Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

Ganesh Chaturthi 2022 – गणपतीची मूर्ती कशी असावी ?

गणपतीची मूर्ती कशी असावी ? हे आज बघुयात ….

प्रत्येक महिन्यात एक चतुर्थी असते. जी गणेशजींना समर्पित असते परंतु   भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थी च्या दिवशी आपण पुढच्या १० दिवसासाठी गणपती बसवतो तेव्हा सात्विक, शुभ मूर्ती कशी आणावी याची माहिती आज आपण घेणार आहोत.

श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले होते स्कंद पुराणामध्ये. तसेच गणपती अथर्वशीर्ष मध्ये गणपती ची मूर्ती कशी असावी याचे सविस्तर वर्णन केले आहे. याचीच माहिती आपण घेणार आहोत. Ganesh Chaturthi 2022 ला तुम्ही या सर्व नियमांमध्ये बसणारी मूर्ती घरी स्थापित करा हे अतिशय शुभ असते.

१) गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti हि शाडू मातीचीच असावी. इतर वस्तूंपासून बनवलेल्या मूर्ती शास्त्रानुसार अयोग्य आहे.

२) जसे वर सांगितले कि गणपती अथर्वशीर्षात गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti कशी असावी याचे वर्णन आहे त्याप्रमाणे मूर्ती ” एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम्। ” या प्रमाणे  एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारा असावा.

३) एक हात वरमुद्रा धारण करणारा तर दुसरा मोदक हाती असलेला असावा.

४) गणपतीच्या मूर्तीचे कान सुपासारखे असावे.

५) पाटावर सिहांसनाच्या मूर्तीवर बसलेली गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti असावी.

६) भंगलेली मूर्ती, डाग, तडा पडलेली मूर्ती घेऊ नये.

७) डाव्या सोंडेची गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti घ्यावी कारण उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्तीचे फार सोवळे पाळावे लागते.

८) पोटाला वेटोळे घातलेला नाग असणारी गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti आणावी.

९) गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti जवळ उंदीर असावा.

Ganesh Chaturthi 2022 ला नक्की वरील नियमांनुसार सुख, समाधान, शांततेसाठी गणपतीची मूर्ती Ganpatichi Murti आणा आणि सकारात्मक अनुभव घ्या.

Exit mobile version