Meaning of Dreams in Marathi प्रत्येकाला स्वप्न पडतात. या स्वप्नाची काही अर्थ असतात. सामुद्रिक शास्त्र नुसार काही स्वप्ने अशी असतात कि ज्याचा आपल्या भाग्याशी काहीतरी संबंध असतो. स्वप्ने मुख्यतः २ प्रकारचे असतात एक म्हणजे त्याच शुभ फळ मिळते किंवा आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडणारा आणि दुसरा म्हणजे अशुभ फळ देणारा किंवा आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडणारा.
आज आपण स्वप्नांचे अर्थ बघणार आहोत Meaning of Dreams in Marathi
१) स्वतः अंगठी घालणे : अंगठी घालताना स्वप्न पडले कि समजावे कि तुमच्या आयुष्यातील तुमच्या जवळची स्त्रीशी तुमची आज भेट घडणार आहे. उदा. जर तुम्हाला आज स्वप्न पडले तर, त्यादिवशी मुलगी बघायला जात असाल तर कदाचित ती तुमची भावी पत्नी असु शकते.
२) स्वतःला आकाशात उडताना बघणे : ज्यादिवशी असे स्वप्न पडेल त्यादिवशी प्रवासाची तयारी ठेवा, अचानक लांबचा प्रवास घडू शकतो.
३) स्वतःला आकाशातुन खाली पडतांना बघणे किंवा उंचीवरून खाली कोसळणे : प्रत्येक गोष्टी वागणं बोलणं सावधानतेने करा कारण हे स्वप्न तुम्हाला कुठल्यातरी संकट यायचा संकेत देते.
४) स्वतःला आंबा, डाळिंब खातांना बघणे किंवा उंट दिसणे : दिवसभरात छोटा मोठा धनलाभ होईल.
५) सुर्य दिसणे : आवडत्या व्यक्तीची अचानक भेट होणे किंवा एखादा मोबाईल वर संवाद होणे.
६) घोडेस्वारी करणे किंवा खुप सारे घोडे दिसणे : व्यापारात प्रगती होताना दिसेल किंवा अचानक व्यापारात एखादी चांगली संधी मिळेल.
७) वादळ आलेले बघणे : तुमच्या प्रवासाच्या दिवशी जर तुम्हाला एखादे जोरदार वादळ आलेले स्वप्नात दिसले तर समजून घ्या प्रवासात तुम्हाला त्रास होणार आहे.
८) बगीचा दिसणे : बगीचा बघितला कि मन उल्हसित होते बरोबर ना, त्याचप्रमाणे दिवसभरात काहीतरी आनंदी घटना घडणार.
९) पाऊस पडताना दिसणे : घरातील एखादे अन्न-धान्य संपेल. किंवा कीड, खराब झालेले दिसून येईल.
१०) बर्फ दिसणे किंवा बर्फ घातलेले सरबत दिसणे : वातावरणातील बदलामुळे वायरल आजार होण्याची शक्यता.
११) स्वतःलाच आजारी पडलेले दिसणे : जीवनात पुढचे काही दिवस कष्ट आहे किंवा खडतर राहतील.