Site icon KnowInMarathi | Marathi Blog – मराठीत वाचा, मराठीत जाणा !

तृतीयपंथी लोकांना चुकीची वागणुक देण्याच्या आरोपामुळे हि मालिका बंद करायची होतेय मागणी Allegations of Mistreatment on Fulala Sugandh Maticha StarPravah

लॉकडाऊन च्या काळात आपल्या मनोरंजनासाठी अनेक सेरिअल्स चे दुसऱ्या ठिकाणी जाऊन शूटिंग चालू आहे. आपले मनोरंजन करणाऱ्या सेरिअल्स द्वारे आपल्याला कायम चांगलाच संदेश मिळावा हि अपेक्षा असते परंतु याबाबतीत कधी कधी त्यांचा पाय घसरतोच. ह्याच प्रकारची चुक झालीये टीआरपी चा उच्चांक गाठलेल्या स्टार प्रवाह वरील सुप्रसिद्ध मालिका “फुलाला सुगंध मातिचा” या मालिकडून. 

“फुलाला सुगंध मातिचा” हि मालिका काही दिवसांपासुन वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याचे कारण म्हणजे या मालिकेत आलेले नवीन पात्र “सँडी”. हा एक तृतीय पंथी आहे. ज्यांच्यासोबत जीजीअक्का चा व्यवहार चांगला दाखवला गेला नाही आहे. 

३१ मे च्या दिवशी   “फुलाला सुगंध मातिचा” या मालिकेचा जो भाग प्रक्षेपित करण्यात आले त्यात सँडी ला जीजीअक्का द्वारे चांगली वागणुक दिली गेली नाही आहे. त्या सिन मध्ये सँडी ने परिधान केलेल्या बांगड्या, आणि गळ्यातील चैन वरून बोलण्यात आले आहे. त्यात असं म्हटलं आहे हे सर्व घातलेले दागिने घरातील आई आणि बहिणीला दे आणि ती जिम लाव छान बॉडी बनव. त्याचप्रमाणे सँडीला गोड, मिठाई, गुलाबजाम आणि शेवटी चक्रम या नावाने संबोधले गेले आहे.  ह्या सिरीयल मधील पात्र जीजी अक्का चा सँडी कडे बघायचा दृष्टीकोन अतिशय हीन आहे. जो कुठल्याही तृतीयपंथी व्यक्तीला वाईट वाटण्यासारखा आहे.  

आज तृतीयपंथी लोकांच्या बाबतीत मानवीय अधिकार आलेत पण तरी समाजात त्यांना बघायचा दृष्टीकोन हा हीनच आहे असा अर्थ या मालिकेतुन येत आहे.  या सर्व प्रक्षेपित केलेल्या बघामुळे तृतीयपंथी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे. त्यामुळे “फुलाला सुगंध मातिचा” हि मालिका लवकरात लवकर बंद व्हावी अशी मागणी ‘yes we exist’ या संस्थ्येकडुन केली गेली आहे. 

‘yes we exist’ हि मागणी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइल वरून केली आहे. 

 

 

Exit mobile version