मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय? What Is A Menstrual Cup in Marathi ?

Menstrual Cup मासिक पाळीचा कप हा रबर, सिलिकॉन किंवा लेटेक्सचा बनलेला लहान, लवचिक, शंकूच्या आकाराचा, फनल च्या आकाराचा कप असतो जो स्त्रिया त्यांच्या योनीमध्ये घालतात.

मासिक पाळीच्या कपमध्ये सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स सारख्या मासिक पाळीत वापरणाऱ्या गोष्टीपेक्षा जास्त रक्त जमा होते, ज्यामुळे ते अनेक स्त्रियांना उपयुक्त वाटते.

हे कप वेगवेगळ्या आकारात येतात आणि तुम्ही तुमच्या योनी आणि सर्विक्सच्या आकारानुसार योग्य कप निवडावा. सिलिकॉन मटेरियल पासून मेन्स्ट्रुअल कप बनवतात त्यामुळे त्याच्या वापराने अजिबात इजा होत नाही.

योनीमध्ये ते घालताना कुठलीही वेदना किंवा अस्वस्थता वाटत नाही. योनीमध्ये प्रवेश केल्यावर त्याचा आकार कपासारखा येऊन जातो.

या आकारात मग  रक्त जमा होऊ लागते. Menstrual Cup च्या वापराने आपण काही लावलंय असं आठवत पण नाही जसे पॅड किंवा टॅम्पॉन लावल्यावर जाणवते.

सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा