.

टिळा लावण्याचे कारण

१) मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने.. २) शत्रू चा नाश करायचा असेल तर तर्जनीने, ३) धनप्राप्ती हेतू मध्यमानी आणि ४) शांती प्राप्ती साठी अनामिकानि टिळा लावला जातो.

टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त लपलेले असते.