Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

Menstrual Cup योग्य पद्धतीने न वापरल्यास असे प्रसंग ओढाऊ शकता !

menstrual-cup-in-marathi

Periods साठी Menstrual Cup वापरणे आजकल सर्वसामान्य आहे आणि सोयीस्कर. परंतु Menstrual Cup कधी, कसा आणि कुठल्या पद्धतीने वापरावा याबद्दल माहिती असणे अति महत्वाचे आहे. आज आपण Menstrual Cup च्या वापराबात असलेल्या अपुऱ्या माहितीमुळे काय परिणाम भोगावे लागतात किंवा काय समस्या उद्धभवू शकता याबद्दल सत्य घटनेवर आधारित एक प्रसंगची माहिती घेणार आहोत.

हा प्रसंग आहे पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री-रोग तज्ञ यांच्या दवाखान्यातील आहे.

एक आई आपल्या चौदा-पंधरा वर्षांच्या मुलीला घेऊन तातडीने दवाखान्यात आल्यात. मुलगी अगदी अवघडून खुर्चीत वाट बघत बसली होती. नंबर आला आणि दोघी माय-लेकी  डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेल्यात. डॉक्टरांनी विचारले काय झाले. आई ने सांगायला सुरवात केली, मॅडम मी Period साठी पहिल्यांदाच Menstrual Cup वापरायचा प्रयत्न केला, माझं आणि माझ्या मैत्रिणीचे तसे बोलणे झाले होते, सुरवातीला नीट लावता आला नाही मग तिने फोन वर सांगितल्याप्रमाणे काल सकाळी बसवला पण मला आता काढता येत नाहीये.

मग डॉक्टरांनी विचारले, कालच का नाही आलीस ?

मुलगी म्हणाली, आई ओरडेल म्हणुन नाही आली पण आता मला खुपच त्रास होतोय आणि भीती पण वाटतेय.

डॉक्टरांनी तिला Examination Room मध्ये नेउन, एक इंजेकॅशन देऊन तो कप काढला.

दोघ माय लेकींचा आणि (डॉक्टरांचा)जीव भांड्यात पडला.

मग डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले की वीस-एकवीस वर्षपर्यंत, मुलीची शारीरिक वाढ होत असते, तेव्हा तोपर्यंत हे न वापरणेच योग्य.

असले काहीही प्रयोग करण्याआधी आपल्या डॉक्टर चा सल्ला जरूर घेतला पाहिजे डॉक्टर चेक करून Menstrual Cup ची साईज आणि पद्धत नीट समजावून सांगतात.

आरोग्याच्या बाबतीत Youtube Video वर योग्य आणि आपल्या शरीरास मानवेल असे सल्ले मिळत नाही.

या नावाजलेल्या स्त्री-रोग तज्ञच नाव आहे

Dr Shalaka Shintre Shimpi
M.D.(Obstetrics and Gynaecology)
The Cedar Clinics. 1, Vrundali Apartments, Bhandarkar Instt. R, Deccan Gymkhana, next to Yes Bank Corner, Pune, Maharashtra 411004

http://www.thecedarclinics.com/

Exit mobile version