आजच्या पोस्ट मध्ये Google Web Stories कश्या बनवायच्या हे step by step बघणार आहोत. ज्याने आपल्या website ची ट्रॅफिक खूप वाढेल. गूगल नेहमीच आपल्या युजर्स ला सोयिस्कर होईल असे प्रयोग करत असते. त्यासाठी गूगल वेळोवेळी नवीन फिचर्स, अँप्लिकेशन्स, अपडेट्स काढत असते. याचप्रमाणे गूगल ने आपले एक अतिशय मस्त फिचर लाँच केले आहे याच नाव आहे ” Google Web Stories “
हे फिचर त्या लोकांसाठी फार उपयोगी आहे ज्यांना आपल्या वेबसाईट वर कमी वेळात खूप सारी ट्रॅफिक वाढवायची आहे. किंवा त्या लोकांसाठी पण उपयोगी आहे जे ब्लॉगिंग क्षेत्रात अगदी नवीन आहेत.
ब्लॉगिंग कसे सुरु करावे ? https://knowinmarathi.com/how-to-start-blogging-in-marathi/
आज मी तुम्हाला Google Web Stories कश्या बनवायच्या तसेच त्या WordPress वर्डप्रेस मध्ये आणि Blogger वेबसाईट्स मध्ये कश्या डिस्प्ले करायच्या हे शिकवणार आहे.
२०१८ मध्ये AMP Stories या नावाने गूगल ने हे फिचर लाँच केले होते. आता ते Google Web Stories ने अपग्रेड केले असून त्यात गुगल हुन वेबसाइट वर मोठ्या प्रमाणात ट्राफिक आणायचा प्रयत्न आहे. आणि त्याच प्रमाणे सोपे व्हावे म्हणुन गूगल ने WordPress Plugin सुद्धा लाँच केले आहे.
गूगल वेब स्टोरीज काय आहे ? What are Google Web Stories in Marathi?
वेब स्टोरीज हा एक व्हिजुअली कन्टेन्ट फॉरमॅट आहे ज्यावर तुम्ही फोटो, माहिती टप्प्या, टप्प्यात पाहू शकता. यामध्ये तुम्ही स्क्रीन स्वाईप किंवा टॅप करू शकता पुढील माहिती बघण्यासाठी. गूगल हे वेब स्टोरीज ला सपोर्ट करते, म्हणुन वेब स्टोरीज गूगल डिस्कवर आणि सर्च मध्ये दिसते.
वेब स्टोरीज गूगल वर कसे काम करते ? How Web Stories Works on Google in Marathi?
वेब स्टोरीज बनवण्याआधी आपण त्या गूगल वर कश्या वर्क करतात ते बघुयात. गूगल प्रॉपर्टी वरून जेव्हा आपण वेब स्टोरीज बघतो तेव्हा गूगल कॅशे मध्ये स्टोर केलेल्या वेब स्टोरीज गूगल दाखवते. वेब स्टोरीज पेजेस पटकन उघडण्यासाठी गुगल त्या गूगल कॅशे मध्ये सेव करते.
WordPress वेबसाइट साठी गूगल वेब स्टोरीज कश्या बनवायच्या ? How to build Web Stories in WordPress in Marathi ?
वेबसाइट्स प्लॅटफॉर्म मध्ये सर्वात पसंती मिळाली आहे ती तर वर्डप्रेस ला. वर्डप्रेस प्लॅटफॉर्म वर वेब स्टोरीज बनवणे खूपच सोप्पे आहे त्यासाठी ” Official Google Web Stories Plugin ” install करा. आणि खालील स्टेप्स फोल्लो करा
१) वेब स्टोरीज प्लगिन उघडा
Stories Plugin ओपन केल्यावर >> Add New वर क्लिक करा, स्टोरी ला नाव द्या आणि सुरवात करा आपल्या कन्टेन्ट च्या वेब स्टोरीज बनवायला.
२) वेब स्टोरीज बनवताना खाली Checklist नक्की चेक करा तिथे तुम्हला तुमची वेब स्टोरी युजर फ्रेंडली होण्याच्या सर्व मुद्दे दिले आहेत. ज्याने तुमची Web Story अधिक प्रभावी दिसेल.
३) Web Story design केल्यावर उजव्या बाजूला Document वर क्लिक करा आणि सर्व माहिती (Metadata)भरा जसे कि Poster Image, Story Description, Tags, Slug यामुळे तुमची स्टोरी SEO फ्रेंडली होईल आणि Google Search मध्ये रँक होईल.
४) तुम्हाला काही ऑडिओ द्यायचा असेल तर तो पण तुम्ही देऊ शकता.
५) उजव्या बाजूला Design सेकशन आहे तिथे तुम्ही हवी तशी स्टोरी कन्टेन्ट design करू शकता.
WordPress वेबसाइट वर वेब स्टोरीज कशा दाखवायच्या ? How to embed Web Stories on a WordPress in Marathi
वेब स्टोरीज वेबसाइट वर दाखवल्यावर त्यावर अजून जास्त visits यायला मदत होईल WordPress साईट वर वेब स्टोरीज दाखवायच्या असतील तर पुढील स्टेप्स फोल्लो करा.
Dashboard >> Appearance >> Widgets >> Embeds >> Web Stories
Blogger वेबसाइट साठी वेब स्टोरीज कश्या बनवायच्या ? How To Create Web Stories for Blogger in Marathi ?
WordPress वेबसाइट सोडून Blogger किंवा इतर वेबसाइट प्लॅटफॉर्म वरती पण आपण वेब स्टोरी बनवून दाखवू शकतो.
त्यासाठी https://makestories.io/या वेबसाइट चा वापर करू शकतो. हि वेबसाइट इंडियन आहे आणि फ्री टू युज आहे आणि गूगल सुद्धा हि वेबसाइट वेब स्टोरीज बनवायला सजेस्ट करते म्हणून तुम्ही बिनधास्त हि वेबसाइट वापरू शकता.
या टूलमध्ये सुद्धा खूप सोप्प्या पद्धतीने वेब स्टोरी डिजाइन करायला ऑपशन आहे ज्याने तुम्ही खूप attractive वेब स्टोरी बनवू शकता. आणि SEO Settings पण आहेत त्यासुद्धा तुम्ही भरून स्टोरी रँक करू शकता.
Blogger वर वेब स्टोरीज कशा दाखवायच्या ? How to embed Web Stories on a Blogger in Marathi
- संपूर्ण वेब स्टोरी डिझाईन झाल्यावर पब्लिश करताना वर दाखवल्याप्रमाणे इंटरफेस दिसतो. हायलाइट केलेल्या बॉक्स प्रमाणे Short Link वर क्लिक करा
- टेक्स्ट बॉक्स तुमच्या स्टोरी च नाव किंवा तुम्हाला URL ला जे नाव द्यायचं आहे ते टाका आणि Publish Now वर क्लिक करा.
- जी लिंक मिळेल ती लिंक कॉपी करुन तुम्हाला वेबसाइट वर जिथे स्टोरी शो करायचीय तिथे पेस्ट करा आणि अश्या प्रकारे तुमची स्टोरी Blogger किंवा कुठल्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर दिसायला तयार आहे.
गूगल सर्च मध्ये वेब स्टोरीज रँक कश्या करायच्या ? How To Rank Web Stories ?
एकदाका वेब स्टोरीज बनवल्या कि त्यावर ट्रॅफिक येण्यासाठी त्या गूगल वर रँक झाल्यापाहिजे त्याशिवाय त्या लोकांपर्यंत कश्या पोहचणार ? त्यासाठी वेब स्टोरीज गुगल वर रँक कश्या करायच्या हे आपण बघुयात.
१) तुमच्या वेब स्टोरीज च्या लिंक्स साइटमॅप मध्ये ऍड करा.
२) कुठलीही वेबस्टोरी बनवली कि ती लिंक लगेच साइटमॅप मध्ये ऍड करून Google Search Console मध्ये साइटमॅप अपडेट करा, जेणेकरून वेब स्टोरी इंडेक्स होईल.
३) त्यानंतर वेब स्टोरी URL Inspection मध्ये टाकून Inspect करा.
४) एखाद्या पेज सारख्या सर्व SEO Settings स्टोरी ला करा जेणेकरून स्टोरी रँक करेल.
५) Google तुमच्या स्टोरी ला Cache मध्ये सेव करण्यासाठी Schema structured data ऍड करा.
६) Interlink करतो त्याप्रमाणे Web Story निगडित पेजेस ला लिंक करा.
७) शक्यतो १ पेक्षा जास्त URL स्टोरी मध्ये ऍड करू नका. तसेच सुरवातीलाच लिंक टाकू नका पूर्ण स्टोरी संपल्यावर शेवटच्या पेज वर लिंक पोस्ट करा.
८) तुम्हाला ऍफिलियेट लिंक्स Affiliate Links स्टोरी मध्ये दाखवायच्या असतील तर प्रत्येक स्टोरी १ च लिंक ऍड करा त्यापेक्षा जास्त ऍड करू नका अन्यथा गूगल स्टोरी ब्लॉक करेल. ऍफिलियेट लिंक्स टाकताना Affiliate Program चे सर्व Guidelines एकदा पूर्ण वाचुन घ्या.
९) वेब स्टोरी कमीत कमी ५ पेजेस ची असावी पण २० पेजेस पेक्षा जास्त नसावी. प्रयत्न करा १०-२० पेजेच्या मध्ये स्टोरी पोस्ट करायचा.
१०) तुम्हाला जर वेब स्टोरीज मध्ये विडिओ टाकायचा असेल तर प्रत्येक पेज वर १५ सेकंद पेक्षा जास्त मोठा विडिओ टाकू नका. आणि प्रत्येक विडिओ वर subtitles असले पाहिजे.
११) वेब स्टोरी वरील प्रत्येक पेज वर २०० characters पेक्षा जास्त content टाकू नये.
या सर्व स्टेप्स केल्यावर वेब स्टोरीज AMP Test Tool वर चेक करायला अजिबात विसरू नका किंवा लिंक incognito mode मध्ये Google Search मध्ये टाकून चेक करा रँक झाली आहे का ते आणि नसेल झाले तर Google Search Console मधील एरर सॉलव्ह करा.
निष्कर्ष
गूगल च्या प्रत्येक अपडेट्स चा आपल्याला फायदाच होत असतो. आजची Google Web Stories ची पोस्ट इथेच संपावत आहोत. मी आशा करते तुम्हाला आजची पोस्ट खूपच इंटरेस्टिंग, आणि उपयोगी पडेल. गूगल च्या नवीन अपडेट चा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या वेबसाइट वर चांगल्या प्रमाणात ट्रॅफिक आणु शकता.
Helpfull info