Pineapple during Pregnancy in Marathi गरोदरपणात अननस खावे का ?

Pineapple during Pregnancy in Marathi : गरोदरपणात स्त्रिया आपल्या आहाराकडे  विशेष लक्ष ठेवुन असतात. गरोदरपणात काय खावे, काय नाही खावे, किती प्रमाणात खावे, कुठल्या वेळेत खावे या सर्वांकडे गरोदर स्त्रीचे लक्ष असते आणि ते दिलेच पाहिजे कारण आता आई होणाऱ्या स्त्री ला फक्त तिचाच नाही तर तिच्या बाळाचा पण विचार करावा लागतो.तुम्ही पाहिलं असेल घरात जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तिला घरातील बायका काही पदार्थ आहारात घ्यायला  मना करतात, अश्याच एका फळा बद्दल माहिती आपण घेणार आहोत, त्याबद्दल पिढ्यानपिढ्या असणारे गैरसमज दूर करणार आहोत. ते फळ आहे अननस. आपण आज गरोदरपणात अननस फळाचे महत्व बघणार आहोत. हा संभ्रम यासाठी आहे कारण अननस उष्ण फळ मानलं जाते आणि गरोदरपणात खाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते असा समज आहे. ह्या मागे खरंच सत्यता आहे का ? काही वैज्ञानिक कारण आहे का ? याची सत्यता पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

गरोदरपणात अननस खाणे सुरक्षित आहे का ?  Is it safe to eat pineapple during pregnancy?

हो Pineapple during Pregnancy गरोदरपणात अननस खाऊ शकता. परंतु गरोदरपणाच्या सुरवातीला म्हणजेच पहिल्या तिमाहीत (पहिल्या ३ महिन्यात) खाल्ला नाही पाहिजे. पहिल्या तिमाहीत गर्भ आणि आईची तब्येत नाजूक असते आणि अननस सहन होऊ शकत नाही. दुसऱ्या तिमाहीत (४, ५, ६ महिन्यात) अननस खाऊ शकता ते पण प्रमाणात, प्रमाणाबाहेर खाणे गरोदर स्त्री ला आणि बाळाला हानिकारक ठरू शकत किंवा याचा गरोदर स्त्री ला आणि बाळावर नकारात्मक प्रभाव पडु शकतो.

अननसचे पोषण मूल्य  PINEAPPLE – Nutritional Value

itfnet नुसार १०० ग्रॅम अननस म्हणजेच १ कप अननसमध्ये खालील पोषण मूल्य आढळतात

घटक पोषण मूल्य
चरबी ०.२ ग्रॅम
प्रथिने ०.५२ ग्रॅम
एकूण शुगर १२.७८ ग्रॅम
चरबी ०.६ ग्रॅम
व्हिटॅमिन सी ३३.१८ मिलिग्रॅम
कार्बोहायड्रेट १३.२० ग्रॅम
एनर्जी ६१.२५ केसियल
पोटॅशियम ११५.३३ मिलीग्रॅम
थायमिन (बी १) ०.०८ मिलीग्रॅम
रिबॉफ्लेविन (बी २) ०.०८ मिलीग्रॅम

गरोदरपणात अननस किती प्रमाणात खावा ?

१०० ग्रॅम अननस म्हणजेच मध्यम १ वाटी गरोदरपणात खाऊ शकतो.

गरोदरपणात अननस खाण्याचे आरोग्यदायी फायदे Benefits of Eating Pineapple during Pregnancy

 • गरोदरपणात जर तुमचा मूड सारखा बदलत असेल चिडचिड होत असेल, कंटाळवाणे वाटत असेल, तणाव आल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही अननस खा तुम्हाला लगेच रिफ्रेश वाटेल.
 • व्हेरिकोज व्हेन्स हा त्रास अननस मुळे होत नाही. व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायावरील नसा सुजतात, त्या इतक्या प्रमाणात सूजता कि डोळ्यांना दिसून येतात.
 • अननस  मध्ये ब्रोमेलिन आणि क जीवनसत्व असते ज्याने व्हेरिकोज व्हेन्स होत नाही. गरोदरपणात व्हेरिकोज व्हेन्स होते.
 • अननस मध्ये खुप जास्त प्रमाणात पाणी असते त्यामुळे गरोदरपणात होणाऱ्या आईने अननस खाल्ले तर कधीच डी-हायड्रेटेड वाटणार नाही.
 • ताज्या अननस मध्ये लोह आणि फॉलीक ऍसिड असते ज्याने गरोदर होणाऱ्या आईला हिमोग्लोबिन कमी होण्याचा त्रास कधीच होणार नाही. पाठीचा कणा आणि मेंदु संबंधात आजार बाळाला उद्धभवत नाही.
 • क जीवनसत्व असल्याने गरोदर आईची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच होणाऱ्या बाळाची त्वचा पण छान बनते.
 • अननस खाल्याने होणाऱ्या आईला जर मॉर्निंग सिकनेस होत असेल, मळमळ होत असेल तर होत नाही.

गरोदरपणात अननस खाण्याचे दुष्परिणाम

 • अननस च्या अति सेवनानाने गरोदर स्त्री ला आणि बाळाला त्रास होऊ शकतो, कारण Pineapple during Pregnancy गरोदरपणात अननस च्या अतिसेवनाने ब्रोमेलिन या एंजाइम ची मात्रा वाढु शकते ज्याने गर्भपात होण्याची शक्यता असते. अथवा वेळेआधी प्रसुती सुद्धा होऊ शकते.
 • गरोदरपणात अननस अति खाल्यास अपचन होऊ शकते. अननस मध्ये जे आम्ल असते त्याने छातीत जळजळ होऊ शकते.
 • अननस खाल्यावर जीभ जळजळ करते, किंवा सूज पण येते त्यामुळे पण गरोदरपणात अननस अति खाऊ नये.
 • अननस मध्ये खूप कॅलरी असतात जर तुमचं वजन गरोदरपणात जास्त असेल तर Pineapple during Pregnancy गरोदरपणात अननस  न खाल्लेलंच चांगले कारण अननस खाल्याने वजन वाढू शकते.
 • मधुमेह असताना दिवस राहिले असतील किंवा गरोदरपणात साखर वाढली असल्यास अननस खाऊ नये. साखर वाढु शकते ज्याचे वाईट परिणाम बाळावर होतात.

गरोदरपणात अननस खाण्याची पद्धत

 • तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अननस आहारात घेऊ शकता. अननस ची चव वगळू नये. फ्रिज मधील थंड अननस खाऊ नये. हवं तर अननस तुम्ही कपड्यात गुंढाळून ठेवू शकता.
 • चक्का मध्ये १०० ग्रॅम अननस टाकून त्यावर वेलची पूड चिमूटभर भुरभुरवून खाऊ शकता.
 • अननस चा ज्युस करून पिऊ शकता.
 • अननस चे बारीक तुकडे करून पालक, पुदिना सलाड करून खाऊ शकता.
 • काळ मीठ घालून नुसताच अननस चे तुकडे खाऊ शकता

गरोदरपणात अननस खाण्यासाठी कसा निवडावा ? pineapple during pregnancy is good or bad

फळ  कुठले पण असो ते ज्या ऋतूत येते त्याच ऋतुत खाल्ले तर त्यातील मुख्य पोषण तत्वे जास्त प्रमाणात मिळतात. आजकाल सर्वच फळ प्रत्येत ऋतूत मिळतात पण कुठलेही फळ कधीही खाण्यापेक्षा ज्या ऋतुत येतात तेव्हाच खाल्लेले जास्त आरोग्यदायी असतात, गुणवत्ता जास्त मिळते. बेमौसम फळ खाल्ले तर चवीत देखील फरक पडतो.

अननस मार्च ते जुलै महिन्यात भारतात खायला मिळतो. जर तुमचा ४था, ५वा, ६वा  महिना मार्च ते जुलै महिन्यात असेल तर तुम्ही नक्कीच Pineapple during Pregnancy गरोदरपणात अननस खाऊ शकता.

आपण एका सुपरफूड ची आज माहिती घेतली ज्यात खूप जास्त प्रमाणात जीवनसत्वे आणि पोषणतत्त्वे आहेत. आम्ही आशा करतो तुमचे समज, गैरसमज दुर झाले असतील. प्रमाणात खाल्ले तर नक्कीच तुम्ही या फळाचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला एलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने या फळाचे सेवन करू शंकता. अजूनही काही शंका असतील तर आम्हाला कंमेंट सेकशन मध्ये सांगा.

Leave a Comment

Ideal Time to Conceive After Periods कापूरचे फायदे आणि नुकसान Benefits of Camphor in Marathi Benefits of Jeera In Marathi जिरे खाण्याचे फायदे, औषधीय गुणधर्म Diabetes Diet Chart In Marathi मधुमेह रुग्णांसाठी डायट प्लान Mahatma Jyotirao Phule KarjMafi Yojana Mahiti