Tawa Vastu Tips in Marathi आपल्या हिंदू संस्कृतीत अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या धर्माशी बांधुन ठेवतात. बऱ्याच गोष्टी अश्या आहेत ज्याच्यात काही तथ्य नाही तरी पूर्वी पासुन चालु आल्यात म्हणुन आपण पण त्या डोळे झाकुन काही विचार न करता पाळत आलो आहोत. बरेच लोक तर अश्या गोष्टीना अंधश्रद्धा पण म्हणतात पण वास्तु शास्त्रा प्रमाणे काही गोष्टी खुप महत्वाच्या असतात, जसे कि गरम तव्यावर पाणी नाही टाकलं पाहिजे.
स्वयंपाक घरातील महत्वाच्या भांडयापैकी एक भांड म्हणजे तवा. तव्या शिवाय स्वयंपाकघर अपूर्ण आहे. तवा चपाती बनवण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत कधी कधी पाणी तापवायला पण वापरले जाते. परंतु वास्तुशास्त्रात तवा स्वयंपाकघरात कसा ठेवावा आणि त्यातून होणारा फायदा आणि तोटा आपल्यला लक्षात घ्यायला हवा.
तवा चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास खालील कारणांमुळे होऊ शकतो स्वयंपाक घरात वास्तुदोष Tawa Vastu Tips :
२) सकाळी तव्यावर कुठलाही पदार्थ करण्याआधी तवा स्वच्छ धुतल्यावर मीठ शिंपडावे. शक्यतो सर्व गृहिणी चपातीचा करतात तेव्हाच मीठ शिंपडून घ्यावे, याने घरात अन्न-धान्य मुबलक प्रमाणात राहते कधीही अन्न धान्यांची कमी भासत नाही. त्याच प्रमाणे एक बोनस टीप म्हणजे,
” प्रत्येक दिवशी पहिली चपाती प्राणी-पक्ष्यांना काढुन ठेवावी याने घरात समृद्धी आणि प्रसन्नता नांदते ”
खडे मीठ, जाड मीठ, मीठ संदर्भातील वास्तु टिप्स साठी इथे वाचा खडे मीठ किंवा जाड मीठ आणि वास्तु
३) तवा नेहमी बाहेरच्या लोकांच्या नजरेस पडला नाही पाहिजे असा ठेवावा, बाहेरच्या व्यक्तीची नजर थेट तव्यावर पडणं वास्तुनुसार वाईट आहे.
४) तवा कधीही उपडी / उलटी ठेऊ नये, चुकुन पण असे केल्यास काही वाईट बातमी ऐकू येते. किंवा अचानक घडणारी एखादी वाईट बातमी येऊ शकते.
५) बऱ्याच बायका रात्रीची भांडी घासायचा कंटाळा करतात किंवा सकाळ साठी मांडुन ठेवता परंतु हे वास्तु च्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे असे केल्याने आपण आपसुक अलक्ष्मी, दारिद्रता, नाकारात्मकतेला आमंत्रण देतो. अश्याने घरात कानाकोपऱ्यात रोगराई पसरण्यास सुरुवात होते. न धुतलेल्या भांड्यामध्ये मुख्यत्वे कढई, तवा यामध्ये राहू- केतू विराजमान असतात आणि ती अस्वच्छ असल्याने वरील परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी १०-१५ मिनिटे काढुन भांडी घासुन घ्यावीत न जमल्यास कमीत कमी लोखंडाची भांडी जसे कि कढई, तवा घासुन ठेवावा.
६) तवा कधीही खरडु नये. स्वच्छ होत नसल्यास पाण्यात भिजत ठेवावा स्वच्छ निघतो.
७) तव्यात कधीही खाऊ नये म्हणजे तो उष्टा करू नये.
८) लिंबू आणि मीठाचा वापर करून तवा स्वच्छ करू शकता. वास्तुनुसार स्वच्छ आणि चमचमत्या तव्याच्या सहाय्याने तुमचं नशीबही पालटू शकतं. तवा जितका जास्त स्वच्छ तितके जास्त नशीब तुमचे उजळेल.
९) गरम वाफाळत्या तव्यावर कधीही पाणी टाकु नये याने नवरा-बायकोच्या संबंधावर वाईट परिणाम पडतात.