Quora Partner Program in Marathi : नमस्कार मंडळी ! घरबसल्या कमवा या सेकशन मधील नवीन विषयाची माहिती घेण्यासाठी आलेल्या सर्व वाचक प्रेमींचे हार्दिक स्वागत. आजचा विषय आहे Quora मार्फत पैसे कसे कमवावे ? Quora Partner Program in Marathi. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन परीक्षा पास होतो पण दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवा असं जर म्हटले तर विश्वास ठेवाल ? याच उत्तर तुम्हीच कंमेंट सेकशन मध्ये सांगा. Quora मार्फत पैसे कसे कमवावे ? याची सर्व माहिती सविस्तर मध्ये घेणारच आहोत पण तुम्हला नेमकं Quora म्हणजे काय माहित आहे का?
१५ गुंतवणुकी शिवाय घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग Earn Money Online Without Investment in Marathi
या लेखात नमूद केल्याप्रमाणे Quora मार्फत आपण घरबसल्या पैसे कमावू शकतो. Quora प्रमाणेच इतर गुंतवणुकी शिवाय घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग जाणून घ्यायचे असतील तर वर दिलेल्या लिंक ला भेट द्या आणि सविस्तर माहिती घ्या.
Quora म्हणजे काय ?
Quora एक सोशल मीडिया वेबसाइट आहे. हि एक प्रश्न-उत्तरे सोशल मीडिया वेबसाइट आहे. डोकं १०० नव्हे १००० विचारांचं घर असत त्या प्रत्येक विचारावर किमान १०-१५ तरी प्रश्न असतात मग काहींची उत्तरे मिळतात काहींची नाही मग अश्या उत्तर माहित नसलेल्या प्रश्नांची उत्तरे कुठे मिळणार तर Quora वर यावर तुम्ही कुठलेही प्रश्न विचारू शकता ज्यावर तज्ञ मंडळी तुम्हला उत्तरे देतील. विशेष म्हणजे या वेबसाइट वर तुम्ही गुप्त रित्या देखील प्रश्न विचारू शकता ज्यामुळे कसाही प्रश्न असो प्रश्न कुणी विचारलाय समजत नाही आणि उत्तर मिळते. Quora हि सोशल मीडिया बऱ्याच रिजनल भाषांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही कुठलीही भाषा निवडू शकता.
Quora Partner Program म्हणजे काय ?
Quora Partner Program Quora मार्फत चालवला जाणारा पैसे कमवणारा सिस्टिम आहे. Quora वर जितके प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नावर ऍड्स दाखवल्या जातील. जोही व्यक्ती कोरा पार्टनर प्रोग्राम मध्ये सिलेक्ट होईल त्याच्या विचारल्या जाण्याऱ्या प्रश्नावर ऍड्स दाखवल्या जातील आणि त्यामार्फत जेही काही उत्पन्न आलं असेल ते त्या व्यक्तीला दिले जाईल.
Quora Partner Program मध्ये पात्र कसे ठराल ?
खलील निकष पूर्ण केल्यास तुम्ही Quora Partner Program मध्ये पात्र ठरतात.
१) संपूर्ण प्रोफाइल भरा
२) प्रत्येक दिवशी प्रश्नावर उत्तरे मिळतील अशी प्रश्न विचार निदान १०-१५ तरी
३) रोज किमान एका तरी प्रश्नाचे उत्तर सविस्तर द्या. याने तुमची प्रोफाइल ऍक्टिव्ह दिसेल.
४) कुठलाही मजकूर कॉपी पेस्ट करू नका.
५) कुणाशीही वाईट भाषेत बोलू नये.
६) Quora Space चा उपयोग घ्या.