Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

How To Register For Shark Tank India in Marathi शार्क टँक इंडियासाठी नोंदणी कशी करावी ?

How To Register For Shark Tank India

Source: Jagran Josh

Image Source: Jagran Josh

Shark Tank India शार्क टँक इंडिया हा आज भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि अत्यंत मनोरंजक रिऍलिटी शो आहे. तसे तर गायन आणि नृत्य रिऍलिटी शो हे मजेदार आहेत पण जो थ्रिल शार्क टँक च्या उद्योगशील लोकांचे पीच बघुन जी मज्जा येते ते अतुलनीय आहे.

तुमच्याकडेही अशी व्यवसायिक कल्पना आहे का जी तुम्हाला शार्क टँक इंडियावर पीच करायची संधी मिळवून देऊ शकेल? तुम्हाला वाटते का तुमच्या अनोख्या दृष्टीने तुम्ही उद्योजक क्षेत्रातील पुढचे मोठे नाव आहात ? तुम्ही जग बदलण्याचा दृष्टीकोन ठेवता का? जर सर्व प्रश्नांची उत्तरे हो आहेत तर Shark Tank India शार्क टँक इंडिया या शो मध्ये रजिस्टर करून तुम्ही गुंतवणुक प्राप्त करायचा नक्की प्रयत्न करायला हवा.

शार्क टँक इंडियावर तुम्ही उद्योजक म्हणून नोंदणी कशी करू शकता आणि तुमचा व्यवसाय कसा सुरू करू शकता ते खाली देत आहोत.

तुमच्याकडे पुर्वीपासून चालू असलेला एखादा व्यवसाय असेल किंवा स्टार्टअपची कल्पना असल्यास, हा शो तुमच्यासाठी आहे. आर्थिक सहाय्याने, शार्क टँक इंडिया तुम्हाला तुमची स्वप्ने साकार करण्यात मदत करू शकते. भारतभरातील नवोदित उद्योजक त्यांच्या व्यवसायाला वळण मिळण्यासाठी नोंदणी करतात,आणि जर ते निवडले गेले, तर ते शार्कशी करार करण्याच्या एक पाऊल जवळ जातात.

Shark Tank India शार्क टँक इंडिया मध्ये नोंदणी करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :

  1. तुमच्या मोबाईल वर डाउनलोड करा SonyLiv app किंवा लॉग ऑन करा www.sonyliv.com वर.
  2. लॉग इन प्रक्रिया पूर्ण करा वेरिफिकेशन करून घ्या.
  3. अँप वर शार्क टँक इंडिया बॅनरवर टॅप करा किंवा www.sonyliv.com वरून करत असाल तर या पोर्टल वर व्हिजिट करा sharktank.sonyliv.com
  4. शो मध्ये भाग घेण्यासाठी सर्व रेजिस्ट्रेशन प्रोसेस पुर्ण करा.
  5. फॉर्म मध्ये खूप सारे पेजेस आहेत त्यामुळे पुष्टी करा तुम्ही सव अनिवार्य माहिती भरली आहेत कि नाही याची.
  6. आता, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या पीच डॉक्युमेंट / व्हिडिओ अपलोड करू शकता आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
  7. लक्षात ठेवा की पीच, १GB च्या व्हिडिओला अनुमती आहे. उर्वरित अपलोडसाठी ते १०० MB आहे.

यानंतर, जर तुम्ही पुढच्या फेरीत पोहोचला असाल तर शार्क टँक इंडियाची टीम तुमच्याशी संपर्क साधेल त्याची तुम्ही प्रतीक्षा करा. तुमचं पीच मध्ये आणि व्यवसायात दम असेल तर तुम्ही पुढे जाल. तुम्ही निवडले न गेल्यास निराश होऊ नका तुमचा व्यवसास अजून १००० लोकांमध्ये उठून दिसेल असा वाढवा आणि पुढच्या वर्षी परत नोंदणी करा.

Exit mobile version